अन्वयार्थ
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अन्वयार्थ


अन्वयार्थ : ‘आयडॉल’चे अध:पतन Print E-mail

बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
alt

लार्न्‍स आर्मस्ट्राँग ही सायकलिंगची नव्हे; तर अवघ्या जगाची दंतकथा होती. टूर द फ्रान्ससारखी सर्वात अवघड स्पर्धा सलग सात वेळा जिंकण्याचा विश्वविक्रम त्याच्या नावावर होता. हा विक्रमही त्याने कर्करोगाशी झुंज दिल्यानंतर रचला होता. कर्करोगाशी दिलेली लढत त्याने शब्दबद्ध केली तेव्हा वाचकांच्या त्याच्यावर उडय़ा पडल्या. आजही विक्रमी विक्री होणाऱ्या पुस्तकांमध्ये आर्मस्ट्राँगच्या आत्मकथेचा समावेश आहे. सायकलिंगमध्ये तो दरवर्षी जिंकत राहिला. भरघोस रकमेची बक्षिसे पटकावू लागला. नाइकीसारख्या कंपन्याशी केलेल्या करारातून अब्जावधी डॉलर्स त्याने कमावले.

 
अन्वयार्थ : ‘चरखा’, ‘खादी’ आणि ‘चरबी’.. Print E-mail

बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
alt

जवळपास पाऊणशे वर्षांपूर्वी देशाच्या राजकारणाला ‘चरखा’ या एका सामान्य शब्दाने एक निर्मळ दिशा दिली. महात्माजींचा अहिंसात्मक स्वातंत्र्यलढा, देशाला मिळालेले स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यानंतरची पासष्ट वर्षे अशा प्रदीर्घ प्रवासात चरखा या शब्दाच्या अर्थाला नवनवे पैलू पडत गेले आणि त्या प्रत्येक पैलूतून राजकारणाचे नवनवे रंगदेखील परावर्तित होऊ लागले. ‘चरखा’ आणि ‘खादी’ यांचे नाते स्पष्ट करण्यासाठी शब्दांची गरज नाही. खादी ही चरख्याची देणगी आहे.

 
अन्वयार्थ : मोदींची धावाधाव Print E-mail

 

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२

सत्तेच्या मिजाशीत मश्गूल असताना माणसांची किंमत बहुधा कळत नाही. ती कळते निवडणूक जवळ आल्यावर. माणसे आपलीशी करण्यासाठी सत्ता वापरायची की सत्तेच्या दर्पाने माणसांना दूर लोटायचे हे ज्याच्या त्याच्या स्वभावधर्मावर अवलंबून असते. वसंतदादा पाटील वा यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा माणूस सत्तेतून अनेकांना जवळ करतो. आपलेपणाने बांधून घेतो. पण अशा व्यक्ती विरळा. सत्तेवर असताना अन्य माणसांची किंमत न करणारेच अधिक. नरेंद्र मोदी हे किंमत न करणाऱ्यांतील आहेत. त्यांच्या कर्तृत्वावर फिदा असणारा मोठा वर्ग या देशात आहे.

 
अन्वयार्थ : पवारांचा अजेंडा Print E-mail

 

मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात पार पडलेले राज्यव्यापी अधिवेशन ही आगामी निवडणुकांची तयारी होती, हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भाषणावरून पुरेसे स्पष्ट झाले आहे. पक्षाचे कारभारी आपणच आहोत आणि असू हे त्यांचे विधान जसे एकाच दगडात अनेक पक्षी मारणारे होते, तसेच अजित पवारांना या वेळी देण्यात आलेल्या विशेष स्थानामुळे नक्की काय होणार, असाही संभ्रम त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करून टाकला. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांनी येत्या काही काळात समाजातल्या कोणत्या घटकांना जवळ करायचे आहे, याचे सुस्पष्ट निवेदन अधिवेशनाच्या निमित्ताने करून टाकले आहे.

 
अन्वयार्थ : बारावीच्या गुणांचा पडताळा! Print E-mail

 

शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२

आयआयटी आणि देशपातळीवरील नामांकित अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक ‘जेईई’ परीक्षेबरोबरच प्रवेशाकरिता बारावीचे गुण विचारात घेण्यावरून जे अनेक मुद्दे उपस्थित झाले, त्यामध्ये ताणवादी आणि गुणवादी असे दोन तट होते. विद्यार्थ्यांनी किती परीक्षांची तयारी करायची? बारावी आणि प्रवेश परीक्षांची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक परीक्षेचा वेगळ्या पद्धतीने अभ्यास करताना त्यांच्यावर बराच ताण येतो, हा ताणवादी तट; तर बारावीसाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीला काहीच महत्त्व नाही का, असा गुणवादी तट.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 12