अन्वयार्थ
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अन्वयार्थ


अन्वयार्थ : आशा आणि वास्तव Print E-mail

alt

देशाच्या आर्थिक आरोग्याच्या नाडीचा वेग किंचित सुधारला असल्याचा दावा नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी मुंबईत केला. औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक किंचित वर उचलला गेल्याची संधी अहलुवालिया यांनी साधली आणि पतमापन संस्थांनी भारताबद्दल नकारात्मक दृष्टिकोन टाळावा, असेही सुचविले.
 
अन्वयार्थ : रेशनिंग कार्डचा काळा बाजार Print E-mail

alt

राज्यातील बनावट रेशनिंग कार्डबाबत उच्च न्यायालयाने सरकारची कानउघाडणी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यामुळे हे सारे प्रकरण उघडय़ावर आले आहे. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत आपण या देशाचे नागरिक आहोत, याचा सबळ पुरावा म्हणून जे रेशनिंग कार्ड गृहीत धरले जाते, ते देण्याची सर्वात अपारदर्शी पद्धत आपल्या देशात अस्तित्त्वात आहे.
 
अन्वयार्थ : खलिस्तानचे भूत Print E-mail

 

शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२

निवृत्त सेनाप्रमुख अरुणकुमार वैद्य यांच्या मारेकऱ्यांना शहीद ठरवणाऱ्या शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीला जाहीर जाब विचारण्याऐवजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ‘आम्ही काय करणार?’ असा प्रतिप्रश्न करणे, हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. धार्मिक संस्थांना घटनेने काही अधिकार दिले असून त्यांच्या कारभारात सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही, असे सांगून त्यांनी आपली अगतिकताच स्पष्ट केली आहे. प्रबंधक समितीने नुकत्याच आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात वैद्य यांचे मारेकरी सुखा आणि जिंदा यांच्या ‘कर्तृत्वा’बद्दल त्यांचा जाहीर गौरव करून त्यांना शहीद ठरवल्याने देशभरातून टीका सुरू झाली असताना गृहमंत्र्यांनी मौन बाळगणे अनाकलनीयच आहे.

 
अन्वयार्थ : मुंडे परतुनि आले.. Print E-mail

 

शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२

गोपीनाथराव मुंडे यांच्या मनासारखे शेवटी झाले. जवळपास पाच वर्षांच्या वनवासानंतर महाराष्ट्राची सूत्रे पुन्हा त्यांच्याकडे आली. प्रमोद महाजन यांच्या मृत्यूनंतर मुंडे या नावाचा दबदबा पक्षात आणि पक्षाबाहेरही कमी झाला होता. महाराष्ट्रात भाजपचा पाया मजबूत करण्यात मुंडे व महाजन यांचा वाटा मोठा होता. मात्र मुंडेंच्या कार्यपद्धतीमुळे अनेक तरुण नेते दुखावले होते. त्यांना वचपा काढण्याची संधी महाजन यांच्या मृत्यूनंतर मिळाली. दरम्यानच्या काळात मुंडेही बरेच प्रस्थापित झाले होते. ९५ला सत्ता हाती आल्यानंतर मुंडेंमधील त्वेष, आक्रमकता कमी झाली होती.

 
अन्वयार्थ : अभिजात अभिनेता Print E-mail

गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२

गेली चार दशके भारतीय चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन या अभिनेत्याला जगावे कसे याचे जे उत्तर सापडले आहे, तेच त्यांच्या सत्तरीतील आनंदाचे रहस्य आहे. प्रतिभा आणि अभिजातता यांचा संगम झालेल्या या अभिनेत्याला प्रसिद्धीच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर गेल्यानंतरही जमिनीवर राहण्याचे जे तंत्र अवगत झाले आहे, ते खरोखरीच अनुकरणीय आहे. अमिताभला लोकप्रियता मिळेपर्यंतच्या काळातील हिंदी चित्रपट प्रेमाच्या त्रिकोणात अडकला होता. त्याचे विषय ठरलेले असत आणि अभिनेत्यांना लोकप्रियतेचा दर्प जडलेला असे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 12