अन्वयार्थ
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अन्वयार्थ


अन्वयार्थ : ‘हीरो’ ह्युगो Print E-mail

गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२

दिव्याभोवतीच अंधार असावा त्याप्रमाणे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा कंठमणी असणाऱ्या अमेरिकेच्या आसपासचे सगळे देश डाव्या वा डाव्याजवळ जाणाऱ्या नेतृत्वाखाली आहेत. त्यातील अग्रणी म्हणजे व्हेनेझुएला. कट्टर अमेरिकाद्वेष आणि तो परवडावा यासाठी लागणारे तेलाचे अमाप साठे या भांडवलावर गेली १४ वर्षे या चिमुकल्या देशावर राज्य करणाऱ्या ह्युगो चावेझ यांची अलीकडच्याच निवडणुकीत पुन्हा सहा वर्षांसाठी फेरनिवड झाली. म्हणजे ते पुढची सहा वर्षे टिकले तर जवळपास २० वर्षांची त्यांची राजवट होईल. तो विक्रमच म्हणायला हवा.

 
अन्वयार्थ : पंचहो, आता तुम्हीही? Print E-mail

बुधवार, १० ऑक्टोबर २०१२

क्रिकेट क्षेत्रात पैसा सहज खेळू लागल्यानंतर झटपट पैसा मिळविण्यासाठी खेळाडूंनी अनैतिक मार्गाचाही अवलंब सुरू केला. उत्तेजक सेवन करणे, अमली पदार्थ अवैधरीत्या बाळगणे हे प्रकार नियमित होऊ लागले होते. गेल्या काही वर्षांमध्ये यापलीकडे जाऊन खेळाडू मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंग आदी गैरप्रकारांद्वारे संपत्ती मिळविण्याचा मार्ग पकडू लागले आहेत. आजपर्यंत अनेक खेळाडूंना त्याबाबत कारवाईस सामोरे जावे लागले आहे. हे सारे प्रकार आता पुन्हा होणार नाहीत, असे वातावरण असताना काही पंचही मॅच फिक्सिंग प्रकारात सहभागी झाले असल्याचे स्टिंग ऑपरेशन्सद्वारे भारतातील एका वाहिनीवर दाखविण्यात आले.

 
अन्वयार्थ : ‘श्वेतपत्रिका’ आणि ‘काळी यादी’! Print E-mail

 

बुधवार, १० ऑक्टोबर २०१२

सिंचन व्यवहारांवर प्रकाश टाकण्यासाठी श्वेतपत्रिकेचा मुद्दा गाजू लागल्याने, या धंद्यासाठी थेट किंवा अप्रत्यक्ष हातमिळवणी करताना ज्यांचे हात काळे झाले आहेत, त्या सर्वाचे धाबे दणाणले असणार, यात शंका नाही. अशा काळ्या धंद्यात मुख्यत: नेते, प्रशासक आणि ठेकेदार यांच्या अभद्र युतीचा संशय असतो. प्रशासनाशी साटेलोटे असले, की लायकी नसतानादेखील एखादा ठेकेदार लाखोंच्या कामाचा ठेका मिळवून कामाची वाट लावतो आणि केवळ पैसा गिळून मोकळा होतो, अशी अनेक उदाहरणे राज्यात जागोजागी दिसू शकतील. मात्र, सामान्य जनता हतबल असते. सत्ता आणि संपत्ती यांच्या युतीशी टक्कर घेण्याची क्षमता सर्वसामान्यांच्या अंगी नसते.

 
अन्वयार्थ : रिपब्लिकन गर्दीचे हात रिकामेच Print E-mail

मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
alt

वर्षभरापूर्वी मोठा गाजावाजा करीत रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपशी युती करून मोठे राजकीय धाडस दाखविले. दलित जनता बरोबर आली की सत्ता हमखास मिळते, याची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पक्की जाणीव आहे. त्यासाठी त्यांना एखादा नेता बरोबर हवा असतो. काँग्रेसची ती गरज पूर्ण करण्याची जबाबदारी गेल्या तीन दशकांत रा.सू.गवई व रामदास आठवले यांनी प्रामाणिकपणे पार पाडली. त्या बदल्यात त्यांना सत्तेची पदे उपभोगायला मिळाली. राज्यातील शिवसेना व भाजप या प्रमुख विरोधी पक्षांना सातत्याने सत्ता हुलकावणी दाखवत आहे,

 
अन्वयार्थ : काळानुरूप बदल हवा! Print E-mail

मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
alt

चालू शतकाच्या आरंभी मॅनेजमेंट आणि  कम्प्युटर इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या देशातील लाखो विद्यार्थ्यांना तेव्हा स्वप्नपूर्तीचा आनंद होत होता. आता दहा वर्षांनतर मात्र परिस्थिती पालटल्याचे दिसून आले आहे. हा बदल स्पष्ट होतो, तो बिझनेस स्कूल्स व इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या संस्थांची संख्या रोडावल्यामुळे. यंदाच्या वर्षी देशभरात एमबीए आणि एमसीएचा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या १०९ नव्या संस्था सुरू झाल्या, त्यापेक्षा अधिक म्हणजे १८५ संस्था बंद पडल्या.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 8 of 12