ग्रंथविश्व
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

ग्रंथविश्व


ग्रंथविश्व : दक्षिण आशियाई देशांमधील सेवा- क्रांतीचा मागोवा.. Print E-mail

 

ज. शं. आपटे - शनिवार, २३ जून २०१२

दक्षिण आशियातील आर्थिक विकास गेल्या ३०-३२ वर्षांत चांगल्या प्रकारे झाला आहे. दक्षिण आशिया म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि मालदीव हे देश समावेश असलेला भूभाग. भारत व इतर दक्षिण आशियाई देशांमधील आर्थिक वृद्धीच्या अनुभवावरून असे दिसून आले आहे की जलद आर्थिक वृद्धी, रोजगार निर्मिती, स्त्री-पुरुष समानता, सेवा यामुळे झालेली दारिद्रय़ात घट या साऱ्या बाबी शक्य आहेत. सेवा-क्रांती म्हणजे नेमके काय? उत्पादन करणाऱ्या कारखान्यासारखीच सेवा गतिमान होईल का,

 
ग्रंथविश्व : भारताचा पुनशरेध Print E-mail

 

अ. पां. देशपांडे, शनिवार, ९ जून २०१२
भारताला जर मोठय़ा प्रमाणावर झेप घेऊन आपले राष्ट्र अव्वल दर्जाचे बनवायचे असेल तर ते केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनेच होऊ शकेल. विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्धल बोलताना दरवेळी परदेशीयांचे जे आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान तेच खरे असे समजायचे कारण नाही. याबाबतीत भारताकडेही जगाला देण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. मात्र त्याचा पुनशरेध नव्या नजरेतून घेणे गरजेचे आहे. अमेरिकन लोकांनी जेव्हा हळदीचे एकस्व (पेटंट) मिळवले तेव्हा डॉ. रघुनाथ अनंत माशेलकरांच्या लक्षात आले की अरे! हळदीचा वापर तर आपण नाना कारणांनी हजारो वष्रे करीत आलो असताना हे एकस्व अमेरिकनांना काय म्हणून मिळावे? मग त्यांनी जुन्या वाङ्मयातील संदर्भ देत ते परदेशीयांना पटवून दिले आणि ते एकस्व त्यांच्याकडून हिसकावून घेतले.

 
ग्रंथविश्व : संग्रा, पण सखोलता नसलेले Print E-mail

संजय डोंगरे  - शनिवार, २६ मे २०१२
sanjay.dongre @expressindia.com

भ्रष्टाचारात नव्हे, त्यावरील चर्चेत वाढ झाली आहे, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत व्यक्त केले होते. राज्यातील दुष्काळी स्थितीच्या गदारोळात या मताचे समर्थन वा प्रतिवाद कोणी केला नाही. प्रत्यक्षात भ्रष्टाचारात वाढ झाली आहेच, मात्र त्यावरील चर्चेत काही पटींनी वाढ झाली आहे. ‘करप्शन अँड द लोकपाल बिल’ हे ज्येष्ठ पत्रकार एम. व्ही. कामत आणि लेखिका गायत्री पगडी यांचे पुस्तक अशा प्रकारच्या चर्चेचेच निदर्शक मानावे लागेल.

 
ग्रंथविश्व : माओवादी चळवळीची निराळी बाजू.. Print E-mail

alt

अविनाश कोल्हे, शनिवार, १२ मे २०१२
आजकाल एक दिवस असा जात नाही की माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची बातमी नाही. एकीकडे आपला देश आíथक महासत्ता होण्याची स्वप्ने बघत आहे तर याच देशात काही वर्ग अन्न, निवारा, वस्त्र यांसारख्या गरजांसाठी झगडत आहे. ही विसंगती विदारक तर आहेच, त्याचप्रमाणे अंतर्मुख करणारी आहे. माओवाद्यांचे हल्ले सरकारी यंत्रणांवर आणि जंगल ठेकेदार / जमीनदार वगैरे धनदांडग्या वर्गावर होत असतात. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मान्य केले की देशाचा शत्रू क्रमांक एक म्हणजे माओवादी शक्ती होय. माओवादी चळवळीला एके काळी नक्षलवादी चळवळ म्हणत असत. ही चळवळ १९६७ मध्ये सुरू झाली होती. यथावकाश सरकारने चळवळ मोडून काढली. गेली काही वष्रे माओवादी शक्ती पुन्हा जोरात आल्याचे दिसते. या चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक राहुल पंडिता यांनी ‘हलो बस्तर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज माओइस्ट मूव्हमेंट’ पुस्तक लिहिले. मात्र यात ढोबळमानाने माओवाद्यांची भलामण केलेली आहे. राहुल पंडिता ज्येष्ठ पत्रकार असून ते ‘ओपन’ या मासिकात काम करतात. ते ‘द अब्सेन्ट स्टेट’ या गाजलेल्या पुस्तकाचे सहलेखक आहेत. त्यांनी या पुस्तकासाठी अनेक माओवाद्यांच्या मुलाखती घेतल्या. मात्र यात कोठेही सरकारची बाजू येत नाही. त्या अर्थाने हे पुस्तक एकांगी आहे.

 
ग्रंथविश्व : ‘बोफोर्स’ उजेडात येण्याआधी.. Print E-mail

alt

शनिवार, २८ एप्रिल  २०१२
भारताचे दिवंगत माजी गृहसचिव  बी. जी. देशमुख यांच्या 'A Cabinet Secretary Looks Backk' या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या अशोक पाध्ये यांनी केलेल्या ‘पुणे ते पंतप्रधानांचे कार्यालय’ या पुस्तकातील (प्रकाशक :  मेहता  पब्लिशिंग हाऊस) हा अंश.. बोफोर्स प्रकरण पुन्हा गाजत असताना वाचावा, असा..
‘पंतप्रधानांचे घर’ (PMH) याला परकीय चलन परस्पर मिळू शकते हे सारे मला एका वेगळ्याच घटनेमुळे कळले. पंतप्रधानांच्या घरातून अरुण सिंग यांची बदली संरक्षण मंत्रालयात झाल्यानंतर पंतप्रधानांचे संरक्षण करणाऱ्या दलावरती देखरेख ठेवण्याचे काम कॅबिनेट सेक्रेटरीकडून होऊ लागले.

 
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>

Page 3 of 4