संकलन : स्वानंद विष्णु ओक, रविवार, ९ सप्टेंबर २०१२
सरसंघचालकांचे संघावलोकन ‘लोकसत्ता- आयडिया एक्स्चेंज’मध्ये सरसंघचालक मोहन भागवतांनी संघाविषयीच्या मूलभूत माहितीसंबंधी एक निवेदन केले. त्याचा हा गोषवारा.. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या जीवनात देशाचे उत्थान हेच एकमेव लक्ष्य होते. देशाच्या भल्यासाठी होणाऱ्या प्रत्येक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असे.
|
संकलन : अभिजीत घोरपडे - रविवार, २६ ऑगस्ट २०१२
पश्चिम घाट परिसर अभ्यासाच्या समितीने सारे वास्तव अहवालात मांडून सूचना केल्या. केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांचा त्यात सहभाग होता. पण ते बदलून जाताच मंत्रालयाने अचानक ठरविले, आमचा अहवाल दडपून ठेवायचा. नव्या मंत्री जयंती नटराजन यांना विनंती केली, की मी तुम्हाला भेटू इच्छितो, म्हणजे या अहवालात काय आहे ते सांगता येईल, नंतर तुम्ही काय तो निर्णय घ्या. मात्र, त्यांनी भेट नाकारली.
|
संकलन: रोहन टिल्लू, सुनील नांदगावकर - रविवार, २४ जून २०१२
गाणं आपल्या मनात जन्मजात रुजलं आहे हे ध्यानी येताच, करायचं ते गाणंच, या ध्यासाने अजय-अतुल झपाटले गेले. लोकसंगीत ते सिनेसंगीत अशा अनेक ‘घराण्यां’तून त्यांनी गाणं शोषून घेतलं. त्यावर आपली सर्जनशील छाप कोरत, त्यामध्ये नवी ऊर्जा ओतत ते रसिकांपर्यंत पोहोचवलं. या जोडीचा हा सुरमयी प्रवास, त्यांच्यासमोर साकार होत जाणारं गाणं आणि रसिकांच्या मनावर थेट परिणाम करणारा त्यांच्या गाण्यामागचा ‘साऊंड’.. संगीत निर्मितीमधील अशा अनेक टप्प्यांविषयी ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’मध्ये संवाद साधला आज ‘साऊंड ऑफ महाराष्ट्र’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजय-अतुल यांनी..
|
संकलन : विरेंद्र तळेगावकर - रविवार, २७ मे २०१२
प्रशासकीय सेवेत तब्बल तीन दशकं अर्थतज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे डॉ. विजय केळकर यांनी ‘लोकसत्ता-आयडिया एक्स्चेन्ज’च्या व्यासपीठावर, आर्थिक मंदीतून बाहेर येण्यासाठी राजकीय पटलावर केवळ मोहरे बदलून चालणार नाही तर आर्थिक सुधारणाविषयीच्या चाली बदलण्याची गरज व्यक्त केली. १३ व्या वित्त आयोगाचं अध्यक्षपद भूषविणाऱ्या डॉ. केळकर यांनी अर्थतज्ज्ञीय चर्चेतून कररचनेतील सुधारणा हाच अर्थव्यवस्थेच्या विकासाचा खरा पर्याय असल्याची मांडणी केली. |
संकलन : प्रसाद मोकाशी, प्रसाद रावकर - रविवार, २९ एप्रिल २०१२
लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारेंनी सुरू केलेल्या जनआंदोलनाला एक वर्ष झाले. या वर्षभरात आंदोलनाने अनेक चढउतार पाहिले. आंदोलनाचा उद्देश, त्यातून मिळालेली शिकवण आणि आंदोलनाची पुढील दिशा याबाबत ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’मध्ये अण्णा हजारे यांनी संपादकीय विभागाशी मोकळेपणे संवाद साधला. भ्रष्ट व्यक्तीला शिक्षा देण्यापासून सुरू झालेले आंदोलन व्यवस्था बदलाच्या दिशेने कसे गेले, राजकीय नेत्यांची सेवा व सामाजिक कार्यकर्त्यांची सेवा यात काय फरक असतो, व्यवस्था बदलताना राजकीय नेत्यांशीही चर्चा का करावी लागते, अशा अनेक प्रश्नांबरोबर मौनाची उपयुक्तताही त्यांनी सांगितली.
|
संकलन: विनायक करमरकर, पावलस मुगुटमल - रविवार, १ एप्रिल २०१२
शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी ‘आयडिया एक्स्चेंज’च्या कार्यक्रमात बोलताना देशातील शेतीच्या स्थितीपासून ते राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांपर्यंत अनेक विषयांवर आपली स्पष्ट मते मांडली. शेतीमध्ये रस न राहिलेल्या सध्याच्या पिढीमुळे आणि शेतीला प्रोत्साहन न देण्याच्या सरकारी धोरणांमुळे देश महादुष्काळाच्या खाईत लोटला जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
|
अजित गुलाबचंद यांचे परखड मत संकलन : सचिन रोहेकर, रविवार, २६ फेब्रुवारी २०१२ महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची पायाभरणी करणाऱ्या मोजक्या कुटुंबसंस्थांमध्ये वालचंद हिराचंद समूहाचे नाव गेल्या तीन पिढय़ांपासून आदराने घेतले जाते. या उद्योगसमूहाने राज्याच्या औद्योगिक वाटचालीची दिशा आखून दिली, आणि वेगवेगळ्या उद्योगक्षेत्रांवर आपले नावही कोरले.
|
संकलन :रोहन टिल्लू, रविवार, २६ फेब्रुवारी २०१२ मीअभिनय करायला लागलो, तो काळ माझ्यासाठी फार मजेशीर आहे. लहानपणी शाळेत असताना मला नाटकं खूप आवडायची. शाळेत एका नाटकात भागही घेतला होता. पेरूगेटजवळची भावे हायस्कूल ही माझी शाळा.
|
संकलन : संदीप आचार्य - रविवार, २९ जानेवारी २०१२
गिरीश कुबेर-‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’मध्ये तुमचे स्वागत. तुमचा या एक्स्प्रेसच्या इमारतीशी तसा जुना संबंध आहे.. राज ठाकरे- ‘लोकसत्ता’मध्ये १९८६-८७ या दोन वर्षांमध्ये मी फ्रीलान्स कार्टुनिस्ट म्हणून काम केले. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर एक व्यंगचित्र मी काढले होते. ते माझे येथील शेवटचे व्यंगचित्र. नंतर घरी व्यंगचित्र काढायचो आणि येथे घेऊन यायचो.
|
भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांचे मुक्तचिंतन संकलन : केदार दामले, रविवार, १८ डिसेंबर २०११ गिरीश कुबेर - गडकरींचा कार्यक्रम कधी चुकवायचा नसतो. त्यांच्या एका कार्यक्रमात दोन कार्यक्रम असतात. जेवण आणि गप्पा. त्यांच्याकडे जेवायला जाण्यापूर्वी २४ तास आधी काहीही खायचं नसतं आणि दुसऱ्या राजकारण्याविषयी बोलायचे नसते.
|
लोकसत्ता-आयडिया एक्स्चेंज संकलन : संदीप आचार्य, रविवार, १३ नोव्हेंबर २०११
शिवसेनेविषयी कुणाला कुतूहल, कुणाला आपुलकी, तर कुणाला भीतीही वाटते.. आणखी पाच वर्षांनी शिवसेना पन्नास वर्षांची होईल. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी, ‘राडा संस्कृती’तून मुंबई, कोकण आणि महाराष्ट्रात मजबूत पाय रोवणारी संघटना ते राष्ट्रीय राजकारणातील प्रभावशाली राजकीय पक्ष अशी दमदार वाटचाल करताना बाळासाहेब ठाकरे यांनी ‘भगव्या’ला राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले. |
रविवार, २३ ऑक्टोबर २०११
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समाजातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या अकरा संस्था.. प्रत्येक संस्थेचे कार्यक्षेत्र भिन्न, त्यांच्या कामाचा परिघही भिन्न.. पण त्या प्रत्येक संस्थेला ‘लोकसत्ता’च्या ‘सर्व कार्येषु सर्वदा’ या उपक्रमाने एकत्र आणले.
|
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
Page 1 of 2 |