शनिवार, १० नोव्हेंबर २०१२
शॉपिंग हा तरूणांचा जिव्हाळ्याचा विषय असं म्हटलं जातं. परंतु असं अजिबात नाही. ‘शॉपिंग’हा अगदी लहानांपासून मोठय़ांपर्यंतचा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. पण अलीकडे शॉपिंगची व्याख्या मात्र बदलत चाललीय. ‘मॉल शॉपिंग’ हा शॉपिंग संस्कृतीच्या प्रगतीचा पहिला टप्पा. अद्ययावत शॉपिंगचा पुढील टप्पा म्हणजे-‘ऑनलाईन शॉपिंग’!! परदेशामध्ये ‘ऑनलाईन शॉपिंग’ हा अगदी सरावाचा भाग झाला आहे. |
प्रतिनिधी ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
उत्सव या चित्रपटात नखशिखांत सोन्याने मढलेली रेखा पाहिल्यावर सोन्याची हौस आपल्याकडे किती आहे हे लक्षात आलं. पण सोनं अंगावर घालण्यापेक्षा ते केवळ बघायलाच बरं असं म्हणणारे अनेक चेहरे समोर येतात. स्वत:च्या लग्नकार्यात किंवा सणासमारंभात मात्र हेच चेहरे डिझाइन्स सिलेक्ट करण्यासाठी हिरीरीने सहभाग घेताना दिसतात. |
बुधवार, १९ सप्टेंबर २०१२
सण हे आता पूर्वीसारखे राहिले नाहीत. ते खूप बदलले आहेत, हे वाक्य आपल्याला सतत ऐकायला मिळतं. काळ बदलला त्याबरोबर माणसाच्या जगण्याच्या व्याख्याही बदलल्या. मग त्यात सणही बदलणारच ना.. आता हेच बघा ना गणपती यायला अवघे तीन दिवस राहिल्यावर बाप्पांची सजावट कशी आणि काय करायची हा प्रष्टद्धr(२२४)ष्टद्धr(१३८) आपल्या सर्वानाच पडलेला आहे. दुकानात असलेल्या रेडिमेड मखरांकडे नजर वळत आहे. आपल्या बाप्पांची उंची किती, आकार किती, हे सर्व पाहून रेडिमेड मखर घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो. |
३१ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
केसात फूल माळणं म्हणजे आऊट ऑफ फॅशन झालेलं आहे. पण असं असलं तरी केसांमधील स्टाइलसाठी आजही फुलांचा वापर हा सर्रास केला जातो. ही फुलं प्लॅस्टिकची असोत अथवा ट्रान्सपरंट कपडय़ाची असो. केसात माळण्यासाठी फुलांचा उपयोग आजही केला जातोय फक्त थोडय़ा वेगळ्या पद्धतींनी. खास फुलांचे हेअरबॅंडस् सध्या इन फॅशन आहेत. |
प्रभा कुडके, शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
दागिने आणि स्त्रिया याचं नातं म्हणजे कधीही न तुटणारं. दागिन्यांच्या डिझाइन्स पाहताना वेळ कसा जातो हेच कळत नाही. दागिन्यांच्या डिझाइन्स आपल्या माहितीप्रमाणे अधिक म्हणजे किती असतील तर शंभर म्हणजे खूप झाल्या. पण यापेक्षा अधिक डिझाइन्स दागिन्यांमध्ये असतात बरं का.. काही लाखांमध्ये असलेल्या या डिझाइन्स पाहताना डोळ्याचं पारणं फिटतं. नुकत्याच मुंबईमध्ये झालेल्या आयआयजेडब्ल्यू या सोहळ्यात दागिन्यांचे वैविध्यपूर्ण डिझाइन्स पाहायला मिळाले. |
प्रतिनिधी ,शनिवार, ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्पा इंडस्ट्री ही अलीकडे फार मोठय़ा प्रमाणात वाढत असलेली दिसत आहे. डे स्पा शहरात ठिकठिकाणी आपल्याला दिसत आहेत. अनेकदा मनात या स्पा इंडस्ट्रीबद्दल विविध शंका असल्यामुळे आपण याकडे बघतही नाही. रोजची धावपळ आणि दगदग यामध्ये शरीराचे हाल खूप होतात. हा शिणवटा घालवण्यासाठी आणि थोडे स्वतचे लाड करून घेण्यासाठी स्पाची पायरी चढायला हरकत नाही. पॅम्पर करून घेणं हे केवळ लहान मुलांचं काम नाही तर पॅम्परिंग करण्याची खरी गरज आपल्या शरीराला आहे. रोजच्या धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनशैलीत शरीराला आणि मनाला उसंत मिळणंच कठीण झालेलं आहे.
|
शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रंग हे प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. फ्रेंडशिप डे जवळ आला की, कॉलेजच्या आजूबाजुच्या वातावरणाचेही रंग बदलतात. जवळपासच्या दुकानांमध्ये फ्रेंडशिप डेचे बॅण्ड दिसू लागतात. उद्या ऑगस्ट महिन्यातला पहिला रविवार. एव्हाना कॉलेजकॅम्पसमधल्या मुलांनी नवीन आलेल्या कुठल्या मुलीशी फ्रेंडशिप करायची हे ठरवलंच असेल की नाही.. असो मैत्रीला तसाही कुठला दिवस असा नसतोच. वर्षांतल्या ३६५ दिवसांपैकी कोणत्याही दिवशी आपल्या मैत्रीचा इजहार करू शकतो. |
शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
A friend is sweet when it is new. And it is sweeter when its true. But you know what? its sweetest when its you... |
अतुल माने ,शनिवार, २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रक्षाबंधन, भाऊ व बहिणीमधील निरागस आणि तरल प्रेमाचे अत्युच्च दर्शन घडविणारा एक सोहळाच. त्यामुळे यामध्ये भावाने बहिणीला प्रेमाने एखादी भेटवस्तू देणे ओघाने आलेच. अर्थात या भेटवस्तूच्या किमतीऐवजी त्याचे स्वरूप व प्रकार हा तसा अनेकांच्या दृष्टीने खूपच औत्सुक्याचा विषय असतो. सध्या बाजारात विविध प्रकारच्या ज्वेलरीपासून, परफ्युम्स, आकर्षक रंगसंगती असलेल्या पर्स, डीओ, तसेच इंडियन, वेस्टर्न प्रकारच्या कपडय़ांचा समावेश आहे. यातच सध्या विविध प्रकारच्या चॉकलेट्स तसेच कॅडबरी, डेअरी मिल्क व अन्य काही स्वीट्सचा समावेशही झाला आहे.
|
शनिवार, २१ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपल्याकडे आर्टिस्टच्या डोक्यातुन एखादी कल्पना अवतरली की त्या कल्पनेला लगेच उचलुन धरलं जातं. मध्यंतरी कॅलिग्राफी केलेले टी शर्ट अंगावर घालणं हे एक स्टाइल स्टेटमेंट होतं. पण कॅलिग्राफी केवळ टी शर्टपर्यंत मर्यादीत राहिली नाही तर, ही कॅलिग्राफी कुर्त्यांवरही अवतरली. खास आपल्याला हव्या त्या पद्धतीने कॅलिग्राफी करवुन घेणाऱ्यांची संख्या वाढली. |
शनिवार, १४ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पाऊस सुरू झाल्यावर किमान एकदा तरी पावसात मनसोक्त भिजावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण पाऊस पहिला असो किंवा श्रावणातील, पावसात भिजताना त्वचेची काळजी मात्र योग्यप्रकारे घ्यायला हवी. त्यासंदर्भातील काही टिप्स.. पावसाळ्यामध्ये शुष्क त्वचेवर डी-हायड्रेटिंगचा परिणाम आणि तेलकट त्वचेवर ओव्हर-हायड्रेटिंगचा परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. तुमची त्वचा सामान्य कोरडी असेल, तर तुम्ही क्रीम बेस्ड मॉईश्चरायजर किंवा रीच लोशनचा वापर केला पाहिजे. |
प्रतिनिधी - शनिवार, ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलींच्या संग्रहात कितीही खेळणी असली तरी बार्बीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. बार्बी या बाहुलीचे देखणेपण आजही अनेक मुलींना आकृष्ट करते. त्यामुळेच की काय आपल्या मुलीला बार्बी बनवता नाही आले तर किमान तिच्यासाठी बार्बीसारखे कपडे तरी घालता येतील याचा विचार अनेक पालक करु लागले आहेत. बार्बी या बाहुलीने लहानांसह मोठय़ांना प्रत्येकाला वेड लावलेले आहे. बार्बीचा सेट घरी असणे म्हणजे मुलींच्या दृष्टीने स्टेटस सिम्बॉल.. पण या बार्बीच्या सेटबरोबर बार्बीला घालण्याचे विविध ड्रेसेस आता बाजारात मिळु लागले आहेत. |
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
Page 1 of 2 |