|
भंडारदरा |
|
|
अभिजित बेल्हेकर - बुधवार, १० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पाऊस कोसळू लागला, की धरणे भरून वाहू लागल्याची छायाचित्रे सर्वत्र झळकू लागतात. मनात दडलेले पाण्याबद्दलचे कुतूहल चेहऱ्यावर आणत लोक ही छायाचित्रे आश्चर्याने पाहतात आणि जमल्यास हा आनंद घेण्यासाठी अशा एखाद्या धरणावरही जातात. पावसाळय़ात प्रत्येक धरणावरचाच हा देखावा. पण भंडारदऱ्यासारख्या धरणावर अधिक जिवंत होतो तो इथला निसर्गसौंदर्य! महाराष्ट्रात ब्रिटिशांनी जी काही मोजकी धरणे बांधली त्यापैकी एक भंडारदरा! नगर जिल्हय़ाच्या अगदी पश्चिमेला अकोले तालुक्यातील ऐन घाटमाथ्यालगतचा हा भाग. डोंगरदऱ्या, दाट जंगल, ऐतिहासिक गडकोट, आदिवासींच्या छोटय़ा छोटय़ा वाडय़ावस्त्या या साऱ्याच्या पाश्र्वभूमीवर हे धरण इथे साकारले आणि जणू इतके दिवस अपुरे असलेले एक निसर्गचित्रच पूर्ण झाले.
|
|
ट्रेक डायरी |
|
|
बुधवार, १० ऑक्टोबर २०१२ * रायरेश्वर सहल ‘निसर्ग दर्शन’तर्फे येत्या २७ व २८ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमेनिमित्त रायरेश्वर, कारी, आंबवडे अशा भ्रंमतीचे आयोजन केले आहे. रायरेश्वर पठारावरील शिवमंदिरामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. तर कारी येथे स्वराज्याच्या उभारणीत योगदान दिलेल्या कान्होजी जेधे यांची समाधी आहे. आंबेगाव येथील झुलता पूल, नागेश्वर मंदिर आदी स्थळे या सहलीत दाखवली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.
|
सहय़गिरीला साज रानफुलांचा! |
|
|
भाऊसाहेब चासकर - बुधवार, ३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पावसाळ्यातील भटकंतीत रानफुलांच्या वाटा पाहणे, अभ्यासणे हा अनेकांचा छंद असतो. शेकडो प्रजातींचा हा उत्सव या तीन महिन्यात साऱ्या सृष्टीला सजवून टाकतो. नाना रंग-नाना आकारांच्या या रानफुलांनी सध्या साऱ्याच रानवाटा सुंदर केल्या आहेत. या फुलांविषयीच या ‘ट्रेक-इट’मध्ये. सहय़ाद्रीचे उत्तुंग पर्वतमाथे, डोंगरसुळके, उरात धडकी भरविणाऱ्या या खोल खोल दऱ्या, उभे तुटलेले कडेकपारी.. जैववैविध्यानं नटलेली समृद्ध वनसंपदा, ऋतुमानाप्रमाणे रंग धारण करणारा निसर्ग.. वर्षांऋतूत सहय़गिरीच्या कुशीत थबथबणारा जलोत्सव!
|
|
‘कास’चे पुष्पवैभव |
|
|
भटकंतीचा सोबती फिरस्ता - बुधवार, ३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आता काही वर्षांपर्यंत भटकंती म्हटले, की ऐतिहासिक स्थळे नाहीतर आव्हान देणाऱ्या पर्वतरांगा यांच्या हिशेबाने खेळ चालू असायचा. पण आता या छंद-खेळातही फिटनेसपासून फोटोग्राफीपर्यंत आणि बुरशीपासून नक्षत्रांपर्यंत अशा अनेक विषय सामावले आहेत. अशा या बहुआयामी भटकंतीत आता रानफुलांच्या शोधात फिरणारेही अनेक जण आहेत. याच भटक्यांसाठी उपयुक्त ठरणारे पुस्तक लिहिले आहे, डॉ. संदीप श्रोत्री यांनी - ‘पुष्प पठार कास’!
|
दुर्गेंद्राच्या परिघात |
|
|
ओंकार ओक
सह्य़ाद्रीतील सर्वोच्च गिरिदुर्ग कोणता? या प्रश्नाचं उत्तर सदासर्वदा किल्ल्यांच्या वाऱ्या करणाऱ्या भटक्यांशिवाय कोणालाही चटकन देता येणार नाही.कारण महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचे आणि ट्रेकर्सचे जन्मजन्मांतरीचे नाते जडलेले आहे! नाशिक जिल्ह्य़ातील ‘साल्हेर’ हा महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला! ट्रेकिंग करतो आणि साल्हेरला गेला नाही असा गिर्यारोहक सापडणे जवळजवळ अशक्यच.महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसूबाई या नगर जिल्ह्य़ातील शिखराच्या खालोखाल उंचीच्या बाबतीत साल्हेरने बाजी मारलेली आहे.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>
|
Page 4 of 6 |