केजी टू कॉलेज
मुखपृष्ठ >> केजी टू कॉलेज
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

केजी टू कॉलेज
‘एसएमआरके’च्या संगीत विषयातील निकालाचा घोळ Print E-mail

*  ‘एसएनडीटी’चा गोंधळ
*  ऑक्टोबरसाठी अचानक बदलले परीक्षा केंद्र
प्रतिनिधी, नाशिक, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
एन.एन.डी.टी. विद्यापीठाच्या गोंधळामुळे येथील एस.एम.आर.के. महाविद्यालयातून संगीत विषयात पदव्युत्तर पदवीचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थिनींचे भवितव्य संकटात सापडले आहे.

 
चिरंतन शिक्षण : ‘टायगर वॉच’ची सर्वागीण शाळा Print E-mail

शैलेश माहुलीकर, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘फत्तेसिंग राठोड’ या इंडियन टायगर अशी उपमा असलेल्या टायगरच्या ‘टायगर वॉच’ची ही मन हेलावून सोडणारी शाळा..
फत्तेसिंग राठोड यांनी निवृत्तीनंतर ‘टायगर वॉच’ नावाची एक संस्था काढली. यामार्फत ते राजस्थानमधील रणथंबोर या जंगलातील वाघ व इतर प्राण्यांचे संवर्धन, शिकारीला आळा घालणे ही कामे करीत असत. काही वर्षांपूर्वी या संस्थेने रणथंबोरमध्ये शिकाऱ्यांच्या टोळीला पकडले. ‘मोग्या’ जमातीचे हे  शिकारी लोक. शिकारी असल्याने घरातील प्रत्येक माणूस शिकारीत सामील होता. त्यात अनेक मुले होती. ती अगदी निष्पापपणे आपल्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे वागत होती.
 
आमुची शाळा, आमुची आई! Print E-mail

लीलाधर हेगडे, रविवार, ७ ऑक्टोबर २०१२
शाळेत विद्यार्थ्यांनी यायचे ते आनंदासाठी. अभ्यास तर आहेच, पण त्यात मुलांना आनंद मिळायला हवा. चुनाभट्टीच्या ‘साने गुरुजी आरोग्य मंदिर’ या शाळेतील मुलं मनसोक्त खेळतात, नाचतात, गाणी म्हणतात आणि बक्षिसंही भरभरून पटकावतात. विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या हातून हे सहज व्हावे याची काळजी त्यांची ही ‘आई’ घेत असते.

 
सात पूल.. आणि त्यांच्यावरून जाणारा मार्ग Print E-mail

गेल्या वेळी बाईंनी दिलेलं कोडं कुणालाच सुटलं नव्हतं. शीतल म्हणाली, ‘‘आम्ही बराच प्रयत्न केला, पण प्रत्येक पूल एकदा आणि एकदाच ओलांडला जाईल, असा मार्ग काही मिळाला नाही.’’ ‘‘आपण पुन्हा प्रयत्न करून पाहू. मात्र मार्ग एका सोप्या रीतीने लिहू म्हणजे थोडय़ा जागेत तो मावेल व नीट लक्षात येईल,’’ असं म्हणून बाईंनी पुन्हा एकदा पुलांची आकृती काढली आणि अशोक व शीतलने मार्ग शोधायचा प्रयत्न करायचा असे ठरले. नदीच्या काठांना A  व  B अशी नावे दिली, तर मोठय़ा बेटाला  C आणि लहान बेटाला D नाव दिले.
 
ऑनलाईन शिष्यवृत्तीपासून महाविद्यालयीन विद्यार्थी वंचित Print E-mail

प्रतिनिधी ,वर्धा
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेली शिष्यवृत्ती ऑनलाइन करणाऱ्या राज्य शासनाचा निर्णय या संगणकीय पद्धतीतल्या त्रुटींमुळे विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी अडचणीचा ठरला आहे. दरम्यान, ही बाब मुख्यमंत्र्यांकडे उपस्थित करण्याचे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जिल्हा एन.एस.यू.आय.ला दिले आहे.     

 
‘एमफुक्टो’चे १० ऑक्टोबरला राज्यस्तरीय धरणे Print E-mail

प्रतिनिधी , नागपूर - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२
महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्यावतीने (एमफुक्टो) येत्या १० ऑक्टोबरला शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय धरणे देण्यात येणार आहेत.  महाराष्ट्रातील विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांसाठी महासंघ सातत्याने संघर्ष करीत आहे. मागण्यांच्या पूर्ततेसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनी लिखित मुदतबंद आश्वासने दिली होती म्हणून यापूर्वी मूल्यांकनावरील बहिष्कार आंदोलन मागे घेण्यात आले होते.

 
राज्यातील आणखी चार तंत्रशिक्षण संस्थांना ‘टेक्विप’ निधी मिळणार? Print E-mail

प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील आठ तंत्रशिक्षण संस्थांपाठोपाठ आणखी चार संस्थांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जागतिक बँकेच्या ‘तंत्रशिक्षण दर्जा सुधार योजने’अंतर्गत (टेक्विप) कोटय़वधींचा आर्थिक निधी उपलब्ध व्हावा यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

 
डी.एड. अभ्यासक्रमासाठी राज्यात विद्यार्थ्यांची वानवा! Print E-mail

राज्यभरात २३ हजार जागा रिक्त
सीईटीबाबत गेल्या दोन वर्षांत शासकीय आदेश नाहीत
प्रतिनिधी , पुणे

शिक्षण हक्क कायद्यानुसार महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर प्राथमिक शिक्षक सेवकांची पदे रिक्त असतानाही गेल्या दोन वर्षांमध्ये राज्य सरकारने सीईटी घेतलेली नाही. त्यामुळे शिक्षण शास्त्र पदविका अभ्यासक्रमाला (डी.एड) विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होत असून यावर्षी राज्यात २३ हजार जागा रिक्त आहेत.  राज्यात प्राथमिक शिक्षण सेवकांची भरती सामाईक प्रवेश परीक्षेच्या (सीईटी) माध्यमातून केली जाते. २०१० मध्ये राज्य सरकारने सीईटी घेऊन शिक्षण सेवकांची पदे भरली होती. मात्र, त्यानंतर गेल्या दोन वर्षांमध्ये राज्यसरकारने ही सीईटी घेतलेली नाही. त्याचवेळी, शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यात सध्या प्राथमिक शिक्षकांची मराठी माध्यमाची साडे सोळा हजार आणि उर्दू माध्यामाची एक हजार तीनशे वीस पदे रिक्त आहेत.
 
राज्यातील अभियांत्रिकीच्या रिक्त जागांची संख्या वाढतीच Print E-mail

* ४० हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता
* दुसऱ्या वर्षांच्या थेट प्रवेशाकडेही विद्यार्थ्यांचा ओढा कमी
रेश्मा शिवडेकर , मुंबई
alt

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांच्या रिक्त जागा आणि दुसऱ्या वर्षांसाठी मिळणारी वाढीव तुकडी यामुळे ‘थेट प्रवेश योजने’साठी उपलब्ध जागांची संख्या दरवर्षी वाढत असली तरी त्या तुलनेत विद्यार्थीच मिळत नसल्याने पहिल्या वर्षांप्रमाणे दुसऱ्या वर्षांच्याही अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. विद्यार्थ्यांअभावी या वर्षी दुसऱ्या वर्षांसाठीच्या तब्बल ४० हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
अभियांत्रिकी पदविकाधारकांना आणि बीएससी पदवीधरांना अभियांत्रिकी पदवीच्या दुसऱ्या वर्षांला थेट प्रवेश दिला जातो.
 
दहावी-बारावी परीक्षेसाठी अर्ज विक्री ५ ऑक्टोबर पासून Print E-mail

प्रतिनिधी , मुंबई

फेब्रुवारी व मार्च २०१३ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील शाळा व महाविद्यालयांमधील नियमित विद्यार्थ्यांसाठी (फ्रेश रेग्युलर) अर्जाची आणि बँक चलनाची विक्री शुक्रवारी ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
 
‘गेट वे’वर विद्यापीठातर्फे भजनसंध्या Print E-mail

गांधीजयंतीचे औचित्य
प्रतिनिधी ,मुंबई
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अहिंसा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देण्यासाठी आणि मूल्याधिष्टित जीवनप्रणालीचे महत्त्व पटवून देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने मंगळवार, २ ऑक्टोबर रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे भजनसंध्या हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर हे तीन हजार विद्यार्थ्यांना अहिंसेची शपथ देणार आहेत.

 
अकोल्याच्या गोयंका महाविद्यालयातील ९५ विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरीच Print E-mail

अन्य महाविद्यालयात स्थलांतरावर अद्याप निर्णय नाही
प्रतिनिधी
मुंबई, सोमवार, १ ऑक्टोबर २०१२
अकोल्याच्या जमनालाल गोयंका या खासगी दंत महाविद्यालयात शिकणाऱ्या ९५ विद्यार्थ्यांचे अन्य खासगी महाविद्यालयात अद्याप स्थलांतर न झाल्याने या विद्यार्थ्यांचे भवितव्य अजूनही अधांतरीच आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

Page 5 of 6

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो