|
मराठी सिनेमा उपायांचा पट हवा |
|
|
रविवार, २८ ऑक्टोबर २०१२
गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांच्या संख्येत वाढ झाली आहे. आशय-विषयदृष्टय़ा नव्या पद्धतीची हाताळणी करणारे निर्माते-दिग्दर्शकांची संख्याही वाढत आहे. तरी चित्रपट पूर्ण झाल्यानंतर प्रसिद्धी व विपणनासाठी पैसे शिल्लक राहात नसल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे चित्रपट मोठय़ा संख्येने प्रदर्शित होतात आणि काळाच्या पडद्याआड जातात. केवळ चार-पाच चित्रपट बॉक्सऑफिसवर यशस्वी होतात. बडय़ा हिंदी चित्रपटांशी स्पर्धा करताना चित्रपटगृहे मिळत नाहीत ही तर नेहमीची ओरड. तरीसुद्धा सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील वातावरण सकारात्मक आहे असे दिसते.
|
|
‘लोकसत्ता गणेश उत्सवमूर्ती स्पर्धे’चा पारितोषिक वितरण सोहळा ३० ऑक्टोबरला रंगणार |
|
|
प्रतिनिधी
‘लोकसत्ता गणेश उत्सवमूर्ती स्पर्धे’चा पारितोषिक वितरण सोहळा ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘जीवनगाणी’ प्रस्तुत ‘स्वर गजराज नाचतो’ हे या कार्यक्रमाचे आकर्षण असेल. नृत्यविष्कार आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश यात असणार आहे. ‘लोकसत्ता गणेश उत्सवमूर्ती स्पर्धे’त विजेत्या ठरलेल्या गणेश मंडळांना यावेळी पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. ‘मुंबईचा राजा’ म्हणून गौरविण्यात येणाऱ्या मंडळास ५१,००१ रूपये रोख, सन्मानपत्र व मानचिन्ह असे पारितोषिक देण्यात येणार आहे.
|
चित्ररंग : सहज सुंदर |
|
|
रोहन टिल्लू
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मराठी साहित्याला अनेक लेखकांनी समृद्ध केलं आहे. तर या साहित्यावर आधारित अनेक चित्रपट कलाकृतीही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्या. साहित्यावर आधारित चित्रपट अनेकदा फसल्याची उदाहरणेही आहेत. मात्र सुदैवाने वपुंच्या लोकप्रिय ‘पार्टनर’ या कादंबरीवरील ‘श्री पार्टनर’ या चित्रपटाबाबत तरी असं म्हणता येत नाही. हा चित्रपट अति उत्कृष्ट बनलेला नाही, हे खरं असलं तरी किमान एकदा तरी पाहावा, असा हा चित्रपट आहे.
|
|
शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या नवरात्रोत्सवात यावर्षी काश्मिरचा देखावा |
|
|
ठाणे, रविवार, २१ ऑक्टोबर २०१२
नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या आणि आकर्षक भव्य देखाव्याची दिमाखदार परंपरा असलेल्या ठाण्यातील शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने यंदा आपल्या उत्सवासाठी काश्मिरचा देखावा साकारला आहे. यंदा दुर्गामातेच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काश्मिरमधील कोंसरनाग तलावाची अप्रतिम प्रतिकृती साकारली जात असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष आणि ठाणे महानगर पालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी दिली. या पत्रकार परिषदेला सन्मानीय नगरसेविका तेजस्विनी किरण चव्हाण उपस्थित होते.
|
शिवनेरी सेवा आता स्वारगेटसाठी |
|
|
प्रतिनिधी
दादर-पुणे प्रमाणेच एसटी आता दादर-स्वारगेट दरम्यान १ नोव्हेंबरपासून शिवनेरी बससेवा सुरू करीत आहे. वातानुकूलित शिवनेरी बसच्या १२ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. दादरहून सकाळी ६, ७, ८, १० आणि ११ वाजता तसेच सायंकाळी ७ आणि रात्री ८ वाजता तर स्वारगेट बसस्थानकावरून दुपारी १२, २, ३, ४ आणि सायंकाळी ६ वाजता या बसेस सोडण्यात येणार आहेत.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 4 of 21 |