रविवार वृत्तान्त
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

रविवार वृत्तान्त‘मल्टिस्क्रीन’पुढे एक पडदा Print E-mail

चित्रपटगृहे झाली बापुडवाणी

दयानंद लिपारे
‘मल्टिस्क्रीन’ चित्रपटगृहांतील झगमगाटाच्या पाऊलखुणा दिसू लागल्यावर मराठी चित्रपटगृहांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरातील डझनभर एक पडदा (सिंगल स्क्रीन) चित्रपटगृहे बापुडवाणी होऊन सध्या उभी आहेत.
मल्टिस्क्रीनच्या स्पर्धेचा सामना करायचा म्हटला तरी एक पडदा चित्रपटगृहांची सारी यंत्रणा, ताकद अपुरी पडत आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी चित्रपटगृहांचे आधुनिकीकरण करायचे, तर किमान ५० लाखांची गुंतवणूक हवी आहे.
 
चित्रपटगृहांकडे प्रेक्षकांची पाठ Print E-mail

हर्षद कशाळकर

वाढती पायरसी आणि राज्य सरकारचे उदासीन धोरण यामुळे राज्यातील चित्रपटगृह व्यवसाय अडचणीत सापडला आहे. दिवसेंदिवस कमी होणारी प्रेक्षकांची संख्या आणि वाढती पायरसी ग्रामीण भागातील चित्रपटगृह व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. जिल्ह्य़ातील अनेक चित्रपटगृह अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते आहे.
 ग्रामीण भागातील मनोरंजनाचे साधन म्हणून पूर्वी चित्रपटगृहे ओळखली जायची. काळ बदलला तशी नवनवीन मनोरंजनाची साधने बाजारात उपलब्ध झाली.
 
चित्ररंग : जाणीव आत्मशोधाची.. Print E-mail

सुनील नांदगावकर

भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबाचा केंद्रबिंदू असलेली मध्यमवयीन गृहिणी ही चांगली बायको, चांगली सून, चांगली आई अशा विविध भूमिका पार पाडण्यासाठी झटत असते. कुटुंबातील सर्वाचे प्रेमाने करताना स्वत:च्या आवडीनिवडींना मुरड घालते. अशाच एका शशी गोडबोलेची गोष्ट दिग्दर्शिकेने अतिशय प्रभावी पद्धतीने पडद्यावर मांडली आहे. ‘स्व’चे अस्तित्व, आत्मशोधाची जाणीव शशी गोडबोलेला होते आणि विशेषत: तिचा नवरा आणि मुलगी यांनाही त्याची जाणीव करून देण्यात ती यशस्वी ठरते.
 
स्क्रिन प्रिव्ह्यू : ‘इंग्लिश विंग्लिश’मुळे प्रचंड आत्मविश्वास मिळाला -श्रीदेवी Print E-mail

प्रतिनिधी

‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटाला इतका चांगला प्रतिसाद मिळेल, याची मी अपेक्षाच केली नव्हती. या चित्रपटाने मला प्रचंड आत्मविश्वास मिळवून दिला. टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वेळचा अनुभव आहे. चित्रपट संपला म्हणून आम्ही त्या सभागृहातून बाहेर पडण्यासाठी उठलो, पण तिथला एकही माणूस उठायला तयार नव्हता. तिथे काय चालले आहे हे पहिल्यांदा आम्हाला लक्षातच येत नव्हते. सगळे प्रेक्षक सभागृहात टाळ्या वाजवत बसले होते.
 
नाट्यरंग : प्रेक्षकशरण ‘घालीन लोटांगण’! Print E-mail

रवींद्र पाथरे

एकीकडे आधुनिक जीवनशैलीचा अंगीकार करून भौतिक सुखोपभोग अधाशीपणे ओरबाडणारा आणि त्याचवेळी भंपक बाबा- बुवा- बापू- महाराजांच्या कच्छपि लागलेला आजचा भोंदू, दांभिक समाज आणि त्याच्या मूर्खपणाचा फायदा उठवत अध्यात्माची दुकानं टाकणारे बुवा-महाराज, तसंच या भोंदू बाबा-बुवांचा आणि त्यांच्या अंध भक्तीत मश्गुल असलेल्या भक्तांचा ‘वापर’ करून आपल्या स्वार्थाची पोळी भाजून घेणारे धूर्त, मतलबी राजकारणी आणि लोकांच्या तथाकथित भल्याचा मक्ता घेतलेल्या आणि ‘सोयी’स्कर समाजसेवा करणारे गणंग समाजसेवक यांनी सध्या आपल्याकडे भलताच धुमाकूळ घातलाय.
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 7 of 21