संजय उवाच
मुखपृष्ठ >> संजय उवाच
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

संजय उवाच
संजय उवाच : ॐ धन्वंतराय नम: Print E-mail

डॉं.संजय ओक, रविवार ११ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

दिवाळीचा प्रारंभ म्हणजे धन्वंतरी पूजन. हिंदू धर्मानुसार प्रत्येक सणाच्या प्रत्येक दिवसाला एक आगळे महत्त्व आहे. धन्वंतरी हा तर देवांचा वैद्य. क्षीरसागराच्या मंथनातून समुद्रातून निर्माण झालेला. मंदार पर्वताची रवी.. वासुकी सर्पाची दोरी.. अमृतकुंभाच्या प्राप्त्यर्थ वेडावलेले देव-दानव आणि सागराच्या उदरातून बाहेर पडणारी अमोल रत्ने.. ऐरावत, लक्ष्मी आणि तिच्यापाठोपाठ तिचा सहोदर धन्वंतरी.
 
संजय उवाच :व्रत लिहिण्याचे Print E-mail

डॉं.संजय ओक, रविवार ४ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

गेल्या काही दिवसांत वसंत लिमये यांनी लिहिलेले ‘लॉक ग्रिफीन’ नावाचे पुस्तक वाचले. कादंबरी आहे. स्कॉटलंड, नासा, वॉशिंग्टन, काश्मीर अशा वेगवेगळ्या ठिकाणांमधून या कादंबरीचा प्रवास होतो. कथानक तर वाचकाला खिळवून ठेवतेच, पण मला सर्वात भावले ते वेगवेगळ्या ठिकाणांचे, तेथले रस्ते-रचना, खाणाखुणा यांचे लेखकाने केलेले वर्णन.
 
संजय उवाचा - दो वक्त की रोटी Print E-mail

  alt

डॉं. संजय ओक , रविवार , २८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘सर, १६ ऑक्टोबरला जागतिक ब्रेड दिवस आहे, त्याच्या उद्घाटनाला तुम्ही अगत्याने या,’ आमच्या हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे विद्यार्थी मला आग्रह करीत होते आणि १६ ऑक्टोबर म्हणजे जागतिक ब्रेड दिवस-  World bread day ही माझ्या ज्ञानात नवीन भर पडत होती.
के. ई. एम. रुग्णालयात काम करताना अनेक वर्षांच्या खंडानंतर चपात्या बनवण्याचे नवीन मशीन तयार करून आम्ही रुग्णांना दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात चपात्या द्यायला प्रारंभ केला होता, हे आठवले आणि माणसाच्या आयुष्यातल्या चटक्यांची साथसंगत करणाऱ्या या भाकरीचं अन् माणसाचं नातं किती जुनं आहे, याची प्रचीती आली.

 
संजय उवाच : प्रगतिपत्रक Print E-mail

डॉ. संजय ओक ,रविवार,२१ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

आठवडय़ाच्या प्रारंभापासून विविध क्षेत्रांतील नोबेल पारितोषिके जाहीर व्हायला लागली आहेत. यंदा वैद्यकीय क्षेत्राचे नोबेल पारितोषिक ग्रेट ब्रिटनच्या जॉन गुरडॉन हे ७९ वर्षांचे संशोधक आणि शिन्या यामानाका हे जपानी शास्त्रज्ञ यांच्या जोडगोळीला त्यांच्या स्टेम सेल्सबद्दलच्या मूलभूत संशोधनासाठी मिळाले आहे.
 
संजय उवाच : ‘नवरात्र’ Print E-mail

डॉ. संजय ओक ,रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

गणपती गेले की ‘चैन पडेना आम्हाला’ या आपल्या मन:स्थितीतून बाहेर येऊन आपल्याला नवरात्रीचे वेध लागायला लागतात. हिंदू परंपरांमधल्या या सणांचे मला भारी अप्रूप आहे. ते कधी आम्हाला मोकळे-ढाकळे ठेवत नाहीत. एक सरतो तर दुसरा पुढे सरकतो. स्टेशनवर ‘जानेवाली गाडीचा’ शेवटचा डब्बा पुढे गेल्याक्षणी त्याच रुळावर पुढच्या गाडीचा ‘एमु’ (EMU) दिसल्यावर जसा आनंद होतो तसाच हा प्रकार.

 
संजय उवाच : बदल Print E-mail

डॉ. संजय ओक , रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

आयुष्यामधील होणारा कोणताही बदल हा जीवनातील एक मलाचा दगड ठरतो. मग तो बदल व्यक्तीच्या राहणीमानातला असो, काम करण्याच्या ठिकाणी असो किंवा कामाच्या पद्धतीमध्ये असो; माणसाचे मन बदल चटकन् स्वीकारत नाही, हेच खरे. कारण वर्षांनुवर्षें चालत आलेल्या गोष्टींची त्याला सवय झालेली असते. त्याच्या मनाचा विरोध हा पडलेल्या सवयींना मोडण्यासाठी असतो.

 
संजय उवाच : ‘देवा गजानना’ Print E-mail
alt
डॉ. संजय ओक , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
हा लेख छापून येईल तेव्हा तुम्ही बहुधा परतण्याचा प्रवासात असाल. तुमच्या पुढे काय मागायचं? आमचं सारं अस्तित्व तुमच्या कृपाप्रसादावर अवलंबून, जगणं महाग आणि मरण स्वस्तं झालंय खरं आजच्या युगात. लांब आयुष्य तरी कशासाठी मागायचं? जेव्हा प्रेम कमी अन् हेवादावा जास्त, जेव्हा आपुलकी आटलेली आणि आप-पर भाव मात्र वाढलेला अशी रोजची अवस्था झालेली; अशा या जगात नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी हात पुढे पसरायचा? पण मागायची सवय काही जात नाही आणि देणारा दाता तुमच्यासारखा प्रेमळ असेल तेव्हा हात पसरला जाणारच. पण देवा लई नाही मागणं आता!

 
संजय उवाच : दिवस गणपतीचे! Print E-mail

डॉ. संजय ओक रविवार, २३ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

हे दोन आठवडे गणेशोत्सवाचे.. धामधुमीचे.. सजावटीचे.. आरत्यांचे.. मिरवणुकींचे.. ढोल-ताशांचे.. गुलालाचे.. प्रसादाचे.. मोदकांचे आणि स्नेही-आप्तेष्टांच्या घरी ‘आमच्या गणपतीला या हं’ या प्रेमभऱ्या आमंत्रणाला मान देण्याचे. हिंदू धर्मातली माझी सर्वात आवडती गोष्ट म्हणजे सणांची रेलचेल. दिवाळी अर्थातच सणांचा राजा. पण सामूहिकरीत्या साजरे करण्याचा अग्रपूजेचा मान गणोबालाच!
हा माझा सर्वात लाडका देव आहे. रेघोटीला गोलत्व प्राप्त झाले की त्यात हा दिसू लागतो.
 
संजय उवाच : समजावताना.. Print E-mail

डॉ.संजय ओक,- १६ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

रेव्ह पार्टी.. थर्टी फर्स्टची रात्र..गटारीचे सेलिब्रेशन..अशा बातम्या आता आपल्याला नवीन राहिलेल्या नाहीत, पण गेल्या काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात वाचलेल्या लहान मुलांच्या ‘चिल्लर पार्टीने’ मात्र माझ्या पायाखालची जमीन हादरली. पार्टी..मद्भरी आणि तीही थोडय़ाथोडक्या नाही तर सहाशे-सातशे शाळकरी वयांच्या मुलांची..ज्या वयात मदानात हुंदडायचे..ज्या वयात थोरामोठय़ांची चरित्रे वाचायची.. ज्या वयात सद्गुणांचा वारसा स्वीकारायचा त्या वयात मद्याची आणि नशेची चव..आणि तीही समूहाने? नशाच हवीय नं मग ती चांगल्या कामाची का नको?
 
संजय उवाच : मेडिकल कॅम्प्स आणि मी! Print E-mail

डॉ.संजय ओक,रविवार ९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

पावसाळा जवळ आला की, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला जलजन्य आजारांची चिंता भेडसावू लागते. रुग्णालयाची ओ.पी.डी. माणसांनी फुलून जाते. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची शटर्स रात्री बारा-बारा वाजेपर्यंत खुली राहू लागतात. अत्यवस्थ रुग्णांना घेऊन धावणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्सेसना सुगीचे दिवस येतात, पण आय.सी.यू.ची बेड मिळणे दुरापास्त होते.मध्यमवर्गीयांचे महिन्याचे बजेट कोलमडते.औषधांची खरेदी चार आकडय़ांत जाऊन पोहोचते आणि हे सगळं होतं,
 
संजय उवाच , कथा प्रसूतीची..व्यथा व्यवस्थेची.. Print E-mail

डॉ. संजय ओक , रविवार , २ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

परवा ‘मेडिकल टाइम्स’ मध्ये छापून आलेल्या बातमीने मी अंतर्मुख झालो. बातमी दिल्लीची होती. मेट्रो रेल्वेमध्ये एका गर्भवती स्त्रीने मुलीला जन्म दिला होता. बाळ-बाळंतीण सुखरूप होत्या. मेट्रोने सगळा खर्च उचलला आणि मेट्रोत जन्मल्यामुळे तिचे नाव ‘मत्री’ ठेवण्यात आले आणि ती दिल्ली मेट्रो रेल्वेची ‘मॅस्कोट’ होईल असा निर्णय घेतला. रेल्वे अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या सहानुभूतीबद्दल कौतुक व्यक्त करावे की, आपल्या देशातल्या गर्भवती स्त्रियांच्या विद्यमान अवस्थेमुळे काही मूलभूत प्रश्नांना हात घालावा, या द्विधा अवस्थेत मी सापडलो.
 
संजय उवाच : गरज बरस.. Print E-mail

२६ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नांदेड शाखेने आयोजिलेला कार्यक्रम आटोपून मी मुंबईला परतत होतो. सकाळची दहाची वेळ. मुंबईत पाऊस असल्याची वार्ता नांदेड विमानतळावरच मिळाली होती. मुंबईजवळ आल्यावर विमान ३२ हजार फुटांवरून खाली खाली उतरू लागले आणि एक अतिशय विलोभनीय दृश्य मला पाहायला मिळाले. खिडकीच्या बाहेर नजर टाकली तर स्वच्छ; मोकळे आकाश होते. अंधाराचा लवलेशही नव्हता. सूर्यप्रकाशाने आसमंत उजळून टाकला होता. खाली पाहावे तर कापूस िपजून त्याचे ढीग लावावेत तसे पांढरेशुभ्र ढग. कुठे विरळ, तर कुठे अगदी घनदाट. पांढऱ्या ढगांच्या गालिचावरून जणू विमान चालले होते आणि हा गालिचा डागाळू नये म्हणून त्याने आपले पाय पोटात ओढून घेतले होते.
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो