शब्दांकन : विष्णू जोशी, रविवार ,२१ ऑक्टोबर २०१२
ज्येष्ठ कथा, कादंबरीकार आणि कवी बाबाराव मुसळे यांच्या ‘हाल्या हाल्या दुधू दे’, ‘पखाल’, ‘वारूळ’ यांसारख्या कादंबऱ्यांनी समाजमन ढवळून निघाले आहे. शोषणाला उजागर करत वाचकांच्या मनाचा ठाव घेणे हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्टय़. अलीकडेच त्यांची ‘स्मशानभोग’ ही आगळयावेगळया विषयावरची कादंबरी कीर्ती प्रकाशनाने प्रकाशित केली आहे. त्यानिमित्ताने .. |
प्रवीण दशरथ बांदेकर ,रविवार ,७ ऑक्टोबर २०१२
रमेश इंगळे उत्रादकर लिखित ‘सर्व प्रश्न अनिवार्य’ या कादंबरीस यंदाचा अनुष्टुभ प्रतिष्ठानचा विभावरी पाटील वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार आज (७ ऑक्टोबर रोजी) मुलुंड येथील मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्र येथे ज्येष्ठ लेखिका अंबिका सरकार यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने.. |
रविवार , ३० सप्टेंबर २०१२ गायिका डॉ. शोभा अभ्यंकर यांचे ‘शब्दसुरांचा अद्भुत प्रवास- सखी, भावगीत माझे’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश.. ती सच्या दशकात जसं भावगीत महाराष्ट्रात सुरू झालं, ध्वनिमुद्रणातून स्वतंत्र, लोभस असा सुगम संगीताचा एक वेगळा शब्दप्रधान आणि भावप्रधान गायकीचा आविष्कार झाला, तसाच कोलकात्यात गैरफिल्मी गीताचा उदय झाला. १९३१ सालापासून बोलपटामुळे चित्रपट संगीत साकारत होतं. शास्त्रीय बंदिशींपासून दूर राहणाऱ्या सामान्य रसिकांना हा सुंदर पर्याय मिळाला होता. परिवर्तनाच्या या संधिकाळात कोलकात्यात कमल दासगुप्तांनी गैरफिल्मी गीतांची कवाडं खुली केली. गैरफिल्मी गीताचे लोकप्रिय गायक जगमोहन यांनी लिहिलं आहे की, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांची रवींद्र संगीतात गुंफलेली बंगाली गीतं लोकप्रिय होती, पण ती बंगाली भाषकांपर्यंत सीमित होती.
|
कवी वसंत बापट - १६ सप्टेंबर २०१२
कालिदास प्राचीन नाही, मध्ययुगीन नाही. तो ‘होऊन गेलेला’ नाही. तो ‘आहे तसाच’ आहे. तो काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. तो एका प्राचीन भाषेच्या नागमंडलात खिळलेला नाही. तो कालनिरपेक्ष आहे. ‘मेघदूत’ निर्माण करणाऱ्या कालिदासाची पदवी तरी कशी ठरवावी? तो निसर्गाकडून पाठ घेणारा आणि पाठ देणारा नाही. तो केवळ प्रेमिकही नाही. मग त्याचे सृष्टीशी नाते तरी काय? सर्व नात्यांपलीकडचे त्याचे नाते अवघ्या आसमंताशी आहे. तो आणि निसर्ग असे द्वैत मुळातच मावळलेले आहे. उरले आहे फक्त तादात्म्य.. |
माधुरी पुरंदरे
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मुलांच्या भाषाविकासासाठीचा ‘लिहावे नेटके’ हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ज्योत्स्ना प्रकाशनाने तो पुस्तकरूपात प्रकाशित केला. या प्रकल्पाचा पुढचा टप्पा होता प्रशिक्षणचा! वनस्थळीच्या ज्या शिक्षिका प्रत्यक्ष मुलांबरोबर या पुस्तकांचा वापर करणार होत्या, त्यांना प्रशिक्षित करताना आलेल्या अनुभवांविषयी..
|
डॉ. सोमनाथ कोमरपंत , रविवार १२ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कोकणी-मराठी कथा-कादंबरीकार महाबळेश्वर सैल यांची ‘तांडव’ ही नवी कादंबरी एकाच वेळी कोकणी व मराठीत प्रसिद्ध होत आहे. गोव्यातील पोर्तुगीज राजवटीत हिंदूंच्या जबरदस्तीने झालेल्या धर्मातराने एक मोठा लोकसमूह आपल्या मुळांपासून कसा उखडला गेला, त्या उलथापालथीची ही शोकात्म कहाणी. राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झालेल्या या कादंबरीनिमित्ताने महाबळेश्वर सैल यांच्याशी त्यांच्या लेखनाबद्दल केलेल्या या मनमोकळ्या गप्पा.. |
विष्णू जोशी ,रविवार २४ जून २०१२
मराठवाडय़ातील कवी दासू वैद्य यांची कविता ही सर्वसामान्यांच्या जगण्याचा उद्गार आहे. ग्रामसंस्कृती तसंच लोकपरंपरांचं उपजतच आकर्षण त्यांना आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘तुकाराम’ चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखनही केले आहे. ‘तूर्तास’नंतरचा त्यांचा दुसरा कवितासंग्रह लवकरच पॉप्युलर प्रकाशनतर्फे प्रसिद्ध होत आहे. त्यानिमित्ताने दासू वैद्य यांच्या कविता, गीते आणि अभंगांचा घेतलेला हा परामर्ष..
|
रविवार, २० मे २०१२
लोकवाङ्मयगृहातर्फे प्रकाशित होत असलेल्या ‘डाकीण- एक अमानवी प्रथा’ या संध्या नरे-पवार लिखित पुस्तकात नंदुरबार, धुळे, ठाणे, रायगड या महाराष्ट्रातील जिल्ह्य़ांमध्ये आजही आदिवासी समाजात ठाण मांडून असलेल्या डाकीण प्रथेचा आणि त्यानिमित्ताने मानवसमाजाच्या इतिहासात ही अघोरी प्रथा कशी जन्माला आली, तिची पाळंमुळं, तिचा सर्वदूर प्रसार, त्यातून पुरुषप्रधान व्यवस्थेद्वारे स्त्रीजातीचं होणारं दमन, शोषण याचा सर्वागीण वेध घेण्यात आलेला आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील काही अंश.. |
रविवार २९ एप्रिल २०१२ शब्दांकन : विष्णू जोशी
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
१९९३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘राघववेळ’ या नामदेव चं. कांबळे यांच्या कादंबरीला १९९५ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. २००९ साली या कादंबरीचा जगत देबनाथ यांनी साहित्य अकादमीच्या वतीने ‘रघबेर दिनरात’ या नावाने बंगालीमध्ये अनुवाद केला. अलीकडेच या अनुवादित कादंबरीलाही २०११ सालचा बंगाली अनुवादासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. या दुहेरी सन्मानाच्या निमित्ताने ज्येष्ठ कादंबरीकार नामदेव चं. कांबळे यांनी व्यक्त केलेले मनोगत.. |
सुमती लांडे, रविवार १५ एप्रिल २०१२
साऱ्याच जखमा खपली धरत नसतात आणि खपली पडली तरी कायमसाठीचे व्रण उरतातच. अशा जखमा क्वचित आयुष्यभराकरता ऋणाईत करून ठेवतात. कोलतेसरांनी ‘कमळकाचा’तल्या शब्दांना दिलेल्या आकारांनी मला असंच ऋणाईत करून ठेवलं.. |
रविवार ८ एप्रिल २०१२
कोकण- मुंबई- अहमदाबाद असा प्रवास करत ज्येष्ठ टॅपेस्ट्री चित्रकार प्रभाकर नाईक-साटम अखेरीस जपानमध्ये स्थायिक झाले आणि तिथे धाग्यांद्वारे कापडी चित्रकृती साकारण्यात रममाण झाले. त्यांचे ‘झल्लाळ’ हे आत्मकथन ‘अनुभव-अक्षरधन’ प्रकाशनातर्फे नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यातील हा संपादित अंश.. जपानी पत्नीसोबत सुखाने चाललेल्या आपल्या संसाराबद्दलचा.. काझूकोची आणि माझी ओळख त्याकाळच्या झेकोस्लोव्हाकिया आणि आजच्या झेक रिपब्लिक या देशात झाली. डमझूम महाविद्यालयात एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी आम्ही दोघेही शिकायला होतो. |
शब्दांकन - विष्णू जोशी - १८ मार्च २०१२
ऐश्वर्य पाटेकर यांच्या ‘भुईशास्त्र’ या काव्यसंग्रहाला अलीकडेच ‘साहित्य अकादमी’चा युवा पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्ताने ‘भुईशास्त्र’च्या निर्मितीप्रक्रियेविषयी कवीने व्यक्त केलेले मनोगत. अलीकडेच ‘साहित्य अकादमी’चा युवा पुरस्कार माझ्या ‘भुईशास्त्र’ काव्यसंग्रहास जाहीर झाला. ज्येष्ठ समीक्षक डॉ. म. सू. पाटील यांचा फोन आला. ‘‘पोरा, इतिहास घडविलास. |
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
Page 1 of 2 |