सुरेश परुळेकर ,रविवार ९ सप्टेंबर २०१२ पहिल्या शब्दांच्या ‘ह’च्या बाराखडीतील समानार्थी शब्दांशी जोडी जुळवा. |
मृणाल तुळपुळे ,रविवार,२ सप्टेंबर २०१२
लाल समुद्राकाठच्या कपारीत बरेच खेकडे राहात असत. त्यात चार-पाच लहान खेकडे होते. ते नेहमी वाळूत लपाछपी आणि पकडापकडी खेळत. तिथे सापडणारे लहान लहान किडे शोधणे, हा तर त्यांचा अगदी आवडता उद्योग होता.एके दिवशी लहान खेकडे वाळूत खेळत असताना त्यांची आई-असमा त्यांचा खेळ बघत उभी होती. तेवढय़ात तिचे लक्ष पाण्याच्या दिशेने चाललेल्या बगळ्याकडे गेले. |
मेघना जोशी ,रविवार,२ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अनेक वर्षे काशीयात्रेला जाऊन पुण्य मिळविण्याची सुप्त इच्छा मनात बाळगून असणाऱ्या आपल्या आईवडिलांची ती इच्छा पूर्ण करण्याचा श्रावणाने चंगच बांधला होता. त्या काळी काशीयात्रा हे अत्यंत अवघड काम होते. त्यासाठी मैलोन्मैल प्रवास करावा लागे, तोसुद्धा पायी. पण श्रावण जिद्दीलाच पेटला होता. |
लता ,रविवार,२ सप्टेंबर २०१२
पावसाविषयीचे आपल्या हवामान खात्याचे अंदाज नेहमीच हास्याचा विषय ठरतात. परंतु निसर्गाने या पावसाचा अंदाज वर्तविण्याची सोय केली आहे, याचं गुपित उलगडलं आहे ‘गोष्ट पावसाची’ हे विलास गोगटे यांच्या पुस्तकात. यंदा पाऊस कसा पडणार, कधी पडणार याच्या सूचना निसर्ग आपल्याला देत असतो, परंतु त्याकडे पाहण्याची क्षमता आपल्यात नाही, कारण आपण निसर्गापासून अधिकाधिक दूर चाललो आहोत. अनेकदा आपले आजी-आजोबा वातावरणातील बदलामुळे किंवा विशिष्ट पक्षी-किडय़ांच्या हालचालींवरून ‘पाऊस पडेल हो’ |
रविवार,२ सप्टेंबर २०१२
चिव चिव करीत चिमणी आली बाहुलीचा घास घेऊन गेली बाहुलीचा माझ्या भलता राग रडता रडता पाही आकाशात चिऊताई बाई किती लबाड |
मनाली रानडे ,रविवार,२ सप्टेंबर २०१२ सोबतच्या चौकटीत तुम्हाला काही समीकरणे दिली आहेत. त्यातील A, B व C यांच्या किमती शोधून त्या चौकटीत भरायच्या आहेत. त्या शोधण्यासाठी आमची तुम्हाला थोडी मदत. A, B व C या तीनही एक अंकी मूळ संख्या आहेत.
|
शुभदा साने - २६ ऑगस्ट २०१२
त्यादिवशी संध्याकाळी नेहा आणि गौरव शाळेतून आले ते मुळी भांडतच! आल्या आल्या गौरव म्हणाला, ‘आई, ही नेहा बघ की गं कशी आहे..’ ‘अरे, काय केलं तिनं?’ तिला ना मला बक्षीस मिळालेलं बघवतच नाही. अगदी वाईट्ट आहे ती! ‘असं काही नाही गं आई! न बघायला काय झालं? फक्त मी काय म्हणतेय-’ ‘आई, तिचं काही ऐकू नकोस गं!’ |
लता दाभोळकर - २६ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘त्या एका दिवशी’
माधुरी पुरंदरे यांचं सकस बालसाहित्य बालमनाबरोबरच मोठय़ांनाही समृद्ध करणारं आहे. गोष्टींमधून लहानग्यांचं मन अलवारपणे टिपण्याचं आणि त्यांना उत्तम चित्रांची जोड देण्यात त्यांचा हातखंडाच! लहानांसाठीची त्यांची पुस्तकं मोठय़ांनाही हवीहवीशी वाटतात, वाचावीशी वाटतात. अनोख्या चित्र व लेखनशैलीने मराठी बालसाहित्यात त्यांनी आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. ज्यांना माधुरी पुरंदरेंच्या बालसाहित्याची सफर घडली आहे, अशी मंडळी त्यांच्या नव्या पुस्तकाच्या प्रतीक्षेत असतात. |
वर्षां मारुती भिसे - २६ ऑगस्ट २०१२
झाडावर भरली एकदा चिमण्यांची शाळा फांद्यांची लेखणी होती आकाशाचा फळा! चिमणाराजा मास्तर होते शिकवत छान मुलांना |
पु. ग. वनमाळी - २६ ऑगस्ट २०१२
एका चिमणीला लागली तहान, शोधलं तिनं डबकं लहान. पाणी पिताना फिसकला पाय |
म. अ. खाडिलकर , रविवार १९ ऑगस्ट २०१२ पुरातनकाळी आजच्यासारख्या शाळा नव्हत्या. गुरुगृही राहायचं, त्यांच्या घरात पडेल ते काम करायचं आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणा देऊन घरी परतायचं, अशी त्यावेळी पद्धत होती. अशाच एका ऋषीकडे काही मुलं अध्ययनासाठी राहिली होती. त्यापैकी दोघांचं शिक्षण पूर्ण झालं होतं. ते गुरुजींना म्हणाले, ‘‘आचार्य आमचं शिक्षण पूर्ण झालं आहे. आम्ही आपला निरोप घेण्यासाठी आलो आहोत. आपली गुरुदक्षिणा किती ते सांगावं.’’ त्यांनी आचार्याच्या पायांवर मस्तक ठेवलं. आचार्य म्हणाले, ‘‘मला गुरुदक्षिणा काही नको; पण तुमची इच्छा असेल तर मला मिळतील तेवढी वाळलेली पानं गुरुदक्षिणा म्हणून आणून द्या.’’ आचार्याची मागणी ऐकून दोन्ही कुमारांना फार आश्चर्य वाटलं. ‘‘ठीक आहे.’’, असं म्हणून ते दोघं जंगलातून हिंडू लागले. जंगलात फिरताना एका झाडाखाली त्यांना वाळलेल्या पानांची मोठी रास दिसली. ते त्या राशीतील पानं गोळा करणार इतक्यात एक गृहस्थ धावत त्या ठिकाणी आला. तो म्हणाला, ‘‘मुलांनो, सकाळपासून ही पानं मी वेचली आहेत. ती आता मी जाळणार आहे आणि त्याची राख खत म्हणून माझ्या शेतात वापरणार आहे. म्हणजे पीक चांगलं येईल.’’ |
मेघना जोशी , रविवार १९ ऑगस्ट २०१२ शंतनू हा हस्तिनापूरचा राजा होता. तो गंगेच्या प्रेमात पडला. गंगासुद्धा त्याच्याशी विवाहाला कबूल झाली. पण त्यासाठी तिने एक अट घातली, ‘राजन, तुझ्याशी विवाह झाल्यावरही मी स्वच्छंदपणे जीवन जगणार; जेव्हा तू मला विरोध करशील त्याक्षणीच मी तुझा त्याग करीन.’ राजाने ही अट मान्य केली व तो गंगेशी विवाहबद्ध झाला. त्यानंतर त्यांना सात पुत्र झाले. हे सातही पुत्र जन्मताक्षणी गंगा म्हणजे शंतनूची पत्नी गंगानदीला अर्पण करत असे. पुत्रांना असे गंगार्पण करताना पाहून राजाला अतीव दु:ख होई, पण पत्नीची अट आठवून तो गप्प बसे. राणी गंगा आठव्यांदा प्रसूत होऊन पुन्हा तिला पुत्रप्राप्ती झाली. यावेळी मात्र शंतनू राजाला राहवेना, त्याने तो पुत्र नदीला अर्पण करण्यास विरोध केला. तत्क्षणी आपल्या अटीनुसार गंगा अंतर्धान पावली. जाताना सोबत आठव्या पुत्रालाही घेऊन गेली. पुढे काही वर्षांनी हाच पुत्र परत राजा शंतनूकडे आला. त्याचे नाव गंगादत्त, देवव्रत किंवा भीष्म. तरुण भीष्म परत आला त्याचवेळी त्याचा पिता म्हणजे राजा शंतनू मत्स्यगंधा सत्यवतीवर लुब्ध झाला होता. सत्यवतीशी विवाहाचा प्रस्ताव घेऊन राजा शंतनू तिच्या वडिलांकडे गेला. व्यवसायाने धीवर असलेल्या सत्यवतीच्या पित्याने या प्रस्तावाला ठाम नकार दिला. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 4 of 10 |