जपानी लेखक ** शिनीची होशी ,रविवार १ जुलै २०१२ मराठी अनुवाद ** निसीम बेडेकर
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दुपारची वेळ. दारावरची बेल वाजली. त्या घरातली बाई आपला झोपलेला छोटा मुलगा जागा होणार नाही अशा बेताने हळूच उठली आणि दरवाज्यापाशी गेली. दार उघडताच एका माणसानं झुकून अभिवादन केलं.‘‘बाईसाहेब म्हणजे.. आपणच का? आपण दिसताही तरुण आणि सुरेख..’’ कोणीतरी सेल्समन दिसतोय असं वाटून तिनं लगेच बचावाची तयारी केली.‘‘गोडगोड बोलण्यानं काही उपयोग होणार नाही. महागडी सौंदर्यप्रसाधनं घेऊन आला असाल, तर त्याची गरज नाही. |
मेघना जोशी ,रविवार १ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
महर्षी नारद सतत त्रिलोकात भ्रमंती करत असत. स्वर्गलोक, पृथ्वीलोक, पाताळलोक यापैकी कोठेही जाण्यास त्यांना मज्जाव नव्हता. असेच एकदा त्रलोक्य संचार करता करता ते हिमालयाच्या पायथ्याजवळच्या निबिड अरण्यात पोहोचले. सकाळच्या वेळी तोंडानं ‘नारायण, नारायण..’ असा अखंड जप करीत घनदाट वृक्षराजीतून ते चाललेले असताना त्यांना जरबेचा आवाज ऐकू आला, ‘ए बुवा, तिथंच थांब. एक जरी पाऊल पुढे टाकशील तर याद राख.’ |
रविवार १ जुलै २०१२ ,मनाली रानडे बालमित्रांनो, आजचे युग हे जाहिरातीचे युग आहे. विविध जाहिरातींतून कंपन्या किंवा संस्था यांचे लोगो सातत्याने तुमच्यासमोर येत असतात. पण कंपन्या किंवा संस्थांची नावे लोगोच्या शेजारी नसताना तुम्हाला ते ओळखता येतात का बघा! योग्य लोगो- समोर योग्य ते नाव लिहा. |
पेन होल्डर |
|
|
अर्चना जोशी ,रविवार १ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
साहित्य : टूथपेस्टचा बॉक्स, रंगीत कार्डपेपर, कात्री, गम, स्केचपेन, रंग, पेन्सिल इ. कृती : टूथपेस्टचा रिकामा बॉक्स पूर्णपणे उघडा आणि रंगीत कार्डपेपरवर ठेवून चित्र काढा. चित्राप्रमाणे बॉक्सचा आकार कार्डपेपरमध्ये कापून घ्या. एका बाजूने बॉक्सच्या झडपा कापून टाका व रिकाम्या डब्यावर रंगीत आकृती चिकटवा. बॉक्सच्या एका बाजूच्या झडपा आकृती चिकटवून मग कापा. रंगीत कागदाचा बॉक्स तयार होईल त्यावर तुमचे नाव लिहा व ते रंगवा. किंवा दुसरे एखादे चित्र सर्व बाजूंना काढा व रंगवा. या बॉक्सला उभे करून त्याचा तुम्ही पेन, पेन्सिल, स्केचपेन होल्डर म्हणून वापर करू शकता. |
अनुजा चवाथे ,रविवार २४ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पाऊस आला. आता पावसाचं शॉपिंग करायचं. शाळेत जाताना नवं दप्तर, नवी वॉटर बॅग, नवी पुस्तकं, नवा पेन्सिल बॉक्स, नवे शूज यांच्यासोबत आता नवी छत्रीही हवी होती. चिनूचं मनातल्या मनात सगळं प्लॅनिंग झालं. कधी एकदा रविवार येतोय आणि शॉपिंगसाठी तो आई-बाबांसोबत बाहेर जातोय, असं त्याला झालं होतं. त्याच्या मते, तो आता काही लहान राहिला नव्हता. फर्स्ट स्टँडर्डमध्ये गेल्यानं तो केजी स्कूलच्या मुलांपेक्षा मोठ्ठा झाला होता. |
ज्योत्स्ना सुतवणी ,रविवार २४ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
संतवाणी म्हणजे अमृतवाणी. जनजागृती करण्यासाठी संतांनी सोप्या मराठी भाषेत काव्यरचना केल्या. भक्तीच्या माध्यमातून समाजाला सन्मार्गाकडे नेण्याचे मौलिक कार्य त्यांनी केले. निवडक संतांच्या प्रत्येकी दोन रचना खाली दिलेल्या आहेत. संत आणि त्यांच्या रचना यांच्या योग्य त्या जोडय़ा तुम्हाला लावायच्या आहेत. (जनाबाई, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, एकनाथ, चोखामेळा, नामदेव , समर्थ रामदास, तुकाराम ) |
सुचिता देशपांडे ,रविवार २४ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पॉप- अप म्हणजे उठून दिसणारा भाग. एखाद्या दृश्यातील काही भाग उठून दिसल्यास तो लक्षवेधक ठरतो आणि त्या दृश्याला त्रिमित परिणाम देतो. पॉप-अप हे खरे चित्रच असते. फक्त ते अंतराच्या दृष्टीने वेगळ्या पातळ्या निर्माण करून त्या चित्राला खोली (depth) प्राप्त करून देते. आपल्याला पेपर पॉप भेटतात ती भेटकार्डामधून. |
सुचिता देशपांडे ,रविवार १७ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
राहुल आणि मिहीर हे दोघे परस्परांचे जिवलग मित्र. म्हणजे एकमेकांचे अगदी बेस्ट फ्रेंड्स! एक दिवस राहुल मिहीरला भेटायला सकाळी सकाळी घरी आला. त्याला एक बातमी सांगायची होती. मिहीरला तो म्हणाला, ‘मी इथून जातोय.’ आपला जवळचा मित्र आपल्याला सोडून दूर चाललाय, हे ऐकून मिहीर रडवेला झाला. खिन्नपणे राहुलला म्हणाला, ‘छे, छे! असं कसं शक्य आहे? तू असं मला सोडून जाऊ शकत नाहीस. आपण एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स आहोत ना!’ |
जपानी लेखक : शिनीची होशी ,रविवार १७ जून २०१२ अनुवाद - निसीम बेडेकर
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘‘मनसोक्त पाणी प्यावंसं वाटतंय.’’ ‘‘मलाही..’’ अंतराळयानात तहानेनं उच्छाद मांडला होता. ज्याला त्याला पाणी हवं होतं. बाकी सर्व गोष्टींची रेलचेल होती, पण पाणीच तेवढं नव्हतं. बाहेर टाकलेल्या जलांशावर पुन्हा प्रक्रिया करून पाणी निर्माण करण्याची यंत्रणा बिघडली होती. त्यामुळे चोवीस तासांत केवळ एकच कप पाणी प्रत्येकाच्या वाटय़ाला येत होतं. |
संपदा साळवी ,रविवार १७ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
साहित्य- जाड हॅण्डमेड कागद, पेन्सिल, पट्टी, कातर, गोंद, आवश्यक तेवढय़ा आकाराचे २०१२च्या कॅलेंडरचे प्रिंटआऊट. (ते नेटवरून सहज मिळेल किंवा हातानेही लिहिता येईल.) कृती- १२ इंच रूंदी आणि ८ इंच उंचीचा हॅण्डमेड कागद घ्यावा. तो सर्वबाजूंनी चिकटवा. दोन्ही बाजूंनी अर्धा इंच जास्त घ्यावा. ४ इंचाची प्रत्येक बाजू याप्रमाणे तीन बाजू तयार करा. प्रत्येकावर तुम्हाला आवडेल ते चित्र काढून रंगवा. |
जरा डोकं चालवा |
|
|
मनाली रानडे ,रविवार १७ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बालमित्रांनो, सोबत दिलेल्या चौकटीतील नऊ संख्यांपैकी एक संख्या मी मनात धरली आहे. ती कोणती हे शोधण्यासाठी खाली काही क्लू तुम्हाला दिले आहेत. हे तुम्हाला अनुक्रमानेच सोडवावे लागेल. कारण प्रत्येक क्लूबरोबर या चौकटीतील काही संख्या बाद होत जातील आणि शेवटी राहिलेली संख्या हीच माझ्या मनातली संख्या असेल. मग ओळखा बरं! |
बाल मैफल |
|
|
रविवार १७ जून २०१२ चित्र रंगवा

|
|
|