श्रीपाद पु. कुलकर्णी ,रविवार ,१० जून २०१२
बन्या आणि टिन्या हातात बॅट-बॉल घेऊन हाश्य-हुश्य करीत घरात आले आणि लगेच घटाघटा पाणी पिऊ लागले . ते पाहून गजाभाऊ म्हणाले, ‘अरे, खेळून आलात ना.. लगेच असं घटाघटा पाणी पिऊ नये. जरा दम तरी खा.. आणि तसा लवकरच आटोपता घेतलेला दिसतोय खेळ.’ गजाभाऊ हसत म्हणाले. |
मृणाल तुळपुळे ,रविवार ,१० जून २०१२
एका शेतकऱ्यानं त्याच्या शेतावर गाय, कोंबडय़ा, बदकं, कुत्रा, घोडे, शेळ्या असे खूप प्राणी पाळले होते. त्या सर्वाची एकमेकांशी अगदी गट्टी! त्यातला बोनी नावाचा खोडकर कुत्रा सगळ्यांचा खूप लाडका होता. तो सारखा पाण्यात, मातीत खेळायचा आणि मग घरभर चिखलाचे पाय उठवायचा. शेतकऱ्याची मुलगी -सारा बोनीला आंघोळ घालण्यासाठी पकडायला गेली की तो लपून बसायचा, कारण त्याला अंघोळ करायला अजिबात आवडायचं नाही. |
रविवार ,१० जून २०१२
ही गोष्ट आहे, इराकमधील एका शहरातील ग्रंथपालाची. तिचं नाव आहे आलिया. युद्धाचे ढग जमू लागले तसे तिथल्या पुस्तकांचं काय होणार, ही चिंता आलियाला अस्वस्थ करते. प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यानंतर असंख्य लोक मृत्युमुखी पडतात. सांस्कृतिक वारसा सांगणाऱ्या इमारती जमीनदोस्त होतात. अशा या वातावरणात पुस्तकांच्या मौल्यवान ठेव्याला कसं वाचवायचं, या विवंचनेत आलिया असते. या पुस्तकांची काळजी ती कशी घेते, |
संपदा साळवी ,रविवार ,१० जून २०१२
साहित्य : एक आडवा रिकामा खोका (टुथपेस्ट/ अॅल्युमिनियम फॉईलचा) घ्या. पिवळा कागद, हिरव्या छटांचे कागद, हिरव्या रंगाचे स्केचपेन, पेन्सिल, कातर, गोंद. कृती : प्रथम पूर्ण खोक्याला बाहेरून एक कागद चिकटवून घ्या. वेगवेगळ्या कागदांवर प्राणी, झाडं, झुडपं यांची चित्रे काढून ती रंगवून घ्या. |
रविवार ,१० जून २०१२
वर्तुळामध्ये आकडे भरताना काही ठिकाणी अक्षरे भरली आहेत. त्या अक्षरांच्या ठिकाणी कोणती संख्या असायला हवी, हे शोधण्यासाठी त्या अंकांचा एकमेकांशी असलेला संबंध ओळखा. नंतर योग्य संख्या अक्षरांच्या जागी भरा. ज्योत्स्ना सुतवणी |
डॉ. लीला दीक्षित , रविवार , ३ जून २०१२ यंदा सुधाताईंचा दिवाळसण होता. त्यामुळे गावाला सारं कुटुंब जमलं होतं. सुधाताईंच्या सासरची पाच-सहा मंडळी आयत्या वेळी येणार होती. सुधाताईंच्या दोन्ही मावश्या, त्यांचे कुटुंबीय सुलभा आत्या, तिचा जयेश आणि जयंती. आजी-आजोबा तर होतेच, पण सुधाताईंच्या आजोळहून नातीचे कौतुक पाहायला आजी-आजोबा आले होते. घरात चांगली २५-३० माणसे. दिवाळीच्या आधी दोन दिवस सारी मंडळी दिवाळसणाची तयारी करायला हजर. सुजय सुधाताईंचा लाडका भाऊ. |
मेघना जोशी , रविवार , ३ जून २०१२ यादव हे श्रीकृष्णाचे वंशज. कृष्ण व बलराम यांनी वंशाला मिळवून दिलेल्या नाव, कीर्तीमुळे ते मस्तवाल झाले होते. एकदा कण्वमुनी, विश्वामित्र ऋषी, नारद ऋषी अशी देवतुल्य मंडळी द्वारका नगरीत प्रवेश करत असता या मस्तवाल यादव तरुणांना त्यांची थट्टा करायची लहर आली. सुंदर व नाजूक दिसणाऱ्या सांब नावाच्या तरुणाला त्यांनी साडी-चोळी नेसवली व स्त्रीवेषातील सांबाला त्या ऋषींसमोर नेत, ऋषींची खिल्ली उडवण्याच्या हेतूने विचारले, ‘मुनिवर्य, ही स्त्री प्रसूत होऊन तिला पुत्र प्राप्ती होईल की, कन्यारत्न प्राप्त होईल?’ या त्यांच्या थट्टेने ते सर्व मुनी भयंकर अपमानित व क्रोधित झाले. |
अर्चना जोशी , रविवार , ३ जून २०१२ साहित्य : हँडमेड पेपर, रंगीत कागदाच्या पट्टय़ा, कात्री, गोंद, सॅटिन रिबीन, बटण इत्यादी कृती : हँडमेड पेपरच्या मागील बाजूस पेन्सिलने दिलेली आकृती काढून घ्या. बाहेरच्या बाजूने कात्रीने कापून घ्या. मधोमध दुमडून घ्या. उजवी व डावी बाजू मधोमध
चिकटवा. खालील बाजू दुमडून बंद करा. वरच्या बाजूने थोडेसे दुमडून मध्यावर पंचने छिद्र पाडून घ्या. सॅटिनच्या रिबीनने हँडल बनवून ते बांधा. तयार बॅगेच्या डाव्या बाजूस फूल लावून विरुद्ध रंगाच्या पट्टय़ा सारख्या आकारात कापून घ्या. या पट्टय़ा गोलाकार बाहेरून आत अशा चिकटवनू फूल बनवा. मध्यावर एखादे बटन चिकटवा. हे फूल चिकटवून वरील बाजूस वेगवेगळ्या रंगांच्या पट्टीला एकदा आत व एकदा बाहेर असे गुंडाळून ‘२’ आकार बनवा व चिकटवा. तशाच प्रमाणे खालील बाजूसही चिकटवा. झाली तुमची डिझायनर बॅग तयार. |
मनाली रानडे, रविवार , ३ जून २०१२ बालमित्रांनो, तुम्ही सध्या आइस्क्रीम, आंबे, थंडगार सरबतं, सहली आणि खेळ यात मग्न आहात ना! अभ्यासाला सुट्टी असल्यामुळे तर तुमची चंगळच असेल? |
रविवार , २७ मे २०१२ मी नेहमीच्या हॉटेलात शिरलो तेव्हा त्यानं माझा चेहरा न्याहाळला आणि एक स्मित केलं. ‘‘काय पण चेहरा पडलाय स्वारीचा! कंपनीत काही भानगड झालीय काय?’’ ‘‘पोहोचायला उशीर झाला आणि बॉसच्या शिव्या खायला लागल्या, दुसरं काय?’’ त्याच्या शेजारी बसत मी म्हणालो. ‘‘अरे अरे! रोजच असा उशीर करतोस काय तू?’’ ‘‘काहीतरीच काय? पण आज झालं काय, आज सकाळी नऊ वाजता बॉस काही महत्त्वाच्या सूचना देणार होता. |
रविवार , २७ मे २०१२ चांदोमामा चांदोमामा ऐक माझे थोडे! टोपलीभर चांदणे दे सोडव माझे कोडे! गावाकडचा रस्ता माझ्या दुर्गम आणि दूर! |
रविवार , २७ मे २०१२ १ ते १६ ठिपके जोडून एक सुंदर हसरे फूल तयार करा व तुमच्या आवडत्या रंगांनी रंगवा. |
|
|