लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख
फुले झाली रंगीन Print E-mail

alt

रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
कोणे एकेकाळी पृथ्वीतलावर निरनिराळ्या आकाराची आणि प्रकाराची खूप फुले होती; पण ती सगळी पांढऱ्या रंगाची होती. त्या सर्वाची एकमेकांशी चांगली मैत्री होती. सूर्याशीतर त्यांची खूपच दोस्ती होती. रोज सकाळी सूर्य उगवला, की तो आपल्या सोनेरी किरणांनी त्या साऱ्या फुलांना हळुवारपणे स्पर्श करून जागे करायचा. फुले जागी झाली की सूर्याकडे बघून हसायची आणि मग सारा दिवस त्याच्याकडे बघत त्याच्याशी हितगुज करायची. सूर्य क्षितिजापलीकडे गेला की मात्र ती सगळी फुले झोपी जायची. दिवसांमागून दिवस यायचा आणि जायचा, पण फुलांच्या आणि सूर्याच्या दिनक्रमात काहीच बदल नसे.
एकदा पहाटे पहाटेच आकाश भरून आले आणि पाऊस पडायला लागला. पावसाच्या थेंबांनी सगळ्या फुलांना जाग आली. पावसाच्या पाण्यामुळे ती एकदम उल्हसित आणि टवटवीत झाली; पण त्यांची नजर मात्र सूर्याला शोधत राहिली. हळूहळू ढगांमागून सूर्यकिरणे डोकावायला लागली. ते बघून फुलांना खूप आनंद झाला.

 
वाक्प्रचाराच्या गोष्टी : शंभर घडे भरणे... Print E-mail

alt

मेघना जोशी , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
पांडवांनी राजसूय यज्ञ करायचा ठरवला. त्यासाठी अनेक राजे-रजवाडय़ांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला. चहू दिशांनी अपार धनराशी गोळा झाल्या. यज्ञाच्या खर्चाबाबत पांडव निश्चिंत झाले. त्यांनी यज्ञाची सिद्धता सुरू केली. यज्ञाच्या तयारीसाठी-जसे की मंडप बांधणे, साधनसामुग्री  गोळा करणे, निमंत्रितांच्या राहावयाच्या ठिकाणांची सोय करणे, भोजन इत्यादींची सोय करणे- एकच लगबग उडाली. ख्यातनाम राजे-रजवाडे, ऋषीमुनी, इष्टमित्र सर्वाना आग्रहाची निमंत्रणे पाठविली गेली. त्यांचे स्वागत, आदरसत्कार, आतिथ्य याची जबाबदारी कौरवबंधुंनी आनंदाने स्वीकारली. पांडवांनी राजकोष सांभाळण्याचे अत्यंत जबाबदारीचे कामही कौरवबंधुंकडे विश्वासाने सोपवले. भीष्म, द्रोण यासारखी वडिलधारी मंडळी सर्व कामगिरीवर डोळ्यांत तेल घालून नजर ठेवून होती. कुठेही काही कमतरता राहू नये यासाठी दक्ष होती. वेळोवेळी सूचना, मार्गदर्शन करीत होती.

 
भटाला दिली ओसरी… Print E-mail

alt

रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
वाळवंटातील अरबाकडे
होता एक उंट,
बांधून ठेवायचा त्याला
तंबूबाहेर घट्ट

 
गंमत शब्दांची! Print E-mail

alt

मनाली रानडे , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
बालमित्रांनो, आपल्याला अनेकदा असे जाणवते, की एखादा मोठा शब्द दोन शब्दांचा मिळून बनलेला असतो. आजच्या खेळात तुम्हाला चित्रांचे दोन गट दिलेले आहेत. पहिल्या गटातील एक चित्र आणि दुसऱ्या गटातील एक चित्र यांची जोडी करून आपल्याला हवा असलेला शब्द शोधायचा आहे. सोबत दिलेल्या सूचक अर्थावरून तो तुम्हाला ओळखायचा आहे. उदा. क्रमांक १ मधील सूचक अर्थावरून पहिल्या गटातील वाघ आणि दुसऱ्या गटातील नखांच्या चित्रांची जोडी लावून तुम्हाला ‘वाघनखे’ हा शब्द ओळखता येईल. लक्षात असू द्या, की एक चित्र एकापेक्षा अधिक शब्दांमध्ये वापरलेले असू शकते.

 
मूर्ख शिष्य गुरूच्याच मुळावर! Print E-mail

alt

भालचंद्र शं. देशपांडे ,रविवार, २३ सप्टेंबर २०१२
(संस्कृत कथेचा अनुवाद)
एका आश्रमातील वृद्ध गुरूजवळ दोन शिष्य अध्ययन करत होते. एकाचं नाव होतं वामहस्त, तर दुसऱ्याचं होतं दक्षिणहस्त. त्या दोघांनाही गुरूविषयी पराकाष्ठेचा आदर होता. गुरूवर त्या दोघांचीही अपार श्रद्धा होती. गुरूच्या कर्तबगारीचे गोडवे ते दोघेही मुक्तकंठानं गात असत. गुरुजींच्या प्रकृतीत थोडंसं जरी डावं-उजवं झालं तरी त्यांचा जीव कासावीस होत असे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 5 of 23