लेख
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

लेख
प्रयत्नांती परमेश्वर Print E-mail

पु. ग. वनमाळी - २६ ऑगस्ट २०१२

एका चिमणीला
लागली तहान,
शोधलं तिनं
डबकं लहान.
    पाणी पिताना
    फिसकला पाय
 
गुरुदक्षिणा Print E-mail

alt

म. अ. खाडिलकर , रविवार १९ ऑगस्ट २०१२
पुरातनकाळी आजच्यासारख्या शाळा नव्हत्या. गुरुगृही राहायचं, त्यांच्या घरात पडेल ते काम करायचं आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुदक्षिणा देऊन घरी परतायचं, अशी त्यावेळी पद्धत होती.
अशाच एका ऋषीकडे काही मुलं अध्ययनासाठी राहिली होती. त्यापैकी दोघांचं शिक्षण पूर्ण झालं होतं. ते गुरुजींना म्हणाले, ‘‘आचार्य आमचं शिक्षण पूर्ण झालं आहे. आम्ही आपला निरोप घेण्यासाठी आलो आहोत. आपली गुरुदक्षिणा किती ते सांगावं.’’ त्यांनी आचार्याच्या पायांवर मस्तक ठेवलं.
आचार्य म्हणाले, ‘‘मला गुरुदक्षिणा काही नको; पण तुमची इच्छा असेल तर मला मिळतील तेवढी वाळलेली पानं गुरुदक्षिणा म्हणून आणून द्या.’’ आचार्याची मागणी ऐकून दोन्ही कुमारांना फार आश्चर्य वाटलं. ‘‘ठीक आहे.’’, असं म्हणून ते दोघं जंगलातून हिंडू लागले.
जंगलात फिरताना एका झाडाखाली त्यांना वाळलेल्या पानांची मोठी रास दिसली. ते त्या राशीतील पानं गोळा करणार इतक्यात एक गृहस्थ धावत त्या ठिकाणी आला. तो म्हणाला, ‘‘मुलांनो, सकाळपासून ही पानं मी वेचली आहेत. ती आता मी जाळणार आहे आणि त्याची राख खत म्हणून माझ्या शेतात वापरणार आहे. म्हणजे पीक चांगलं येईल.’’
 
वाक् प्रचाराची गोष्ट : भीष्मप्रतिज्ञा Print E-mail

alt

मेघना जोशी , रविवार १९ ऑगस्ट २०१२
शंतनू हा हस्तिनापूरचा राजा होता. तो गंगेच्या प्रेमात पडला. गंगासुद्धा त्याच्याशी विवाहाला कबूल झाली. पण त्यासाठी तिने एक अट घातली, ‘राजन, तुझ्याशी विवाह झाल्यावरही मी स्वच्छंदपणे जीवन जगणार; जेव्हा तू मला विरोध करशील त्याक्षणीच मी तुझा त्याग करीन.’
राजाने ही अट मान्य केली व तो गंगेशी विवाहबद्ध झाला. त्यानंतर त्यांना सात पुत्र झाले. हे सातही पुत्र जन्मताक्षणी गंगा म्हणजे शंतनूची पत्नी गंगानदीला अर्पण करत असे. पुत्रांना असे गंगार्पण करताना पाहून राजाला अतीव दु:ख होई, पण पत्नीची अट आठवून तो गप्प बसे. राणी गंगा आठव्यांदा प्रसूत होऊन पुन्हा तिला पुत्रप्राप्ती झाली. यावेळी मात्र शंतनू राजाला राहवेना, त्याने तो पुत्र नदीला अर्पण करण्यास विरोध केला. तत्क्षणी आपल्या अटीनुसार गंगा अंतर्धान पावली. जाताना सोबत आठव्या पुत्रालाही घेऊन गेली. पुढे काही वर्षांनी हाच पुत्र परत राजा शंतनूकडे आला. त्याचे नाव गंगादत्त, देवव्रत किंवा भीष्म.
तरुण भीष्म परत आला त्याचवेळी त्याचा पिता म्हणजे राजा शंतनू मत्स्यगंधा सत्यवतीवर लुब्ध झाला होता. सत्यवतीशी विवाहाचा प्रस्ताव घेऊन राजा शंतनू तिच्या वडिलांकडे गेला. व्यवसायाने धीवर असलेल्या सत्यवतीच्या पित्याने या प्रस्तावाला ठाम नकार दिला.
 
ओळखा पाहू! Print E-mail

alt

ज्योत्स्ना सुतवणी , रविवार १९ ऑगस्ट २०१२
येथे काही भारतीय देवांची वाहने अर्थात संबंधित पशु-पक्ष्यांची छायाचित्रे येथे दिली आहेत. ही वाहने म्हणजे प्रतीके आहेत, हे तुम्ही जाणताच. एखाद्या वाहनाशी एकापेक्षा जास्त देव संबंधित असू शकतात. सोबत दिलेली छायाचित्रे पाहून ती खालीलपैकी कोणत्या देवाचे वाहन आहे हे तुम्हाला ओळखायचे आहे.
१) ब्रह्मा २) विष्णू ३) महेश ४) लक्ष्मी ५) सरस्वती ६) पार्वती ७) गणपती ८) कार्तिकेय (मुरुगन) ९) इंद्रदेव १०) कामदेव ११) वायुदेव १२)  यमदेव
alt

 
मॉन किरी Print E-mail

alt

(मॉन किरी ही जपानी कला)
संपदा साळवी , रविवार १९ ऑगस्ट २०१२
साहित्य: अतिशय पातळ हॅण्डमेड कागद किंवा ट्रेसिंग कागद, पट्टी, पेन्सिल, कातर.
कृती: प्रथम कोणत्याही मापाचा (चित्रातील चौरस २० सेमीचा आहे.) चौरस घ्यावा. तिरकस रेषेत मध्यावरती दुमडून घेऊन आकृती ‘अ’ प्रमाणे आडव्या रेषेच्या मध्यापासून दुमडावे. मग आकृती ‘ब’ मध्ये दाखविल्यप्रमाणे खालील कोन दोन्ही बाजूने सारखा दिसेल आणि डाव्या बाजूच्या घडीच्या रेषेवर ही घडी येईल अशाप्रकारे दुमडून घ्यावे. तुमची प्रतिकृती आकृती ‘क’ ला तंतोतंत जुळली पाहिजे. alt
‘क’ आकृतीत दाखविलेल्या तुटक रेषेवर ती बाजू मागील दिशेने वळवा. म्हणजे आकृती ‘ड’ प्रमाणे दिसेल. सगळे कोपरे नीट घट्ट दाबून घ्या. आता चित्रात दाखविल्याप्रमाणे त्यावर आकार आखून घ्या. हेच डिझाइल वेगवेगळया प्रकारे कापून ही तीन डिझाइन्स झाली आहेत. फूल व मोत्यांचे डिझाइन करण्यासाठी आकृतीतील ठळक रेषांवर कात्रीच्या साहाय्याने कापावे. कापल्यानंतर अलगद उघडून काही भाग उठाव देण्यासाठी दुमडून घ्यावे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 10 of 23