रविवार ११ नोव्हेंबर २०१२
टोयोटा ही आज मोटारनिर्मितीच्या क्षेत्रातील जगातील अग्रगण्य कंपनी आहे. तिच्या बाबतीत अगदी अलीकडे घडलेली ही घटना.. आपल्या मोटारीच्या दर्जाविषयी शंका वाटली म्हणून टोयोटाने ग्राहकांना विकलेल्या मोटारी परत मागवल्या. किती मोटारी? तब्बल दीड कोटी मोटारी! टोयोटाच्या स्पर्धकांनी टोयोटाच्या गाडय़ांच्या दर्जावरून या कंपनीविषयी आरडाओरडा केला. |
बालाजी रेड्डी य शेखर ढवळीकर , रविवार , २८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मागील लेखात आपण ‘क्वॉलिटी सर्कल’ या अतिशय मोठय़ा प्रमाणावर प्रचलित असणाऱ्या संकल्पनेचा परिचय करून घेतला. हा परिचय करून घेतानाच या संकल्पनेविषयी असणारे प्रचलित गैरसमजही आपण जाणून घेतले. खरं तर परस्पर सहकार्यातून प्रशिक्षित होण्याकरिता या संकल्पनेचा वापर होणे अपेक्षित आहे. हाच विषय थोडा अधिक तपशीलवारपणे समजावून घेऊ या. सन १९६४. एक भारतीय तरुण अभियंता जपानमध्ये दाखल झाला. एका प्रख्यात जपानी कंपनीमध्ये प्रशिक्षण घेण्याकरिता तो आला होता. प्रशिक्षणाचा कालावधी होता सहा महिन्यांचा.
|
बालाजी रेड्डी / शेखर ढवळीकर , रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मागील लेखात आपण ‘कायझेन’ या संकल्पनेची तोंडओळख करून घेतली. ही संकल्पना समजावून घेणे, आत्मसात करणे जपानी समाजमानसाला काहीसे सोपे गेले. कारण मुळात ही संकल्पना आणि त्यामागचे तत्त्वज्ञान हे जपानच्या राष्ट्रीय धर्माशी व संस्कृतीशी अतिशय सुसंगत होते. याचाही आपण अतिशय थोडक्यात आढावा घेतला. |
बालाजी रेड्डी / शेखर ढवळीकर , रविवार , ३० सप्टेंबर २०१२ मागील लेखात आपण काही महत्त्वाची उदाहरणे विचारात घेऊन ‘स्पर्धा’ ही संकल्पना अधिक तपशीलवारपणे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. स्पर्धात्मक प्रवृत्ती ही माणसात उपजत असते, हा पारंपरिक समज खरा नाही. उलट, ही प्रवृत्ती चुकीच्या संस्कारांतून, चुकीच्या शिक्षणातून निर्माण होते, हेदेखील आपण पाहिले. त्याचबरोबर मानसशास्त्रज्ञांनी उंदरांवर प्रयोग करून माणसाच्या प्रवृत्तीविषयी काही ठोकताळे मांडले, त्याचाही संदर्भ आपण या अनुषंगाने विचारात घेतला. आता या उंदरांवरील प्रयोगाविषयी थोडेसे अधिक खोलात जाऊन जाणून घेऊ या. उंदरांवर जे विविध प्रयोग केले गेले, त्यातला सर्वात प्रसिद्ध प्रयोग ‘रॅट अॅण्ड चीज टेस्ट’ या नावाने ओळखला जातो. काय होता हा प्रयोग? एका पिंजऱ्यात एका उंदराला बंद करण्यात आले. त्या पिंजऱ्यात दोन कप्पे होते आणि त्या कप्प्यांना जोडणारी एक छोटीशी वाट तयार करण्यात आली होती.
|
बालाजी रेड्डी / शेखर ढवळीकर - रविवार १६सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
डॉ. एडवर्ड डेमिंग याने स्पर्धा या संकल्पनेचा मागोवा घेताना ‘कोणाबरोबर करायची स्पर्धा’ आणि ‘कोणाच्यातरी विरोधात करायची स्पर्धा’ असे स्पर्धेचे दोन प्रकार केले. आता या दोन संकल्पनांमध्ये नेमका काय फरक आहे? यात नेमका तोच फरक आहे, जो यश आणि अपयश यांत आहे. जो विजय आणि पराभव यांत आहे. आज आपण आपल्या आजूबाजूला कुठेही नजर टाकली तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारची स्पर्धा दृष्टीस पडतेच. |
बालाजी रेड्डी / शेखर ढवळीकर , रविवार , २ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मागील काही लेखांमधून आपण आजच्या युगात चराचर सृष्टीला व्यापून पुन्हा दशांगुळे उरलेल्या ‘स्पर्धा’ या संकल्पनेचे विविध पैलू समजावून घेत आहोत. स्पर्धेचा अतिरेक व त्यातून निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीचाही आपण मागोवा घेत आहोत. स्पर्धेविषयी असणाऱ्या चुकीच्या समजुती आणि अतिरेक यातून व्यक्तीची प्रतिष्ठा, आत्मसन्मान अक्षरश: धुळीस मिळतो, असा डॉ. एडवर्ड डेमिंग यांचा दावा होता. त्यांनी आपल्या हयातीत अनेक पुस्तके लिहिली. |
बालाजी रेड्डी , शेखर ढवळीकर , रविवार १९ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मागील काही लेखांत आपण डेमिंगने मांडलेल्या ‘शिकण्यातील आणि कामातील आनंद’ तसेच ‘प्रोत्साहन’(मोटिव्हेशन) या संकल्पनांचा विचार करतो आहोत. डेमिंगने या संकल्पनांचा जो नवा अर्थ शोधला त्यामुळे पालक-शिक्षक-व्यवस्थापक अशा सर्वच भूमिका पार पाडताना आपल्याला घिश्यापिटय़ा विचारांना गंगार्पण करावे लागणार आहे. डेमिंगने आपल्या संकल्पना जपानी लोकांसमोर मांडल्या तेव्हा त्या स्वीकारणे त्यांना फारच सोपे गेले, कारण मुळात त्या त्यांच्या संस्कृतीशी मिळत्याजुळत्या होत्या. गुरू-शिष्य परंपरा असणाऱ्या जपानी समाजाने डेमिंगला गुरू म्हणून स्वीकारणे स्वाभाविकच होते. जपानी उद्योगजगताला डेमिंगने एक महत्त्वाचा गुरुमंत्र दिला. कामगार हे व्यवस्थे‘मध्ये’ काम करत असतात. व्यवस्थापक व्यवस्थे‘साठी’ काम करत असतो. व्यवस्थापकाचं प्रमुख काम म्हणजे त्याने कर्मचाऱ्यांमध्ये कामाविषयी, संस्थेविषयी अभिमान निर्माण केला पाहिजे. त्यांना कामात आनंद वाटेल याची दक्षता घेतली पाहिजे. |
बालाजी रेड्डी / शेखर ढवळीकर , रविवार २२ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मागील लेखात आपण पाहिले की, प्रत्येकाचा विषय आकलन करून घेण्याचा मार्ग निराळा असू शकतो. कोणी वाचून शिकतो, कोणाला हाताने प्रत्यक्ष काम करूनच आकलन होते. कोणाच्या जाणिवा पाहून, निरीक्षणाने विस्तारतात. तर कोणी निव्वळ ऐकून श्रवणाने शिकू शकतो. काहींना यातील दोन-तीन पद्धती एकत्र करून शिकल्यानेच चटकन् आकलन होते. आपल्याला नेमकी कोणती पद्धत लागू पडते, हे लक्षात येणे आणि त्या पद्घतीने शिकता येणे, यापेक्षा दुसरा मोठा आनंद नाही. आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना, सहकाऱ्यांना नेमकी कोणती पद्धत योग्य आहे, हे समजले की मग त्यांना नेमके काम देता येते. |
बालाजी रेड्डी / शेखर ढवळीकर , रविवार , ८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मागील काही लेखांमधून आपण ‘थिअरी’चे विविध पैलू लक्षात घेतो आहोत. माणूस त्याला लाभलेल्या जन्मजात कुतूहलातून प्रश्न विचारू लागतो आणि या उत्सुकतेतूनच कोणत्याही विषयाच्या ‘थिअरी’चा पाया घातला जातो. अनेकदा आपण त्राग्याने म्हणतो- ‘कोणाला कितीही उपदेशाचे डोस पाजा. प्रत्यक्ष अनुभवाशिवाय जगात कोण शहाणं झालंय?’ अनेकदा हे विधान खरेदेखील असते. पण अनुभवाला ‘थिअरी’ची जोड असल्याखेरीज त्यातून शहाणपण येत नाही, याकडे सर्वसाधारणपणे दुर्लक्ष होते. माणसाबरोबरच त्याच्या कुतूहलाचाही जन्म होतो, ही गोष्ट आता विज्ञानानेच सिद्ध केली आहे. आपण सर्वानी ती मान्यही केली आहे. लहानपणापासून मुले असंख्य प्रश्न विचारायला सुरुवात करतात. मुलांनी असे प्रश्न विचारलेच पाहिजेत. |
बालाजी रेड्डी / शेखर ढवळीकर ,
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मागील लेखात आपण एका लहान मुलाचे उदाहरण पाहिले. ‘स्कूटर चालू होते म्हणजे नेमके काय घडते?’ या प्रश्नाचा मागोवा घेण्याचा त्या मुलाचा प्रयत्न आपण समजावून घेतला. या उदाहरणातून काही मुद्दे अगदी स्वाभाविकपणे समोर येतात. उदाहरणार्थ- ज्या- ज्या वेळी त्या मुलाचा निष्कर्ष चुकला, त्या- त्या टप्प्यावर त्याला नवीन ‘थिअरी’ मांडण्याची संधी मिळाली. या ‘थिअरी’मुळेच तो मुलगा उपलब्ध माहितीचे रूपांतर ज्ञानात करू शकला. |
बालाजी रेड्डी / शेखर ढवळीकर , रविवार,१० जून २०१२
मागील लेखात आपण आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला आणि डॉ. एडवर्ड डेमिंग यांच्या महत्त्वाच्या सूत्रापर्यंत आलो. ते सूत्र म्हणजे-‘अंडरस्टँड द थिअरी ऑफ नॉलेज.’ डेमिंगचा यावर ठाम विश्वास होता की, कोणतीही ‘थिअरी’ ही तुम्हाला सम्यक ज्ञानाकडेच नेत असते. इतकेच नव्हे तर ‘थिअरी’शिवाय सम्यक ज्ञान, समग्र आकलन शक्यच नसते. |
बालाजी रेड्डी / शेखर ढवळीकर , रविवार , २७ मे २०१२ आज डेमिंगच्या विचारविश्वाचा पुढचा टप्पा जाणून घेण्यापूर्वी आपण आजवरच्या वाटचालीचे सिंहावलोकन करूया. पुढच्या प्रवासासाठी हा आढावा अतिशय आवश्यक आहे. मागील प्रत्येक लेखात सूत्र समजावून घेण्याकरिता आपण समर्पक उदाहरणांचा आधार घेतला. त्या उदाहरणांतून आपण काय काय लक्षात घेतले? एक- कोणत्याही यंत्रणेच्या व्यवस्थापनासाठी ‘सरासरी’ हा निकष लावणे अतिशय धोकादायक ठरू शकते. |
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
Page 1 of 2 |