शिवार
मुखपृष्ठ >> शिवार
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

शिवार
शिवार - दिवा (ळी) स्वप्न Print E-mail

राजकुमार तांगडे : रविवार ११ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आडवाटेला एक गाव होतं, तिथं शोषित शेतकरी राहात होता. अस्मानी आणि सुलतानी संकटाला कंटाळून तो शेतातच एका झाडाखाली रडत बसला असताना वरून पंतप्रधान, मंत्री आणि त्यांच्या बायका (सचिवासह) दौऱ्यावर जात होत्या. रडणाऱ्या शेतकऱ्याला पाहून पंतप्रधानांच्या बायकोला दया आली. तिने साहेबांजवळ हट्ट धरला.. की मला त्याला भेटायचंय. पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं- तो आपला विषय नाही.
 
शिवार - मरणाची धग आणि मनाला चटका... Print E-mail

alt

राजकुमार तांगडे , रविवार , २८ ऑक्टोबर २०१२
ईस वर्सापूर्वी गावात एखांदं माणूस मेलं त चुलीच पेटत नसतं.. सरणं इझुस्तर. त्याच्याहून मानसाच्या दु:खाचा अंदाज यायचा. पण आता चुली कमी झाल्या म्हणून म्हणा नाही त काही.. पण दु:खाचा अंदाजच येईना. पहीलं एखांदं आथरुणात पडल्यान गावात मरू घातल्यालं माणूस आज-उद्या, आज-उद्या करून करून महिना-महिना मरत नव्हतं. तेच आत्ता एखांदं दवाखान्यात मेल्याला माणूस बी महिना महिना जित्ता ठूतेत. त्याच्या आयुष्याची दोरी यमाच्या हातात न्हाई त मानसाच्या खिशात. फरक एवढाच हे.. काहीच्या बनेलाला खिशे असतेत त काहीच्या कोटाला. म्हणून माणूस आता आपलं जगणं खिशात घेऊन फिरतु. पण ज्याला खिशेच ठूले न्हाईत असे मरणाला कवटाळतेत. आता मरणं जरा बोथटच झालंय.
 
शिवार : बेरंग Print E-mail

राजकुमार तांगडे ,रविवार, १४ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आपून जेव्हढं झाकून ठुतो नं तेवढंच लोकं वाकून बघतेत. अन् समजा तरी बी न्हाई दिसलं, तं मंग मनानंच चित्त रंगीतेन. रंगून सांगन्याच्या बाबतीत मानसाचा हात कोणीच धरूनी. एखांदी गोष्ट इतकी रंगून सांगतेन्, की सातीरंग कमी पडून समूरच्याचं जीवन बेरंग होतं तसा -तसा आम्हाला आनंद मिळतू. आता एखांद्याला आम्हाला क्रूर रंगवायचं आसन् तं येगयेगळे प्रयोग करतात. आता  राक्षिसाचंच उदाहरण घ्या ना! निस्त्या सभावानं, वागन्यानं त्याची क्रूरता आम्हाला (पाहिजी) तसी रंगीता येईना.
 
शिवार : इंडिया प्राइव्हेट लिमिटेड Print E-mail
alt
राजकुमार तांगडे , रविवार  , ३० सप्टेंबर २०१२

This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘व्हय तात्या, एक्या रेल्वेच्या चाकाचा व्यास इतका.. एका मिन्टात दहा घिरके मारती, तं दहा मिन्टात किती किलूमीटर जाईन?’
तात्या - ‘जाऊ दी ना भाऊ, काय जायची तं. फक्त तिकीट सांग किती हेत? आम्हाला परवडलंतं बसू.’
तात्या चिल्डू नका ना बरं. आक्षयचं वय एक्स, बापाचं वाय; तं माईचं काय?’
तात्या- ‘आक्षयच्या बापाचा धंदा सांग काय हे; मंग काढू माईचं वय!’
‘काय हो तात्या, असं उत्तर आम्ही शाळात गुरुजीला देलं असतं तं, मानसाची कोंबडी केली असती- आम्हाला आक्षयचं वय काढता न्हाई आलं म्हणून गुरुजीनं आमच्या पाठीचे साल्टे काढले. तव्हा गुरुजी सांगतेन् तीच एक्स, वायची किंमत अन् पुढं सरकार ठरीन तीच मालाची किंमत ठरल्यामुळं आम्हाला कव्हाच किमती काढता न्हाई आल्या.

 
शिवार : दुस्काळाला जीवदान दी Print E-mail

राजकुमार तांगडे : १६ सप्टेंबर २०१२

कधी नव्हतं एखांदा मोठ्ठा मानुस मेला की दिवस मजात जायचा.. पण रातचं मातर भेऊ वाटायचं. सावली दिसली तरी वापस आल्यासारखा वाटायचा. कव्हा मव्हा मरणाऱ्या मोठय़ा मानसाची शाळाला मिळणारी सुट्टी पाहून.. जगात मोठे मानसं कमी, का मोठय़ांची मरणाची गती कमी? त्यातली त्यात गुरुजी श्रद्धांजली वहातानी म्हणायचे, मोठी मानसं मरत नसतात.. ते नेहमी आमर असतात. म्हणून रात्री सावली दिसली तरी भेऊ वाटायचं.
 
शिवार : झळकायचंच! Print E-mail

राजकुमार तांगडे , रविवार , २ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

आण्णाच्या पोराला काही करून चमकायचं व्हतं.. म्हणूनच त्यानं घोटून दाढी करून घेतली. तसं गावात सध्या लई कामं उरले न्हाई म्हणून सगळेच झळकायसाठी धडपडतेत. तेवढी मनाची भूक तरी भागली पायजी म्हणून सगळे बेजार. आपला देस निव्वळ कुणबिकीवर आसल्यामुळं आपल्या देशात न्हाई पण भाईरच्या देशात मानसाचं पोट दिवसातून तीनतीनदा भरवायची ऐपत हाई. पण मन म्हणतान त जगाच्या पाठीवर आपल्याच काय कोणत्याच देशात भरायचं साधन न्हाई. मनाची सगळ्यात मोठी भूक हे ती झळकायची.
 
शिवार : सवलत Print E-mail

alt

राजकुमार तांगडे , रविवार १९ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it  
समंदच उगल्यालं काही पेरल्यालं नसतयं. आपुन उगच शहानपनानं बाता हानतोत ‘पेरलं तसं उगतं.. मंग बांदाच्या कडीनं पाटापाटा पेरुणं बी कामुन न्हाई उगत. अन बांदावर न पेरुणं बी गाजर गवत कसं उगतं? सगळं आपल्या सोई-सोईचं. हे मला आजुन बी आठोतं पम्याच्या सलुनमधी शेषेराव आन्ना चकरा मारीत व्हते तव्हा नवीन पोऱ्हं मोठाल्या मानसा समुर दाढी करायला लाजतं. नेमकं आन्नाचच पोरगं खुर्चीवर बसल्यालं.. मंग पम्यानं दाढीच्या जागी टकुऱ्याला ‘डाय’ करायला सुरुवात केली. मग त आन्ना ठिय्या मांडूनच बसले.. काही काही मानसायला पोऱ्हा-सोरायच्या गप्पा ऐकायचा लई नाद. उगच कोपरा धरुणं बसतेत. मंग तो पोऱ्हबी अस्या मानसायचं पाणी ठूत न्हाईत. पण खुद्द बापच आसल्यानं त्याह्य़चं पाणी ठॉयसाठी पोरानं दाढीला पाणी न्हाई लावून देलं. अन् आन्नाबी आपल्या पन्नासीचा मान राखून व्हते. गेल्या चार महिन्यात एकदाबी मिशा काळ्या केल्या नव्हत्या. त्याह्य़नं का दाढीहून वस्तरा नाही फिरीला लगन सराई आसूनबी. ग्रुप फोटू मधी दिसावं, म्हणून तुरमड चलती, तशी तुरमड एक आध्र्या काळ्या केसाची भाईर डोकावतानी व्हती. अन्नाचं पोरगं उठून गेलं, पण आन्ना मातर तीथंच मव्हळाच्या मासीसारखे घुटमळत राह्य़ले. जणू काही उधार माघायला आलेत. पम्यानं इचारलं, ‘दाढी करायची का?’

 
शिवार :पत्र Print E-mail

राजकुमार तांगडे  ,रविवार २२ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
alt

तुला पत्र.. आता पत्र म्हणलं की तुला सरकारी आवतन वाटन अन् तोही नजर कॅलिंडरवर जाईन. कार्यक्रम झाल्यावर किती दिसानं आल्यालं हे पत्र. खरं तं फेसबुक, फोनच्या काळात पत्र मंजी तुला सरकारी हापिसात आल्यासारखंबी वाटन्. त्याच हात नसल्याल्या लाकडाच्या खुच्र्या, मोडल्याले बाकडे, धक्का देऊन सुरू करायची जीप अन् हलवून जागे करायचे कर्मचारी, अधिकारी अन् तोंडावर बारा वाजल्याला शिपाई! तेच म्या तुला पत्राच्या जागी फोननं कळिलं आसतं, फेसबुकवर सांगितलं आसतं तं तुला सरकारी अधिकाऱ्याच्या घरात आल्यासारखं वाटन्. सोफा, चेअर, दारात सफारी, तिथंच बाजूला बांधल्यालं कुत्र्याचं पिल्लू अन् लाडं लाडं त्याला भिस्किटं खाऊ घालनारा शिपाई.
 
शिवार : लेकीचं झाड Print E-mail

alt

राजकुमार तांगडे , रविवार , ८ जुलै २०१२
त्याच्या लेकीनं गायल्याल्या दुस्काळाच्या कवितानं टाळ्यांचा पाऊस पडला व्हता. तिला बक्षीस मिळालं व्हतं. कोन्हाला पेन, कोन्हाला वही, कोन्हाला पुस्तक, कोन्हाला कप! तं हिला झाडाचं पिल्लू! आज तिच्या माईनं रामपहारीच एक्या बळीनं दहा-पाच श्या हासाडल्या व्हत्या. आख्खा मिरूग तोंड वासून तसाच कोल्डा गेला. थेंब न्हाई. अन् हेव पांढरा धुरळ पेरणी करून घ्या, म्हणून बजाराला निघून गेला. पांढरा मंजी रंग न्हाई, बरं का! जव्हा नवऱ्याचा राग येऊन बाई रंग बदलीती तव्हा त्याला ‘पांढरा’ म्हणती. अन् दुसरा वराडा लेकीवर. ‘अन् तुला कसन्याची कविता अन् स्पर्धा आठवायली! मह्य़ासंगं पेरायला चल. (तिलाबी शेजाऱ्याच्या आधी आपलं रान पेरून काढायचं.) स्पर्धा गेली चुलीत.’ लेक- ‘पन आज शाळात बक्षीस देनार हेत.’ ‘थांब. संध्याकाळी घरी आल्यावर तुला बक्षीस खायला लावीन,’ म्हणून माय निघून गेली- पोरीच्या पोटात गोळा उठवून!
 
शिवार - सपन : आडमिशन न् पेरणीचं! Print E-mail

राजकुमार तांगडे ,रविवार  २४ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

तुम्ही म्हणले, शिक्शन हे वाघिनीचं दूध हे. ते पेलं की मानूस गुरगुरतु. पण आम्हाला तव्हा पेन्याऐवजी चुरून खायची सवं असल्यामुळं संकरित गायच बरी वाटली. अन् प्यायचं म्हणतानं तं लोकायला फक्त दारूच म्हाईत. तुम्ही दुधाच्या ऐवजी कोका, थम्सप् म्हणले आसते, तं दारूत टाकून पेलं आसतं. मंग त्याच्यासाठी काही इकू, गहान ठू, नाही तं रिनं काढून का व्हईना..
 
शिवार :अखंड वारीचं दर्शन Print E-mail

राजकुमार तांगडे , रविवार,१० जून २०१२
पहिलं गप्पाटप्पा मारायची जागा पार, चावडी व्हतं. आता शहरात सभागृह अन् गावाकडं छपरावर, माळवदावर.. ग्रामपंचायतीच्या भिताडावर मंजी जिथं जिथं सहज रेंज येईल तिथं आगदी टावरच्या खाली बी, आमचा फड ग्रामपंचायतीच्या भिंतीवर बसल्याला आसतु-पाये मोकळे सोडले की ज्ञानीश्वरासारखं वाटतं भिंत त नाही पण तिथूनच आम्ही आख्खी दुनिया चलीतोत.. सगळ्यायचे आवाज काळी चारमधी खरतं फोनची गरजच नाही पण कान गोष्टीसाठीच फक्त लागतु.

 
शिवार : वाळीत… Print E-mail

altराजकुमार तांगडे , रविवार , २७ मे २०१२
गावाच्या भाईर पडल्यालं त्याचं मढं आम्ही वाळीत टाकलं. आमच्या आनंदावर इरजन पडावं म्हणूनच येसवंत्यानं जीव देलाय. आतापस्तोर कर्जाचं, नापिकीचं, दुस्काळाचं, भावाचं निमित्त पुढं करून दोन लाख बाऱ्या जीव देलाय. परादिसी तिन्हीसांजाच्या टायमाला बातमी धडकली. अचानक एखादं लेकरू आरबळून उठावं अन् पळावं तशी सरकारनं कापसावर निर्यातबंदी आणली अन् त्यानं जीव देला. त्याला सांगितलं व्हतं- आसं करशीन् तं कुत्रे हाल खानार न्हाईत.

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो