ओशो ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
योगाचे महत्त्वाचे सूत्र आहे- जे अणूमध्ये आहे ते विराटामध्ये आहे. जे सूक्ष्मामध्ये आहे ते भव्यतेमध्येही आहे. जे सूक्ष्मातिसूक्ष्ममध्ये आहे ते विशालमध्येही आहे. जे थेंबात आहे ते सागरामध्ये आहे. या सूत्राची योग सदैव घोषणा करीत आले आहे. |
एकनाथ ईश्वरन् , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२ आपल्या आत्मचरित्रात संत तेरेसा यांनी एका अतिशय महत्त्वाच्या, श्रेष्ठ अशा गुणावर परत परत जोर दिलेला आहे : निर्धार, निश्चय, इच्छाशक्ती. त्या सांगतात, ‘ज्यांच्याजवळ हा निर्धार आहे त्यांना कशालाही भिण्याचं काही कारण नाही.’ फक्त निर्धार? बस्स्, एवढंच? आपल्याला वाटतं, या एवढय़ाशा क्षुल्लक ऐहिक गुणापेक्षा अधिक भव्य-दिव्य अशा काहीतरी गोष्टीची गरज असली पाहिजे. पण जीवनाच्या सर्व शाखांमध्ये- कला, शास्त्र, विज्ञान, खेळ, मनोरंजन जिथे जिथे कोणीतरी उत्कृष्ट असं प्रावीण्य मिळवलेलं दिसून येतं तिथे तिथे एक गुण आपल्याला प्रामुख्याने नेहमीच आढळून येतो. |
केन ब्लँचर्ड * मार्क मिलर ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
जेफ यांनी संभाषणाला सुरुवात केली. ‘‘महान नेत्यांच्या यशाचे गमक काय? हा तुमचा प्रश्न होता. मला वाटतं हा खूप छान प्रश्न आहे, पण त्याआधी सुरुवात करण्याआधी तुम्हाला हे जाणून घेण्याची इच्छा का आहे ते सांगा.’’ ‘‘म्हणजे मी महान नेता होऊ शकेन,’’ अजिबात न अडखळता डेबी उत्तरली. |
जे. कृष्णमूर्ती ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
तुम्ही आम्हाला जे सांगता ते आम्हाला आचरणात कसे आणता येईल? कृष्णमूर्ती : तुम्ही जी गोष्ट ऐकता. ती बरोबर आहे असे तुम्हाला वाटते. मग ती तुम्हाला रोजच्या जीवनात उतरावी, असे वाटू लागते. म्हणजे तुम्हाला काय ‘वाटते’ त्यात व तुम्ही काय ‘करता’ त्यात अंतर पडते, होय की नाही? तुम्ही विचार एक करता व कृती दुसरीच करता. पण तुम्ही ज्याचा विचार करता ते तुम्हाला आचरणात आणायला हवे असते; म्हणून विचार व कृती यात अशी ही तफावत पडते आणि मग ती तफावत दूर करून तुमचे विचार तुमच्या कृतीशी कसे जोडावे असे तुम्ही विचारता. आता तुम्हाला एखादी गोष्ट करावी असे खूप वाटते तेव्हा ती तुम्ही लगेच करता, होय ना? |
महात्मा गांधी , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२ टॉलस्टॉय आश्रमामध्ये मुला-मुलींसाठी शिक्षणाची काही तरी व्यवस्था करणे आवश्यक होते. माझ्याबरोबर हिंदू, मुसलमान, पारशी व ख्रिस्ती नवयुवक होते आणि थोडय़ा हिंदू मुलीही होत्या. निराळे शिक्षक ठेवणे अशक्य होते व मला अनावश्यक वाटले. अशक्य होते, कारण लायक हिंदी शिक्षक दुर्मीळ होते आणि मिळाले तरी लठ्ठ पगार मिळाल्याखेरीज डरबनपासून २१ मैल दूर कोण कशाला येईल? माझ्यापाशी तरी पैशाचे पेव थोडेच भरलेले होते? बाहेरून शिक्षक आणणे अनावश्यकही वाटले, कारण चालू शिक्षणपद्धती मला पसंत नव्हती. योग्य पद्धती कोणती याचा मी अनुभव मिळविला नव्हता. एवढे समजत होते की, आदर्श स्थितीमध्ये खरे शिक्षण आई-बापांच्या हाताखालीच मिळणार. आदर्श स्थितीमध्ये बाह्य़ मदत कमीत कमी असली पाहिजे. |
दीपक चोप्रा , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२
हे संपूर्ण विश्व गतिशील पद्धतीने घेण्या-देण्यावरच चालत असते. ‘घेणे आणि देणे’ हे जगातील ऊर्जाप्रवाहाचे दोन भिन्न पैलू आहेत. जे आपण मिळवू इच्छितो, तेच दुसऱ्याला देण्याच्या तत्परतेद्वारे आपण संपूर्ण विश्वातच जीवनाचा संचार करीत असतो. सफलतेचा एक आध्यात्मिक नियम म्हणजे ‘देण्याचा नियम’. त्यालाच आपण घेण्या-देण्याचा नियमही म्हणू शकतो. त्याचे कारण हे संपूर्ण ब्रह्मांडच गतिशील विनिमयावर आधारलेले आहे. |
लुईस एल. हे ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
‘जे सर्वोत्तम आहे ते मिळायला मी पूर्णपणे लायक आहे.’ वरील वाक्य तुमच्याबाबतीत खरं करायचं असेल तर खालील विधानांवर अजिबात विश्वास ठेवू नका. पैसे झाडावर लागत नाहीत. पैसा फार वाईट असतो आणि वाईट मार्गाला लावतो. पैसा सैतान आहे. |
श्री.श्री.रवि शंकर ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
अहंकार केव्हा निर्माण होतो? *जेव्हा तुम्हाला महत्त्व मिळत नाही. *जेव्हा तुम्हाला वाटते की तुमचे महत्त्व कमी होत आहे. *जेव्हा तुम्हाला महत्त्व मिळते. अहंकारामुळे जडपणा, गैरसोय, भीती, चिंता निर्माण होतात. अहंकार प्रेमाला प्रवाहित होऊ देत नाही. अहंकार म्हणजे दुरावा, |
एकनाथ ईश्वरन् , शनिवार , १ सप्टेंबर २०१२ शत्रुत्वभावना, द्वेषभावना ही ध्यानाच्या आड येणारी बहुधा सर्वात गंभीर गोष्ट आहे. बुद्धाच्या म्हणण्याप्रमाणे ही भावना वेगवेगळ्या १३५ रूपांमध्ये व्यक्त होते! आपल्या सर्वाच्या मनामध्ये त्यांची एक यादीच असते. त्यामुळेच ही भावना ओळखणं हे सुरुवातीला इतकं कठीण असतं, तिचा समाचार घेणं तर दूरचीच गोष्ट आहे. बुद्ध म्हणतो, सुदैवाने, या शत्रुत्वभावनेचा सामना करण्यासाठी आपल्याला या संपूर्ण यादीची माहिती असणं आवश्यक नसतं. |
ओशो - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
जीवनात दु:ख आहे आणि सुखही आहे, कारण जन्म आहे आणि मृत्यूही आहे; परंतु या दोन्हींपैकी कुणाची निवड करून आपण जीवनाचा पाया घालतो यावर सगळं अवलंबून आहे. मृत्यू हाच जीवनाचा पाया, अशी जर निवड केली तर जन्म म्हणजे मृत्यूची सुरुवात आहे, असेच वाटेल आणि जीवन हाच पाया समजला तर मृत्यूसुद्धा जीवनाची परिपूर्णता आणि अंतिम उमलणे वाटेल. एखाद्या व्यक्तीने दु:खालाच जीवनाचा आधार मानले तर सुखपण केवळ दु:खात प्रवेश करण्याचा मार्ग वाटू लागेल ते तुमच्या निवडीवर अवलंबून आहे. जीवनात दोन्ही आहे. आपण काय आणि कशाची निवड करतो यावर संपूर्ण जीवन अवलंबून असतं. जीवनात अशांती आहे आणि शांतीपण आहे. आपण काय निवड करतो, त्यावर सगळं अवलंबून आहे. |
विनोबा ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
आपल्याला लाभलेली शक्ती जर आपण पुरी वापरली नाही, तर शिल्लक ठेवलेली शक्ती ईश्वराने आपल्याला द्यावी तरी कशी? बापाने मुलाला व्यापारासाठी दिलेले दहा हजारांचे भांडवल त्याने वापरलेच नाही, |
विमला ठकार ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
माणसाचा जाणण्यावर विश्वास नाही. त्याचा करण्यावर विश्वास आहे. करण्याची आवश्यकता भौतिक स्तरावर आहे. शरीराला व्यायाम द्यावा लागतो, म्हणजे व्यायाम करावा लागतो. निर्वाहाकरिता, काही वृत्ती पाहून, व्यवसाय पाहून वित्तार्जन करावं लागतं, पैसा कमवावा लागतो. |
|
|