|
स्त्री जातक
डॉ. अनघा लवळेकर ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्त्री-शिक्षणाची - प्रबोधनाची परंपरा आपल्याकडे गेली पावणेदोन शतकं जास्त ताकदीनं दृढ होत गेली आहे हे खरं- पण तरीही कुठल्याशा देवळापुढच्या नंदीसारखी गहूभर पुढे- नखभर मागे, अशीच तिची चाल आहे. प्रकाशझोतात आलेल्या बहुसंख्य महिला- ‘दिल्ली ते गल्ली’तल्या नीट पाहिल्या तर अजूनही त्यांचं कर्तृत्व बऱ्यापैकी ‘परप्रकाशित’ आहे हे लक्षात येतं. |
डॉ. अनघा लवळेकर,शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
समाजावर संस्कार करण्याच्या स्त्रीच्या क्षमता अफाट आहेत. तिच्यात ऊर्जाशक्तीही प्रचंड असते. गरज आहे ती प्रथम स्वत:शी व नंतर समाजाशी संवाद साधण्याची! त्यासाठी समाजाशी नाळ जोडायला हवी. नवरात्रीच्या निमित्ताने समाजातल्या याच स्त्रीशक्तींविषयी.. |
डॉ. अनघा लवळेकर ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
नेतृत्वाची मोठी खूण म्हणजे परंपरागत असलेली- रुळलेली चाकोरी ओलांडण्याचं धारिष्टय़. कुटुंबनेत्या बनणाऱ्या अनेक मैत्रिणींनी अशी कुठली ना कुठली चौकट ओलांडायचं/ मोडायचं धाडस स्वत:हून- कुणाच्याही सांगण्याची वाट न पाहता केलेलं दिसतं. ती फार मूलभूत आणि सर्वागीण क्रांती नसेल कदाचित, पण पुढच्या पिढीसाठी वाट थोडी रुंद करून ठेवण्याचं काम या धाडसामुळं नक्कीच झालेलं दिसतं.खूप खूप वर्षांपूर्वी वाचलेली, पण मनात घर करून राहिलेली कादंबरी म्हणजे म. गो. पाठक यांची ‘लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव!’ १९४८ च्या गांधीवधानंतर झालेल्या जाळपोळीत उद्ध्वस्त झालेल्या एका कुटुंबाला, त्या घरातील आईनं ‘लक्ष्मीबाईनं’ कसं उभं केलं- याची ती हृदयस्पर्शी कथा आहे, ज्यावर नंतर चित्रपटही निघाला. |
डॉ. अनघा लवळेकर , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२
करिअरच्या ‘उंच उंच झुल्या’चा थरार अनुभवताना व्यक्ती म्हणून, कुटुंबाचा एक घटक म्हणून जमिनीशी नातं सांगणाऱ्या स्त्रीची पावलं स्थिर असावीच लागतात.. आ ज मनोरंजनाच्या साधनांनी उच्छाद मांडलेला असला तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत मोजक्याच गोष्टींसाठी ‘मनोरंजन शुल्क’ भरायला लागायचं. ‘सर्कस’ ही त्यातील एक महत्त्वाची संधी! त्यातील उच्चतम आकर्षण म्हणजे उंचावरच्या ट्रॅपिझ (लांबलचक दोरीचे झोपाळे)चे अंगावर काटा उभा करणारे खेळ. |
डॉ.अनघा लवळेकर,शनिवार,८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आयुष्य जगत असताना, वर्षांचे उंबरे ओलांडताना बदल अपरिहार्य आहे, त्याचा वेळीच अंदाज घेता आला पाहिजे, त्या बदलाला काही प्रमाणात आपण अंकितही ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जे आपल्या अधीन नाही त्याचा सहज स्वीकार केला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बदलांची मजाही लुटता आली पाहिजे! |
डॉ. अनघा लवळेकर,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
क्रिकेटच्या मैदानावर चीअर गर्ल्स, गणेशोत्सव उद्घाटनात लावणी नृत्य, धार्मिक कार्यक्रमांमधील प्रमुख आकर्षण आयटम साँग आणि यात टाळ्या वाजविणाऱ्यांमध्येही स्त्रियांचे हात कमी नाहीत, ही खेदाची बाब आहे. नुसतीच बघ्यांची मागणी करणारं मनोरंजन फक्त तात्पुरती गुंगी आणते. त्यानं आपलं विचारविश्व ढवळून निघत नाही, हे कळणं खूप गरजेचं आहे. सुनीता धावतपळत ऑफिसमधून घरी पोहोचली तेव्हा घराचा अवतार झालेला होता. पसारा-पसारा आणि पसारा! खरं तर तिला लवकर स्वयंपाक आटपून ‘थांब जरा सूनबाई’ या लोकप्रिय मालिकेचा पुढचा भाग शांतपणे बघायचा होता. |
डॉ. अनघा लवळेकर , शनिवार , २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्त्रियांना जरा अक्कल कमीच हे अनेक घरांच्या भिंतींनी ऐकलेलं वाक्य.. अगदी आजही ऐकू येणारं. स्त्री भावनिक जास्त असते. विचारापेक्षा भावनेनं निर्णय घेते असंही म्हटलं जातं, त्यात जैविक रचनेचा भाग किती आणि सामाजिक घडणीचा सहभाग किती? पि ढय़ान्पिढय़ा ऐकलेला हा एक प्रसिद्ध विनोद! प्रख्यात ब्रिटिश विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्यापुढे एका देखण्या सिने अभिनेत्रीनं विवाहाचा प्रस्ताव ठेवला. शॉ हे दिसायला अतिशय सामान्य! त्या अभिनेत्रीनं म्हटलं, आपलं मूल तुमच्यासारखं बुद्धिमान आणि माझ्यासारखं देखणं व्हावं अशी माझी इच्छा आहे. शॉनं जरा उपहास आणि गमतीच्या स्वरात म्हटलं, ‘‘तुमची इच्छा रास्तच आहे, पण चुकून उलट झालं तर भलतीच पंचाईत व्हायची!’’ एकूणच देखणेपण आणि बुद्धिमत्ता किंवा ‘बाई आणि विचार करणं’ हे फार जवळून संबंधित नाही, असाच समज कैक वर्षे प्रचलित नव्हता का? ‘बायकांची अक्कल चुलीपुरती’ हे ब्रह्मवाक्य अनेक घरांच्या भिंतींनी ऐकलेलं नाही का? |
डॉ. अनघा लवळेकर , शनिवार , १४ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्त्रीने इतरांनी केलेल्या शोषणाबद्दल स्वत:ला अपराधी मानणं बंद करायला हवं आणि त्यासाठी ‘स्व’ बळकट व्हायला हवा. आयुष्यात अंतिमत: काय महत्त्वाचं हवं ते तिचं तिनेच ठरवायला हवं. आ मच्या पिढीनं परकऱ्या किंवा फ्रॉकच्या वयात असताना ‘लहान माझी बाहुली-मोठ्ठी तिची सावली..’ हे गाणं कितीदा तरी म्हटलं आहे. त्यातली नकटय़ा नाकाची, घाऱ्या डोळ्यांची, केळ्याचं शिकरण करताना सालीवरून पाय घसरून आपटलेली, करपलेल्या भाताकडे हताशपणे पाहणारी भावली म्हणजे बावळटपणाचं अगदी मूíतमंत प्रतीक वाटायची. |
डॉ. अनघा लवळेकर ,शनिवार ३० जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
संहारक विजयापेक्षा माणूस जोडत मिळविलेला विजय किती तरी जास्त अर्थपूर्ण आणि टिकणारा असतो आणि ही ताकद असते स्त्रीत्वात. ‘बाइंडिंग एजन्ट’ची ही जोडणीची भूमिका जर स्त्रियांनी आत्मसात केली आणि ती पुढच्या पिढीपर्यंत- मुलगे आणि मुलींपर्यंत पोहोचविली तर समाज-कुटुंबांच्या स्थैर्यात त्याचा महत्त्वाचा वाटा असेल! |
डॉ. अनघा लवळेकर ,शनिवार, १६ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अशी कुठल्या तरी तथाकथित अढळपणाला धरून ठेवण्याची त्याच्या शाश्वत- स्थिर असण्याची गरज मनात घर करून बसलेली असते. त्या अढळपणाला कुणी आव्हान दिलं तर मग भावनिक संतुलन ढासळतं. या साऱ्या कोंडीतून सुटण्याचा मार्ग काय? तर मुळात ‘आपल्या मनात असा एक काल्पनिक ध्रुव आहे’ याचा आधी स्वीकार करता यायला हवा.. |
डॉ. अनघा लवळेकर - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आज जिचा भारतीयांना गर्व वाटतो त्या मेरी कोमला जे यश मिळालं ते त्यामागे तिच्या पाठीवरचा तिच्या पतीचा- अन्य कुटुंबीयांचा हा आश्वासक हात आहे म्हणूनच! स्त्रियांची ही ‘जरूरत’ त्यांच्या कुटुंबीयांनी न सांगता ओळखली तर .. विशाखा आज चक्क ऑफिसला दांडी मारून घरी आराम करणार होती. रोजच्या धावपळीनं, घरच्या- बाहेरच्या उस्तवारीनं ती थकून गेली होती. घरातील सर्व जण एकेक करत बाहेर पडल्यावर तिनं मस्तपैकी कॉफी करून घेतली आणि ‘एफएम’ लावला. जुनी गाणी ऐकणं हा तिचा खास आवडीचा विषय. किशोरकुमार आपल्या खटय़ाळ आवाजात गात होता.. ‘जरूरत है.. जरूरत है.. जरूरत है।
|
डॉ. अनघा लवळेकर , शनिवार , २ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्त्रियांना निर्णय घेता येत नाही, किंबहुना त्यांच्यावर निर्णय घेण्याची फारशी वेळ येत नाही, असं मानलं जातं. निर्णयाच्या बाबतीत तळ्यात की मळ्यात अशी परिस्थिती येऊ न देता निर्णयाची जबाबदारी घेता येण्यासाठी तितकाच खंबीरपणा हवा.. ग ल्लीत मुलामुलींचा खेळ रंगात आला होता. राज्य घेणारी मुलगी जोरात म्हणायची, ‘तळ्यात’! सगळी मुलं लगेच जवळपासच्या निळ्या रंगाच्या वस्तूंजवळ जाऊन उभं राहायची. ती जर म्हणाली ‘मळ्यात’ तर हिरव्या रंगाच्या जागेजवळ- वस्तूजवळ पोहोचायचं. |
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
Page 1 of 2 |
|
‘लोकसत्ता’चे विविध अॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-
 
वासाचा पयला पाऊस आयला
साप्ताहिक पुरवणी
लोकरंग (दर रविवारी)
चतुरंग (दर शनिवारी)
वास्तुरंग (दर शनिवारी)
व्हिवा (दर शुक्रवारी
करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)
अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)
|