पीटीआय, नवी दिल्ली
दसरा-दिवाळीच्या निमित्ताने निर्माण झालेला वाहन उद्योगापुढील आशेचा किरण सप्टेंबरमधील कमी वाहन विक्रीने बुजल्या गेला आहे. खुद्द वाहन संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या संघटनेनेही आता चालू एकूण आर्थिक वर्षांतील देशातील वाहन विक्रीचा वेग आकुंचित केला आहे. एप्रिलनंतर दुसऱ्यांदा हा आलेख खेचण्यात आला आहे. यापूर्वी ही वाढ दुहेरी आकडय़ात असेल, असे सांगण्यात आले होते. तर ‘सिआम’च्या अंदाजानुसार भारत २०१२-१३ दरम्यान आता केवळ एक ते तीन टक्क्यांची प्रवासी कार विक्रीतील वाढ नोंदवेल. |
प्रतिनिधी, पुणे
‘हीरो’ला मागे टाकून, बजाज डिस्कव्हरने सप्टेंबर २०१२ मध्ये जगातील सर्वाधिक विक्री होणारी बाईक हा बहुमान मिळविला. ही आघाडी मिळवताना सप्टेंबरमध्ये बजाजने जगभरात तब्बल १२२,९६८ डिस्कव्हर वाहने विकली. बजाज ऑटोचे विमल सुंबली (जनरल मॅनेजर, सेल्स) म्हणतात, ‘मोटारसायकल व्यवसायातील आमच्या प्रवासातील हा एक मुख्य मैलाचा दगड आहे. मोटारसायकल निर्मिती/ विक्री व्यवसायात खास स्थान मिळवायचे, विविध प्रकारची वैशिष्टय़े असलेली वेगवेगळी मॉडेल्स बनवायची आणि बाजारपेठेत एक वेगळे स्थान निर्माण करायचे हे आमचे धोरण स्पष्टपणे यशस्वी झालेले दिसते आहे. |
प्रतिनिधी, पुणे मर्सिडीझ बेंझच्या ‘एम क्लास’ मोटारींची निर्मिती आता कंपनीच्या चाकण येथील प्रकल्पात सुरू झाली असून, तेथे तयार केलेली पहिली ‘एम क्लास- एमएल २५० सीडीआय एसयूव्ही’ मोटार बुधवारी सादर करण्यात आली. याबरोबरच कंपनीने २०० कोटी रुपये गुंतवून चाकण येथे उभारलेल्या अत्याधुनिक ‘पेंट शॉप’चे उद्घाटन केले. या पेंट शॉपमध्ये मोटारींना ‘वॉटर बेस्ड’ रंगकाम करण्याची सुविधा उपलब्ध आहे. |
कायद्यात सत्वर दुरुस्तीची करतज्ज्ञ-उद्योगक्षेत्राची मागणी व्यापार प्रतिनिधी , मुंबई पूर्वलक्ष्यी प्रभावाने करसंकलनाच्या अर्थसंकल्पाच्या तरतुदींवर विचार करण्यासाठी केंद्र सरकारने स्थापित केलेल्या पार्थसारथी शोम समितीने सादर केलेल्या अहवालाने विदेशात झालेल्या ताबा व विलिनीकरणाच्या व्यवहारांवर पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारण्याची तरतूद रद्दबातल करण्याची शिफारस केली आहे. शोम समितीच्या शिफारसींना मान्यता देऊन सरकारने सत्वर कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी करतज्ज्ञ व उद्योगक्षेत्राने केली आहे. |
व्यापार प्रतिनिधी, मुंबई माहिती-तंत्रज्ञान सेवा क्षेत्रातील विप्रो लिमिटेडने सलग तिसऱ्या वर्षी ‘डाऊ जोन्स सस्टेनिबिलिटी इंडेक्स (डीजेएसआय)’ या प्रतिष्ठेच्या जागतिक निर्देशांकात स्थान कमावले आहे. या वर्षी तर विप्रोला ‘संगणकीय सेवा आणि इंटरनेट’ उद्योग क्षेत्रातील जागतिक अग्रणी म्हणून या निर्देशांकाने मान्यता दिली आहे. |
व्यापार प्रतिनिधी, मुंबई दहशतवादी हल्ले, चोऱ्या-दरोडे आणि खून आदी गुन्ह्य़ांची वाढती संख्या यामुळे सीसीटीव्ही, एक्सेस कंट्रोल, बायोमेट्रीक यंत्रे आधी सुरक्षाविषयक तांत्रिक उपकरणांची मागणी इतर देशांच्या तुलनेत भारतात वेगाने वाढते आहे. त्यामुळे, सुरक्षाविषयक जागतिक बाजारपेठ दरवर्षी अवघ्या ७ टक्क्य़ांची असताना भारतात ती तब्बल चार पटीने म्हणजे २५ ते ३० टक्क्य़ांनी वाढते आहे. |
जकात होणार हद्दपार व्यापार प्रतिनिधी , मुंबई - बुधवार, १० ऑक्टोबर २०१२
जकात करपद्धती राबविणारे देशभरातील एकमेव राज्य असलेल्या महाराष्ट्रातून ही यंत्रणाही चालू वर्षअखेपर्यंत नाहीशी करण्यात येईल, असे ठोस आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रातील उद्योगपतींना दिले. राज्यातील विशेषत: ग्रामीण भागातील उद्योगांना भेडसावणाऱ्या भारनियमाबाबतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आश्वासक दिलासा दिला. यानुसार २०१२ अखेपर्यंत राज्या भारनियमनमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘भारतीय औद्योगिक महासंघा’च्या (सीआयआय) चौथ्या राष्ट्रीय परिषदे दरम्यान मुख्यमंत्री बोलत होते. महासंघाचे अध्यक्ष अदि गोदरेज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या परिषदेस ८५ हून अधिक उद्योगांचे प्रमुखांनी हजेरी लावली.
|
अमेरिकेचे अर्थमंत्री टिमोथी गाइथनर यांचा निर्वाळा वृत्तसंस्था , नवी दिल्ली
भारतात आर्थिक सुधारणांबाबत नव्याने दिसून आलेली धडाडी खूपच आश्वासक असल्याचा निर्वाळा अमेरिकेचे अर्थमंत्री टिमोथी गाइथनर यांनी मंगळवारी येथे दिला. भारतातील गुंतवणूकविषयक बिघडती स्थिती आणि डळमळत्या अर्थस्थितीबाबत तीनच महिन्यांपूर्वी गंभीर चिंता व्यक्त करणाऱ्या अमेरिकेच्या दृष्टीकोनातील हा ताजा सकारात्मक बदल आजपासून सुरू झालेल्या भारत दौऱ्यात अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांची भेट घेणाऱ्या गाइथनर यांच्या देहबोलीत स्पष्टपणे दिसून आला. भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीपथ उंचावण्याच्या दृष्टीने देशाने अलीकडे स्वीकारलेली धोरणे निश्चितच लक्षणीय ठरतील, अशा शब्दात गाइथनर यांनी देशाच्या नव्या सुधारणा-पथाबाबत स्वागतार्ह अभिप्राय पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. |
व्यापार प्रतिनिधी , मुंबई
एक विकसित तर दुसरा विकसनशील. एक जागतिक महासत्ता तर दुसरा जागतिक आर्थिक महासत्ता बनू पाहणारा. उभय देशांच्या आर्थिक समर्पकतेचा बुधवारी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कस पाहायला मिळेल. अमेरिका आणि भारत या देशांच्या पतव्यवस्थेचे नियंत्रण हाती असलेल्या मध्यवर्ती बँकांचे प्रमुख एका मंचावर पुन्हा एकत्र येत आहेत. भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांना भेटण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हचे बेन बर्नान्के हे बुधवारी मुंबईतील मुख्यालयात येत आहेत. रिझव्र्ह बँकेच्या आवारात पाऊल ठेवणारे बेन हे पहिले फेडचे गव्हर्नर असतील. |
पीटीआय, नवी दिल्ली
गेल्या शुक्रवारी ‘एनएसई’ने अनुभवलेल्या आकस्मिक पडझडीच्या पाश्र्वभूमीवर, सामान्य गुंतवणूकदारांच्या हितरक्षणासाठी देखरेख व निगा यंत्रणा कडेकोट करण्याबाबत दोन्ही शेअर बाजारांना ‘सेबी’ने सूचित केले आहे. विशेषत: तरलतेचा अभाव असलेल्या समभागांबाबत गुंतवणूकदारांना सूचित केले जावे असे ‘सेबी’चे फर्मान आहे. ‘सेबी’ने दिलेल्या निर्देशानुसार बीएसईने अशा अल्पतम उलाढाली असणाऱ्या व तरलता नसणाऱ्या २१३५ समभागांची तर एनएसईने ३०० समभागांची यादी प्रस्तुत केली असून, त्यातील गुंतवणुकीबाबत दक्षता जरूरीची ठरेल. तरलतेचा अभाव असलेल्या अशा समभागांतील गुंतवणूक जोखीमेची ठरते. |
पीटीआय , वॉशिंग्टन विद्यमान २०१२ आर्थिक वर्षांत भारताचा आर्थिक विकासदर पाच टक्क्यांखाली जाईल, असे धक्कादायक भाकीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) ने मंगळवारी वर्तविले. पूर्वी व्यक्त केलेले अंदाज तब्बल एक टक्क्यांहून अधिक खाली आणत वर्षअखेर विकासदर ४.९ टक्क्यांवर रोडावण्याचे हे ताजे भाकीत आहे. |
व्यापार प्रतिनिधी ,मुंबई आयटी क्षेत्रातील अग्रणी इन्फोसिस टेक्नॉलॉजीज शुक्रवारी, १२ ऑक्टोबरला आपल्या ३० सप्टेंबर २०१२ अखेरचे तिमाही निकाल जाहीर करेल आणि त्या सरशी विद्यमान आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाही निकालांचा हंगाम सुरू होईल. देशाच्या अर्थव्यवस्थेने धारण केलेली कासवगती पाहता यंदा कंपन्यांच्या तिमाही निकालांबाबत फारसे आशादायी चित्र नसले तरी निकाल हंगामाचा पहिला बार धमाकेदार राहण्याबाबत विश्लेषकांमध्ये सहमती दिसून येत आहे. |
|
|
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 Next > End >>
|