राष्ट्रीयीकृत बँक ऑफ बडोदाने मणिपाल एज्युकेशनच्या सहयोगाने ऑगस्ट २०११ मध्ये सुरू केलेल्या बडोदा मणिपाल स्कूल ऑफ बँकिंगमधून अलीकडेच पदविकाधारक १६९ विद्यार्थ्यांची पहिली तुकडी यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडली. |
बांधकाम क्षेत्रातील आघाडीची सेवा पुरवठार जॉन्स लॅन्ग लासेलेच्या भारतीय व्यवसायाने आता किरकोळ मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रातही शिरकाव केला आहे. यासाठी कंपनीने एव्हरस्टोन कंपनीबरोबर सहकार्य केले असून या अंतर्गत महाराष्ट्रातील पुण्यासह गुजरातमधील दोन शहरांमध्ये चार मॉलचे व्यवस्पापन केले जाणार आहे. |
इंडियन ऑईलला उत्कृष्टतेचा पुरस्कार |
|
|
तेल व वायू पुरवठा साखळीतील आघाडीची कंपनी म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन’चा गौरव करण्यात आला आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या सहाव्या एक्स्प्रेस, लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन पुरस्कार सोहळ्यात कंपनीच्या विपणन विभागाचे संचालक एम. नेने यांनी कार्यकारी संचालक (पुरवठा) एस. बालसुब्रमण्यम यांच्यासह हा पुरस्कार स्वीकारला. |
मार्च २०१२ अखेर बँकांची दीड लाख कोटींची कर्जे थकीत मनोज जोशी , नागपूर - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२
बँकांच्या नफ्यात अडथळा ठरणारा आणि देशाच्या आर्थिक विकासातही खीळ घालणारा घटक म्हणजे एनपीए. आजघडीला बँकांच्या अनुत्पादित कर्जाची रक्कम कोटय़वधी रुपयांची असून देशातील राष्ट्रीयकृत बँकांपासून खाजगी बँकांपर्यंत सर्वानाच एनपीएच्या मोठय़ा आकडय़ांनी ग्रासले आहे. बँकेने कर्ज दिल्याच्या तीन महिन्यांनंतर, त्याची परतफेड करण्यात आली नाही तर ती थकित/ अनुत्पादित कर्जाची रक्कम ठरते आणि त्यामुळे बँकेच्या नफ्याचे प्रमाण घसरू लागते. दहा वर्षांपूर्वी, म्हणजे मार्च २००१ अखेर देशभरातील सर्व बँकांची मिळून एनपीएची रक्कम सुमारे ७५ हजार कोटी रुपये होती.
|
नवी दिल्ली , पीटीआय
विशेषत: विलंबाने झालेला पाऊस आणि त्याचे कृषी उत्पादनावरील विपरीत परिणाम पाहता, एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी)चाही भारताच्या आर्थिक वृद्धीदराबाबत अंदाज खालावला आहे. पूर्वी अंदाजलेल्या ७ टक्क्यांऐवजी मार्च २०१३ अखेर देशाला ५.६ टक्क्यांनीच आर्थिक विकास साधता येईल, असे एडीबीने ताज्या अहवालात स्पष्ट केले आहे. तथापि, नव्याने दिसून आलेली आर्थिक सुधारणांची कास आणि त्या संबंधाने धोरणाचा धडाका कायम राहिल्यास, गुंतवणूकविषयक चित्र झपाटय़ाने बदलू शकते आणि प्रत्यक्षात घसरत्या विकासाचा क्रम उलटविला जाऊ शकते, |
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
संपूर्ण सप्टेंबरमध्ये तेजीत राहिलेल्या भांडवली बाजाराने एकूणच म्युच्युअल फंडाच्या मालमत्तेला चांगलाच हातभार लावला आहे. आठ टक्क्यांनी झेपावलेल्या ‘सेन्सेक्स’मुळे ‘जुले ते सप्टेंबर या तिमाहीत फंडांचा निधीही याच प्रमाणात वधारला आहे. १ आक्टोबरपासून अंमलात आलेल्या नव्या नियमांमुळे मात्र फंडांचे भविष्य नाजूक बनले आहे. ‘सेबी’ने या कंपन्यांना एकाच लाभाची एक योजना सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यानुसार ‘एसआयपी’ योजनांचा परिणाम एकूणच या उद्योगावर जाणवणार आहे. |
व्यापार प्रतिनिधी, मुंबई
सलग तिसऱ्या सत्रात दोन्ही प्रमुख भांडवली बाजारातील तेजी कायम राहिली आहे. ४६ अंश वाढीसह ‘सेन्सेक्स’ १८,८७० पर्यंत गेला आहे; तर ‘निफ्टी’तही १२.५६ अंश वाढ झाल्यामुळे तो ५,७३१.२५ वर गेला आहे. दोन्ही निर्देशांकांनी दिवसाच्या उच्चांकाला जाताना गेल्या दीड वर्षांतील नवा टप्पा गाठला आहे. मुंबई शेअर बाजार दिवसभरात १८,९०५.६२ पर्यंत तर राष्ट्रीय शेअर बाजाराने या कालावधीत ५,७४३.२५ वर झेप घेतली. ‘सेन्सेक्स’ यापूर्वी २५ जुलै २०११ रोजी दिवसाच्या सर्वोत्तम पातळीवर तर बंद होतानाही ‘निफ्टी’ २९ एप्रिल २०११ च्या समकक्ष होता. दोन्ही निर्देशांकांनी गेल्या १४ ते १७ महिन्यानंतर पुन्हा नव्या उच्चांकाला स्पर्श केला आहे. |
यंदाच्या सणोत्सवात विक्रमी विक्रीचे वेध व्यापार प्रतिनिधी , मुंबई
आर्थिक मंदी.. खरेपाहता ती तर मनाचे खेळ आहे असे मानणाराही एक प्रवाह आहे. गेली दीड-दोन वर्षे अशी मनमस्तिष्कावर ठाण मांडून बसलेल्या मंदीच्या भावनेला बाजूला सारून यंदाचा दिवाळी सण उत्साहाने साजरा करण्याचा चंगही मग काही मंडळी बांधताना दिसत आहेत. सर्व मित्र-आप्तेष्टांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी शक्य झाल्या नाहीत तरी भेटकार्ड, भेटवस्तू पाठविण्याचे मोठे बेत असल्याचे एका ताज्या पाहणीतून पुढे आले आहे. केवळ भेटकार्डाचीच विक्री १० लाखांचा आकडा पार करेल, असे हा अभ्यास सांगतो. |
आयुर्विम्याचा ‘हप्ताबंदी’ लाभ ऋतुराज भट्टाचार्य, मुंबई
समीर, या सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या ३५ वर्षे वयाच्या युवकाने १५ वर्षे मुदतीची विमा योजना घेतली आहे. योजना सुरू झाल्यानंतर सात वर्षांनी एका दुर्दैवी घटनेत विमाधारकाला कायमचे अपंगत्व आले. जीवनातील या अघटित प्रसंगी नोकरीही टिकवता येईल काय असा प्रश्न त्याच्यापुढे असताना, पॉलिसीचे उर्वरित हप्ते भरण्याची त्याला कल्पनाही करवत नाही. परंतु आयुर्विमा कंपन्यांनी देऊ केलेली रायडर्स अर्थात विशेष लाभ याचसाठी असतात. अनेक कंपन्यांच्या आयुर्विमा योजनेत समीरसारख्या व्यक्तींवर गुदरलेल्या प्रसंगांची दखल घेऊन काळजी घेण्यात आली आहे. |
व्यापार प्रतिनिधी, मुंबई ‘एसएमई चेंबर ऑफ इंडिया’तर्फे १८ व्या वर्धापन दिनानिमित्त लघु व मध्यम उद्योजकांसाठी ‘इंडिया एसएमई लिडरशीप’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत वांद्रे-कुर्ला संकूल येथील हॉटेल ट्रायडेन्ट येथे ५ ऑक्टोबर रोजी ही राष्ट्रीय परिषद होईल. ‘एमसीएक्स’चे जिग्नेश शहा हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. |
पीटीआय , नवी दिल्ली गेल्या महिन्यात विक्रीवाढीच्या घवघवीत आकडय़ांची नोंद करणाऱ्या मारुती कंपनीने दसऱ्याच्या तोंडावर आपल्या सर्वच प्रकारच्या वाहनांच्या किंमती महाग केल्या आहेत. एक टक्क्याप्रमाणे २,५०० ते ५,२५० रुपयांपर्यंतच्या कंपन्यांच्या वाढीव किंमतीची अंमलबजावणी तातडीने होत आहे. यानुसार मारुती ८०० ते किझाशी या सर्व प्रकारच्या वाहनांच्या किंमतींवर परिणाम होणार आहे. सध्या त्या २.०४ ते १७.५० लाख रुपयांच्या घरात आहेत. |
व्यापार प्रतिनिधी , मुंबई देशातील पहिल्या क्रमांकाची आणि कट्टर स्पर्धक असलेल्या हीरो मोटोकॉर्पच्या यंदाच्या घसरत्या वाहनविक्रीचा लाभ बजाज ऑटोला झाला आहे. सर्वाधिक विक्री होणारा ब्रॅण्ड म्हणून विकसित होताना कंपनीच्या डिस्कव्हरने गेल्या महिन्यात हीरोच्या स्प्लेन्डरवर मात केली आहे. |
|
|
<< Start < Prev 11 12 13 14 15 16 17 18 Next > End >>
|