पॅनासॉनिकची नवी व्यवसाय आखणी; नवीन सेवा क्षेत्रात शिरकाव व्यापार प्रतिनिधी, मुंबई जवळपास पन्नास वर्षे जुना ब्रॅण्ड असणाऱ्या अँकर स्विच उत्पादनाबरोबरच वाणिज्यिक वापरासाठी लागणाऱ्या विविध विद्युत उपकरणांच्या व्यवसायावर अधिक भर देण्याचे अँकर ईलेक्ट्रीकल्सने निश्चित केले आहे. याअंतर्गत हॉटेल आदींसाठी केद्रीय पद्धतीने विद्युत रचना तसेच फॉम्र्युला वन, मेट्रोसाठी विद्युत उपकरण सुविधा पुरविण्यात येत आहे.
व्यापार प्रतिनिधी, मुंबई डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण पुन्हा एकदा त्याच्या ऐतिहासिक नीचांकाकडे प्रवास करू पाहतेय. भारतीय चलनातील गेल्या काही दिवसातील घसरणीने आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी ८० पैशांनी अधिक विस्तारत रुपयाला ५४.६१ या किमान स्तरावर आणून ठेवले. यामुळे रुपया तर गेल्या दोन महिन्यांच्या नीचांक पातळीवर आला असून २०१२ मधील तर त्याने दुसरी सर्वात मोठी आपटी खाल्ली आहे.
‘कन्साइ नेरॉलॅक’ला सणांच्या हंगामात मागणीतील दुप्पट वाढ अपेक्षित
व्यापार प्रतिनिधी, मुंबई रंगांच्या पुरवठय़ातील अग्रेसर कंपनी कन्साइ नेरॉलॅकला सणासुदीच्या हंगामात कंपनीच्या सजावटीच्या रंग विभागाच्या मागणीत सरासरीपेक्षा दुपटीने वाढ दिसून येत आहे. ऑक्टोबर २०१२ मध्ये रंगांची मागणीतील वाढ ३० टक्क्यांच्या घरातील असे कंपनीने स्पष्ट केले.
पीटीआय बंगळुरु
देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या विप्रो कंपनीला माहिती तंत्रज्ञान व्यवसायाच्या माध्यमातून यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत मिळालेला महसूल किरकोळ वधारला असून कंपनीने आगामी तिमाहीत मात्र ८४२७ कोटी रुपये महसुलाचा विश्वास व्यक्त केला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या विप्रो समूहाने चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत २४ टक्क्यांची नफ्यातील वाढ नोंदविली असून जुलै ते सप्टेंबर २०१२ या कालावधीत कंपनीला झालेला निव्वळ नफा १,६१०.६० कोटी रुपये आहे.