|
स्त्री. पु. वगैरे वगैरे
महेंद्र कानिटकर , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२ प्रेम व्यक्त करण्याच्या पाच प्रमुख भाषा आहेत. या भाषांपैकी तुमची प्रेम व्यक्त करण्याची नेमकी भाषा कोणती ते ठरवा. जोडीदाराची भाषा कोणती ते लक्षात घ्या आणि शेवटचा टप्पा म्हणजे आपापल्या जोडीदाराची प्रेमभाषा शिकून घ्या. कोणत्या आहेत या प्रेमभाषा? जाणून घ्या आणि कृतीत आणा.. ज शी प्रत्येकाची मातृभाषा वेगळी असते तशी प्रत्येक माणसाची प्रेम व्यक्त करण्याची भाषा वेगवेगळी असते आणि ती त्याने आपल्या आईकडूनच शिकलेली असते. आई ज्या प्रकाराने प्रेम व्यक्त करीत असते ती भाषा सहजरीत्या माणूस शिकतो आणि त्याच्याही नकळत ती त्याची प्रेमभाषा बनते, पण ढोबळमानाने प्रेमाच्या म्हणजेच प्रेम व्यक्त करायच्या प्रमुख पाच भाषा आहेत. |
महेंद्र कानिटकर ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
जिथे एका जोडीदाराला आपण अपमानित होत आहोत, आपला अनादर होत आहे असे वाटत राहते तिथे प्रेम ही भावना कशी टिकणार? जोडीदाराची भाषा शिकली नसल्यामुळे एकमेकांच्या भावना समजून घेणे अवघड होते. त्यातूनच अपमान, अनादर, चिडचीड अशा नकारात्मक भावनांचा जन्म होत असतो. म्हणूनच एकमेकांची भाषा शिकायला हवी.. |
महेंद्र कानिटकर , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कौतुक ऐकायला प्रत्येकालाच आवडत असतं मात्र अनेकांना त्याचीच सवय होते. आणि मग हेच कौतुक पती-पत्नींच्या नात्याला बिघडवू शकतं, चिडचिड वाढवणारं, निराशा देणारा ठरु शकतं. म्हणूनच कौतुक ऐकण्याच्या सवयीपासून लांब कसे राहायचे हे शिकायला हवे.. सु खी वैवाहिक जीवनासाठी इंग्रजीमध्ये असंख्य पुस्तके आहेत. त्या पुस्तकांमध्ये दिलेल्या काही सूचना मला खूप अवघड वाटतात, म्हणजे आपल्याकडे माणसे अशी वागतील का? असा प्रश्न पडतो. हा प्रश्न डोक्यात येण्याचे कारण माझी मैत्रीण सुविधा! |
महेंद्र कानिटकर , शनिवार , १ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एकेकटे राहणाऱ्या स्त्री-पुरुषांची संख्या समाजात कमी नाही. अनेकदा हे एकटेपण लादलं गेलेलं असतं. अशा वेळी एकटेपण नाहीसं कसं व्हावं, कमी कसं व्हावं या प्रश्नावर/साठी नेमकं उत्तर सापडत नाही.. चित्रविचित्र अनुभव येत असतात. काय करावं अशांनी? ए कएकटे राहणाऱ्या स्त्री-पुरुषांबद्दल मला फार पूर्वीपासून कुतूहल वाटत आले आहे. त्यांच्या जीवनाचे लक्ष्य काय असेल? जोडीदाराच्या सहवासाविना ते आयुष्य कसे व्यतीत करीत असतील. शारीरिक गरजा आपण काही काळ बाजूला ठेवू पण मानसिक गरजांचे काय, असे अनेक प्रश्न माझ्या मनात रुंजी घालत असतात. |
महेंद्र कानिटकर ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
माणसाची लंगिक प्रेरणा ही निसर्गदत्त आहे आणि त्या प्रेरणेला वाट मिळावी म्हणून समाजाने लग्नसंस्था आखून दिली आहे. या प्रेरणा दडपल्या की, नराश्य, चिंता, चिडचिड असे मानसिक त्रास होतातच, पण काही मनोकायिक आजार होण्याची शक्यता टाळता येत नाही. सुदैवाने पुरुष ५५ वर्षांपर्यंत आणि स्त्री ५२ वर्षांपर्यंत समाधानी आणि परिपूर्ण नॉर्मल कामजीवन जगू शकते. त्याकरिता एकच नियम, जो अगदी बेसिक आहे, तो पाळायला हवा.. |
महेंद्र कानिटकर ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
लग्नातील नाते कायमस्वरूपी आनंदी वा समाधानी ठेवायचे असेल तर काही नियम हे पाळावेच लागतात. आणि ते सातत्याने ताजेही करावे लागतात. काय आहेत ते नियम.. गेल्या लेखात (२८ मार्च) आपण तीन मुद्दे बघितले होते, त्याची उजळणी करून पुढे जाऊया. १. सहजीवनाचे उद्दिष्ट स्पष्ट हवे. २. जोडीदार गरज की जरुरी |
महेंद्र कानिटकर , शनिवार , २१ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
लग्न का करायचं, या प्रश्नाचं उत्तर जसं प्रत्येकाचं वेगळं असू शकतं तसंच लग्नाच्या नात्यातून मला काय हवंय, या प्रश्नाचंही उत्तर वेगवेगळं असू शकतं. आपलं वैवाहिक आयुष्य कसं घालवायचं हे प्रत्येकाच्या हातात असतं, त्यासाठी फक्त गरज असते ती नवरा-बायकोंनी एकमेकांनी संवाद साधण्याची.. कोणतंही लग्न परफेक्ट नसतं, या माझ्या आवडत्या सिद्धांतावर नेहमीच वाद होतो. ‘‘तुमचा सिद्धांत सपशेल चूक आहे,‘‘म्हणत भांडणारेही कमी नसतात. एका गृहस्थांनी तर कमालच केली.’’ ते म्हणाले, तुमच्याकडे येणारी मंडळी काहीतरी समस्या असलेली असतात.
|
महेंद्र कानिटकर , शनिवार , ७ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
परफेक्ट सहजीवन कसं असतं? या प्रश्नाचं परफेक्ट उत्तर आजतागायत कुणाला मिळालेलं नाही. कारण ते तसं नसतंच. मग सुखी, समाधानी वैवाहिक आयुष्याची व्याख्या नेमकी काय असावी? म्ह णता म्हणता आमच्या (मी व सौ. गौरी) लग्नाला गेल्या महिन्यात एकतीस र्वष पूर्ण झाली. त्याच्या अगोदर चार र्वष आमचं ‘प्रकरण’ का ‘प्रियाराधन’ म्हणतात ते चालूच होतं. थोडक्यात आम्ही एकमेकांना तब्बल पस्तीस र्वष ओळखत आहोत. या काळात अनेक समस्या आल्या. कधी कधी माझ्या बेबंद वागण्यामुळे गौरीनं टोकाची भूमिका घेऊन स्वतंत्र राहण्याची तयारीही दाखविली. परंतु या समस्यांतून शिकणं आणि आपलं सहजीवन अधिक समृद्ध करणं हे आमचं प्राधान्य होतं. |
महेंद्र कानिटकर ,शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
माणसाच्या मनात चार प्रकारचे पोलीस असतात. या पोलिसांना ट्रेनिंग द्यायचं असतं. ती एक प्रकारची कवायतच असते. नातेसंबंधात जास्तीत जास्त वेळा कोणत्या पोलिसाला आपण तैनात करतो यावर नात्याचं यशापयश अवलंबून असतं. ‘संतप्त सहजीवन’ (प्रसिद्धी, ९ जून) लेखाची पानं मी आमच्या कार्यालयातल्या स्त्री कर्मचाऱ्यांना वाचून दाखवली. |
महेंद्र कानिटकर ,शनिवार, ९ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
संतप्त सहजीवन हा काहींच्या आयुष्याचा दुर्दैवी भाग आहे. यातला एक जोडीदार कायम दुसऱ्यावर संतापलेला असतो साहजिकच त्याचं सहजीवन धोक्यात आलेलं असतं. मात्र याला मार्ग काय़ ? यासाठी आधी आपण कुठल्या स्वभावाचे आहोत ते जाणून घेणं गरजेचं आहे.. ।। एक।। मधू आमच्या बरोबरची. डॅशिंग म्हणून आम्ही तिला ओळखायचो. कॉलेजमध्ये येताना कधी कधी चक्क वडिलांची राजदूत मोटारसायकल घेऊन यायची.
|
महेंद्र कानिटकर , शनिवार, २६ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मत्रीमध्ये एकमेकांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे अगदी स्पष्ट हवे. मत्री म्हणजे प्रेम नाही हे दोघांनाही मान्य हवे. मत्री ही ज्या गोष्टी कुटुंबातल्या आणि प्रेमाच्या माणसांशी शेअर करू शकत नाही अशा गोष्टी शेअर करण्याची हक्काची जागा असते. म्हणजेच अशा ठिकाणी गोपनीयतेला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यात एकमेकांची सहानुभूती मिळवायची नसून केवळ भावनांना वाट करून देण्याचे ठिकाण असते हे भान आवश्यक आहे. हे भान म्हणजे आव्हान आहे आणि अडथळासुद्धा! |
महेंद्र कानिटकर , शनिवार , १२ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पती आणि पत्नी हे संपूर्णपणे फक्त आपलेच असले पाहिजेत आणि त्यांचा वेळसुद्धा कोणी शेअर करता कामा नये या मानसिकतेतून बाहेर पडायला काही वर्षे जावी लागतील. आकर्षण िबदू जर पती-पत्नीने एकमेकांशी मोकळ्या मनाने सांगितले तर कदाचित एकमेकांचे मित्र-मत्रिणी स्वीकारणे शक्य होईल. हे करत असताना VIRTUAL RELATIONSHIP ADDICTION ही जी समस्या आहे त्याचाही विचार करावा लागेल. नाही तर तसबिरीच्या घोटाळ्याऐवजी मोबाइल घोटाळा होऊन घरोघरी ‘संशयकल्लोळ’चे प्रयोग सुरू व्हायला वेळ लागणार नाही! |
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
Page 1 of 2 |
|
‘लोकसत्ता’चे विविध अॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-
 
वासाचा पयला पाऊस आयला
साप्ताहिक पुरवणी
लोकरंग (दर रविवारी)
चतुरंग (दर शनिवारी)
वास्तुरंग (दर शनिवारी)
व्हिवा (दर शुक्रवारी
करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)
अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)
|