सुधीर सुखठणकर ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बायकोला ‘पगार’ देण्याचा कायदा येतोय अशी कुजबूज ताडफळे कुटुंबीयांच्या कानावर आली आणि सुरिताने- त्यांच्या कन्येने कायदा येईपर्यंत आपलं लग्नच लांबवलं. ती म्हणते, बाहेरच्या नोकरीपेक्षा घरातलीच नोकरी काय वाईट? हे त्यांनी होणाऱ्या जावईबापूंच्या कानावर घातल्यावर ते घाबरले. आता जावईबापू काय करणार ? |
विभावरी केळकर , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
खरं तर ती माझ्याहून वयाने बरीच लहान, पण विचाराने, मनाने मोठीच. त्यामुळे तिचे शुभाशीर्वाद व शुभेच्छा घेऊन मी घरून बाहेर पडले. सर्व व्यवस्थित होऊन आम्ही घरी आलो. ऑपरेशनचे बिल देताना त्यात तिचे ५०० रुपये आवर्जून घातले. १५-२० दिवसांनी तिचा परिचित आवाज आला, ‘जुना सामान, डबा-बाटली’. कोणीतरी अगदी जवळची हवीशी वाटणारी व्यक्ती यावी अशी मी तिची वाटच पाहत होते..
|
नंदिनी बसोले ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
वयाचं मान म्हणजे नक्की काय असतं? सगळीच मुलं जर वयाच्या मानाने हुशार, जास्त समजदार, जास्त स्मरणशक्ती असलेली असतील तर नक्की त्या वयात तितकीच समज असणारं मूल कुठं असतं का? तसंच साठी, सत्तरी, चाळिशी, पन्नाशी वगैरेंच्या व्यक्तींनी नक्की केवढं दिसावं, अशी अपेक्षा असते? |
अंजली भागवत ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
वैदिक विधीप्रमाणे लग्न करण्याची प्रथा माझ्या आजेसासूबाई सीताबाई रामचंद्र भागवत यांच्या लग्नापासून महाराष्ट्रात सुरू झाली. महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात स्थान मिळवणाऱ्या माझ्या आजेसासूबाईंच्या लग्नाची ही गोष्ट .. टी व्ही. सध्या चालू असलेल्या ‘उंच माझा झोका’ ही मालिका पाहत असताना मला आमच्या घरातील त्या काळातील जुन्या कागदपत्रांतील काही नोंदी वाचल्याचे आठवले. |
दीपाली कात्रे ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पाऊस आज ‘खायला’ उठला होता, पण मला जायला हवं. माझ्या सखीसाठी. हो, मी तिला जवळपास आठ वर्षांनी भेटणार आहे, पण त्याआधी तिच्या ‘नातेवाईकांना’ भेटायला हवं, कारण ती नक्की विचारणार त्यांच्याबद्दल.. फोनवरून सांगणं शक्यच नव्हतं, तशी तिची अवस्थाही नव्हती.. छत्री घेतली, तरी अंगावर तुषार उडतच होते. उडू दिले त्यांना.. आज त्यांच्याशी मजा करावी असं वाटत नव्हतं. |
अनिता दिसा , शनिवार , १ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आता तो समुद्रही परका वाटू लागतो तुझ्यासारखा. भणाण वारा कानात घोंघावतो.. डोळे भरून येतात खाऱ्या पाण्याने.. त्याच्या सारख्याच.. अन् मन म्हणत राहतं, प्यासी हूँ मैं.. प्यासी रहने दो.. रहने दो.. ना समुद्रावर जायला खूप आवडतं मला! विशेषत: संध्याकाळी.. फेसाळत्या लाटा. भणाणता वारा, सरकती वाळू आणि क्षणाक्षणाला रंग बदलणारे असीम, अफाट आकाश... सगळ्याचीच एक न ओसरणारी जादू पसरलीय मनावर कायमसाठीच! कदाचित इतक्या जवळ समुद्र असूनदेखील, आयुष्यात फार उशिरा बघितल्यामुळे असेल...
|
सदानंद सिनगारे - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ताज्या कैरीचे लोणचे सासरी गेलेल्या आपल्या लेकीच्या हाती सोपविताना मनाची जी अवस्था होते ती अनुभवण्यासाठी आई-बापच व्हायला हवे किंवा सासरी गेलेली मुलगीच.. बरणी पाहताच मुलीने विचारले, ‘आई कशी आहे?’ लोणच्याला पाहताक्षणी तोंडाला सुटलेले पाणी तिच्या पापण्यांच्या कडेने जमा झाले होते .. मुरलेल्या चवदार क्षणांची गोडी अशी अवीट असतेच.. जू न महिन्याच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवडय़ात सर्वत्र लोणचे घालायचा उद्योग चाललेला असतो. माझ्या लहानपणी गावाकडे तर शेजारीपाजारी आयाबाया हा सामूहिक कार्यक्रम करायच्या. |
अमिता दरेकर ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आमच्याकडे पुन्हा ‘गोड’ बातमी आहे हे कळलं आणि आता मुलगाच होऊ दे हे वाक्य नाना प्रकारे, नाना ठिकाणाहून ऐकू येऊ लागलं. एका मुलीनंतर मुलगा हवाच हा एकच पर्याय आहे का ?
|
मीना गरीबे (जैन) ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
२६ जुलै कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो. कारगिलमध्ये शहीद झालेल्या वीरांची स्मृती जपलेल्या ‘कारगिल वॉर मेमोरियल’ची ही हृद्य भेट. |
प्रियंवदा करंडे ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२
माझी आई म्हणायची, नदीचा प्रवाह पुढे पुढेच वाहणार, पाठी नाही वळणार! तसाच संसार आहे, त्यामध्ये पुढे बघायचं, पाठी नाही वळायचं! तेच हितकारक असतं बरं सर्वासाठी! आम्ही ‘ऊर्जा’ ग्रुपच्या सात-आठ मैत्रिणी सुजाताच्या घरी जमलो होतो. श्रावणातला पहिला दिवस आणि त्यात शुक्रवार! सुजाताने श्रावणाचं अगदी जंगी स्वागत केलं. दारावर मोगऱ्याचे गजरे सोडले होते.सेन्टरपीसवर एका परडीतही मोगऱ्याचे गजरे भरून ठेवले होते. |
कमला जयंत करगुटकर , शनिवार , २८ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सकाळची वेळ होती. शाळेत जायला निघाले होते. स्टेशनवरून शाळेत जाताना चार-पाच तरी सहकारी भेटायचे. मग गप्पा मारत आम्ही जायचो. श्रावण महिना होता तो. श्रावण म्हणजे सगळ्याच गोष्टीची रेलचेल. प्रसन्न व आनंदी वातावरण. तेवढय़ात एकीने मला हटकले, ‘‘अहो मॅडम, तो बघा तुमचा विद्यार्थी शेळके. टपरीवर चहा पितोय.’’ पाहते तो तोच होता. म्हटलं, ‘‘शाळेत गेल्यावर विचारते त्याला.’’ तेव्हा मी सहावीची वर्गशिक्षिका होते. सहावीतला मुलगा टपरीवर चहा पितो? मन थोडं बेचैन झालं. तसा शेळके शांत नम्र. अभ्यासात बरा. शारीरिक शिक्षण, मैदानी खेळ यात तो हुशार होता. मितभाषी, हसतमुख. बेल झाली वर्गात गेले. वर्गात मी त्याला काहीही विचारले नाही. इतर मुलांसमोर नको तो विषय. पहिली तासिका संपल्यावर मी त्याला बाहेर बोलावले आणि विचारले. ‘‘काय रे आज तू टपरीवर चहा पीत होतास?’’ ‘‘बाई मी तर रोजच टपरीवर चहा पितो.’’
|
विजय टोकरे , शनिवार , २१ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गेल्या वीस वर्षांत टूर व्यवसायाच्या निमित्ताने मी असंख्य सहली आयोजित केल्या परंतु मुक्या -बहिऱ्या मुलांबरोबरच ती सहल अविस्मरणीय होती. वेगळाच अनुभव गाठीशी बांधला गेला. सहल संपताना एक-एक जण फ्लाइंग किसची खूण करीत जायला लागले आणि ते ‘न बोललेलं थँक्यू’ कानात रुंजी घालायला लागलं.. मु लांची बसमध्ये लगबगीने चढण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सगळे बसमध्ये बरोबर बसले की नाही याची शिक्षक मंडळींनी खातरजमा केली व बस ड्रायव्हरने हॉर्न दिला. मी बसच्या पुढील भागात ड्रायव्हरशेजारी बसलो होतो. |
|
|