पद्मा कऱ्हाडे, शनिवार,३ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
फास्ट फूडचं प्रस्थ वाढलेलं असताना घरगुती पौष्टिक पदार्थापासून केलेले हे काही खास पदार्थ, अंबाजोगाईचे. कांदा-लसूण न वापरताही चविष्ट होणारे. |
डॉ. प्रिया आमोद , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कोल्हापुरी मटण म्हटलं की पांढरा, तांबडा, सुक्कं म्हटलं जातं, पण कोल्हापुरातल्या राजघराण्यातील शाही जेवणात तीळ मटण, गुजर मटण, मेथी मटण असे असंख्य प्रकार होतात. त्यांच्या जेवणातील सगळे पदार्थ साजूक तुपात आणि पाटय़ावर वाटलेल्या अस्सल मसाल्यांचे असल्याने या जेवणाची चव न्यारी असते.. शाही असते.. को ल्हापुरी खाद्यपदार्थ म्हटलं की, साधारणपणे तांबडा-पांढरा रस्सा, मिसळ हेच चित्र कोल्हापूरबाहेरच्या माणसाच्या डोळ्यांसमोर येतं, कोल्हापुरातील जी राजघराणी आहेत, सरदार घराणी आहेत, त्यांनी वर्षांनुवर्षे एक वेगळी खाद्यसंस्कृती जपली आहे, हे मात्र फारसं कुठे माहीत नाही. |
डॉ. प्रतिमा इंगोले ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘तुझी खांडोळी करीन’ या वाक्प्रचाराला जन्माला घालणारी झणझणीत खांडोळी हा विदर्भातला एक चविष्ट पदार्थ. खांडोळी अत्यंत वेळखाऊ आणि खर्चिक असली तरी पुन्हा पुन्हा करायला प्रवृत्त करणारी.. तेव्हा करून पहाच.. रसना तृप्त करणारा एक वऱ्हाडी पदार्थ म्हणजे ‘खांडोळी’! तसा हा आटाआटीचा व वेळखाऊ पदार्थ आहे. पण तो खाल्ला की श्रम सार्थकी लागल्याची जाणीव होते. |
सई कोरान्ने-खांडेकर,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२
इटलीतल्या ‘बिस्कोटी’ या बिस्किटाच्या पदार्थात आणि आपल्या रस्क टोस्टमध्ये एक जवळचे नाते आहे. बहुतेक खाद्य संस्कृतींप्रमाणे बिस्कोटी आणि रस्क यांच्या साम्याची मुळेदेखील मानवी स्थलांतराच्या प्रवाहात सापडतील याबद्दल काहीच शंका नाही. पण एक छोटेसे बिस्कीट सात समुद्राचा प्रवास करून एका नव्या गावात, नव्या माणसांत घर करते ही काय कमी नावीन्याची गोष्ट आहे? मीलहान असताना, एक उंच, मध्यमवयीन, दाढी असलेला, थोडासा चिडलेला पठाण, लुंगी आणि पगडी घालून दर रविवारी माझ्या आजीच्या दक्षिण मुंबईतल्या पॉश बिल्डिंगमध्ये यायचा. त्याच्या डोक्यावर एक प्रचंड मोठी जर्मनची ट्रंक असे. |
अमिता बडे , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आहार हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक. मात्र नेमकं काय, केव्हा आणि किती खावं याबद्दल मतभेद असतात. डॉ. मालती कारवारकर यांनी लिहिलेल्या ‘आहारसूत्र’ मालिकेतील तीन पुस्तकांतून आहाराबाबत आपल्याकडे असलेली निरक्षरता काही प्रमाणात दूर होईल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. आज प्रत्येकाचं जीवन कमालीचं धकाधकीचं झाले आहे. घडय़ाळाच्या काटय़ाशी बांधल्या गेलेल्या आयुष्यात आपली जीवनशैलीही कमालीची बदलली आहे. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या सवयीही बदलल्या आहेत. स्वतला सिद्ध करण्याच्या नादात अनेकदा खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष केले जाते. धावपळीच्या या आयुष्यामुळे ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’ हे आपण विसरत चाललो आहोत.
|
विष्णू मनोहर , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२
गौरी-गणपतीच्या सणाला त्या त्या भागात काही विशिष्ट खाद्यपदार्थ बनवण्याची पद्धत आहे. गोडाधोडाची रेलचेल यावेळी असतेच. पण गौरी-गणपतीच्या विसर्जनाच्या वेळी किंवा महालक्ष्मींच्या जेवणासाठी काही चटण्या, भाज्या व कोशिंबिरी आवर्जून केल्या जातात. अशाच काही पाककृती.. फा र पूर्वीपासून आपल्या येथे म्हणतात की, ‘‘जेथे ज्ञान असते तेथे समृद्धी वसते.’’ याचीच प्रचीती आपल्याला या महिन्यात दिसून येते. |
लजा कुमठेकर ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एकदा मंडईतून पपई आणली. किती सुरेख केशरी रंग होता. म्हटलं नक्कीच चांगली निघेल, पण भरवशाच्या म्हशीला टोणगा म्हणतात तशी ती पपई अगदी सपक निघाली. मग काय दाखवलं माझं पाक कौशल्य .. मला स्वत:ला वेगवेगळे पदार्थ करून बघायला खूप आवडतं. विशेषत: गोड पदार्थ करायचा म्हटलं की, माझा उत्साह अगदी उतू जातो. तरी मुलगी म्हटतेच- ‘‘सारखे काय गं गोड पदार्थ करतेस?’’ माझा गोड पदार्थ करण्यात हातखंडा! |
महेंद्र कानिटकर ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अहंकार कशाचाही असू शकतो. रंग, रूप, पदव्या, नोकरी, घराणं, जात-पात, पसा, विद्वत्ता वगरे. पण वैवाहिक जीवनात यापेक्षा जास्त महत्त्वाचा ठरतो तो सदाचाराचा, मूल्यांबाबत असलेला अहंकार. मला वाटतं, लग्नाची आपली रीत म्हणजे प्रत्येकानं आपल्या अहंकाराला जपणं-वाढवणं-कुरवाळणं आहे. आणि ही सगळी परिस्थिती पाहता नात्यात प्रेमाचं बीज कोठून रोवलं जाईल यांची मी शक्यता तपासतोय.. |
कल्याणी बिदनूर ,शनिवार, ८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गावाकडची चव
मी महाराष्ट्रातली, पण लग्न झालं कर्नाटकात. तिथले पदार्थ सासूबाईंनी शिकविले आणि गेल्या ४१ वर्षांच्या संसारात ते पदार्थही आपलेसे झाले. कांदा-लसूण न वापरतासुद्धा पदार्थ चविष्ट बनू शकतात हे मी इथे शिकले.आमच्या आडनावावरूनच मला सगळे विचारतात तुम्ही साऊथ इंडियन, कर्नाटकी की कानडी- कारण बिदनूर हे आडनाव महाराष्ट्रीय वाटतच नाही. पण मी माहेरची महाराष्ट्रीय, देशपांडे आहे. |
सई कोरान्ने-खांडेकर , शनिवार , १ सप्टेंबर २०१२ प्रत्येकाची नूडल्स करायची एक खास पद्धत असते. इतक्या वर्षांत, आपण रस्त्यावरच्या चायनीज ठेलेवाल्याच्या तेलकट, हळद लावलेल्या पिवळ्या हाका नूडल्सच्या पलीकडे, पाकिटातल्या २ मिनिटांत होणाऱ्या मद्याच्या शेवयांच्या गोळ्यापासून खूप पुढे आलो आहोत. इतर धान्यांपासून तयार केलेले नूडल्स आता आपल्याला खाऊन माहिती आहेत.. आणि तरी, चायनीज खायची तल्लफ आली की रस्त्यावरचा तेलकट, खारट, कृत्रिम खाण्याच्या रंगात भिजलेला ट्रिपल शेझवान खावे असेच प्रथम वाटते.. |
लता दाभोळकर - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
भारतीय खाद्यसंस्कृती ही जगातील अन्य खाद्यसंस्कृतींपेक्षा वैविध्यपूर्ण आहे. भारतातील विविध धर्म, जाती-जमातींनी या खाद्यसंस्कृतीला समृद्ध केलं आहे. विविध संस्कृतींचा अनोखा मिलाफ भारतीय खाद्यसंस्कृतीत प्रकर्षांने जाणवतो. ही खाद्यसंस्कृती केवळ जिभेचे चोचले पुरवते असे नाही, तर आरोग्यही राखते. प्रांतवार इथल्या खाद्यपदार्थाची चव बदलत जाते, त्यात वैविध्य जाणवते. अगदी एकच पदार्थ विविध प्रकारे करण्याची हातोटी आपल्या भारतीयांकडेच आहे, याविषयी कोणाचेही दुमत नसावं.
|
शैला हळबे ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बिघडलेले पदार्थ चटकदार बनवायचे तरआणि मिक्सर,बत्ता, दुधाची पावडर, कॉर्न फ्लॉवर अशी आयुधं आणि डोकं शांत असायला हवं, जिथे या भन्नाट कल्पनांची रिळं उलगडत जातात आणि पदार्थाचं रूप होत्याचं नव्हतं होऊन जातं. खरं तर ‘नव्हतं ते होतं’ करून टाकतात. मग तुम्ही या प्रांतात नव्या असा नाही तर जुन्या! तुमच्या हातचे पदार्थ नेहमीच ‘हटके’ बनून जातात! |
|
|