डॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपल्या देशात सुमारे चार कोटी लोक थायरॉइडग्रस्त असल्याचा अंदाज आहे. त्यातही महिलांचे प्रमाण पुरुषांच्या पाचपट आहे. थायरॉइडवर काय उपाययोजना आहेत. त्याविषयी.. टेलिव्हिजनवर एक आयोडिनयुक्त मिठाची जाहिरात आपण सर्वानीच पाहिली असणार. त्यात एक जागरूक आई आपल्या कुटुंबाच्या आरोग्याकरिता आयोडिनयुक्त मीठ वापरते आणि तिची मुलगी शिकून मोठ्ठी ऑफिसर होते. |
डॉ. कामाक्षी भाटे * डॉ. पद्मजा सामंत ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
हॉर्मोन्स म्हणजे अंत:स्राव. उदा. थायरॉइड, इन्सुलिन वगैरे. तसेच सेक्स हॉर्मोन्स म्हणजे जननेंद्रियावर प्रभाव असलेले आणि त्यांचे कार्य नियंत्रित करणारे अंत:स्राव. पण यांचे कार्य तिथपर्यंतच सीमित नसते. यांचा प्रभाव आपली त्वचा, हाडे, स्तन, हृदय, मेंदू, केस म्हणजे अख्ख्या शरीरावरच असतो. जेव्हा हार्मोन्स काम करीत नाहीत तेव्हा हॉर्मोन रिप्लेसमेन्ट थेरपी वापरावी लागते. काय आहे ती.. |
डॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
हिस्टरेक्टोमी अर्थात गर्भाशय पिशवी काढण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला काही वेळा डॉक्टर देतात. काय आहेत त्याची कारणे, उपचार आणि कशी घ्यावी त्यानंतरची काळजी. गेल्या दोन-अडीच महिन्यांत गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेबाबत काही चिंताजनक बातम्या वाचनात आल्या. एका विशिष्ट राज्यात हजारो ‘अनावश्यक’, ‘हिस्टरेक्टोमीज’ (गर्भाशय काढायची शस्त्रक्रिया) केल्या गेल्या! राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेंतर्गत मिळणाऱ्या मोबदल्याच्या लालसेने हे होत होते.
|
डॉ. कामाक्षी भाटे , डॉ. पद्मजा सामंत ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बाळंतपण हे प्रत्येक स्त्रीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. बाळाच्या आणि तिच्या स्वत:च्या देखील. म्हणूनच या काळातील संभाव्य धोक्याबद्दल आणि घ्यायच्या काळजीबद्दल. लक्ष्मीबाई आपल्या गरोदर सुनेच्या अंगावर, हाता-पायांवर आलेल्या सुजेने काळजीत होती. साधारणत: २० टक्के गर्भवती महिलांच्या हाता-पायांवर सूज येते. परंतु तीनही लक्षणे- जसे की अंगावर सूज, लघवीमध्ये अल्बुमिन नावाचे प्रथिम जाणे (जे केवळ तपासणीतून कळते) आणि रक्तदाब वाढणे, असे दिसले तर त्याला ‘प्रिअॅकलेमसिया’ असे म्हणतात. |
डॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत , शनिवार , १ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बाळ दूध प्यायले नाही व आईचे स्तन मोकळे झाले नाहीत तर दूध बनण्याच्या प्रक्रियेत अडचण येते व दूध कमी बनते. त्यामुळे दूध जेवढं जास्त वापरले जाईल तितके जास्त दूध बनेल. म्हणूनच बाळाच्या गरजेसाठी ‘ह्य़ुमन मिल्क बॅंक’ स्थापन करण्यात आली आहे. आईच्या दुधाचं महत्त्व सांगणारा हा तिसरा व अंतिम लेख. ज सजसा दिवस वर येतो, तान्हुल्याच्या कामकाजी मातेचा जीव मागे घोटाळतो. ही कामकाजी माता खेडय़ातली असेल किंवा शहरातली- बिगी बिगी शेताला जाणारी असेल, धावत पळत लोकल गाठणारी, आपल्या बाळाला सोडून जाणारी असेल, पुढचे सात-आठ तास त्याला आपले दूध पाजता येणार नाही म्हणून व्याकूळते. |
- डॉ. कामाक्षी भाटे ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२ - डॉ. पद्मजा सामंत
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्तनपान हा प्रत्येक बाळाचा हक्क आहे. मात्र आईला दूध येण्याची व बाळाने ते दूध ओढून घेण्याची एक प्रक्रिया असते, ती समजून घेतली नाही तर मुलाला नैसर्गिक दूध मिळणार नाही आणि बाळ दूध ओढू शकलं नाही तर आईला दूध येणार नाही.. काय आहे ही प्रक्रिया.. न वजात बाळ रडू लागले की, घरच्या सर्वाचे धाबे दणाणतात. लेकरू काही केल्या उगी राहत नाही तेव्हा पहिला प्रश्न सर्वाच्या मनात येतो तो बाळाचे पोट भरले नसेल का? सर्वाच्या नजरा आईकडे वळतात. आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे बाळ झाल्यावर पहिले तीन दिवस आईच्या स्तनात केवळ चीक-दूधच असते. पहिले तीन दिवस दूध उतरत नाही. तिच्या स्तनाग्रावर काही थेंबच चिकट चीक-दूध दिसते. त्याकडे प्रत्येकजण साशंकपणे बघू लागतो. |
डॉ. कामाक्षी भाटे ,शनिवार, ४ ऑगस्ट २०१२ डॉ. पद्मजा सामंत
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
ऑगस्टचा पहिला आठवडा हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने मूल जन्मल्यानंतरच्या ‘फर्स्ट गोल्डन अवर’चे महत्त्व सांगणारा हा विशेष लेख. घरी बाळ येणार म्हणजे घरच्या मंडळींमध्ये केवढा उत्साह असतो. किती ती तयारी! आईबरोबरच या मंडळींनाही कल्पना असायला हवी की, जन्मल्याबरोबर बाळाला जर कशाची गरज असेल तर ते आहे आईचा स्पर्श, तिचे सान्निध्य, तिची ऊब आणि तिचे दूध! |
डॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत , शनिवार , २१ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपल्या समाजाला कुपोषण हा मोठा शाप आहे. मुख्यत्वे मुलं आणि महिलांमध्ये! भारतात गरोदर स्त्रीमधील अॅनिमिया म्हणजे रक्त कमी असण्याचं प्रमाण ८० टक्के आहे. अॅनिमिया तीव्र, मध्यम व किंचित असू शकतो. त्याप्रमाणे गोळ्या किंवा इन्जेक्शनने इलाज केला जातो.त्यासाठी आवश्यक आहे विविध तपासण्या करण्याची.गरोदर महिलांना पहिल्या भेटीत डॉक्टर हिमोग्लोबिनचे प्रमाण, रक्तगट आणि उपगट, लघवीची अल्ब्युमिनकरिता तपासणी, व्ही.डी.आर.एल., एच.आय.व्ही.ची आणि हिपेटायटीस बीची तपासणी करण्यास सांगतात.
|
डॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत , शनिवार , ७ जुलै २०१२ स्त्री एकूणच आपल्या आरोग्याविषयी उदासीन असते, परंतु गर्भारपण हे स्त्रीसाठी अत्यंत महत्त्वाचं आणि कठीणही. त्यासाठी गरज आहे गर्भारपणापूर्वीपासूनच समुपदेशन घ्यायची. हॉ स्पिटलला पोहोचण्याच्या एका घाईगर्दीच्या सकाळी लक्ष्मीबाईने लिफ्टच्या दरवाजातच अडवलं. ‘‘ताई, सुनेला दाखवायला आणायचं होतं, पण अजून पाचवाच महिना आहे. सातव्या महिन्यात ओटी भरली की माहेरी जाईल. नाव तिथंच घालू, पण पाय खूप सुजून राहिलेत पोरीचे आणि डोकंही दुखतंय!’’ ‘‘मावशी, कुठे डॉक्टरांना दाखवलंय का?’’ लक्ष्मीबाईने नकारार्थी मान हलविली. आजही अशा शेकडो तरुणी या महानगरीत प्रसूतीपूर्व तपासणीपासून वंचित राहतात, हे आपलं दुर्दैव! |
डॉ. कामाक्षी भाटे , डॉ. पद्मजा सामंत ,शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एड्स म्हणजे मृत्युदंड, हे समीकरण आता संपुष्टात आलेलं आहे. गरोदर स्त्रियांमध्ये एड्सचं प्रमाण लोकसंख्येच्या ०.५ इतकं आहे. योग्य खबरदारी, योग्य उपचार यामुळे या आजारावर मात करता येणं शक्य आहे. संजनाचा आवाज फोनवर एकदमच घाबरलेला होता. सिद्धार्थच्या अॅपेंडिक्सच्या ऑपरेशनच्या आधी डॉक्टरांनी सगळ्या रूटीन टेस्ट्स करविल्या. |
डॉ. कामाक्षी भाटे ,शनिवार, ९ जून २०१२ डॉ. पद्मजा सामंत
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
धुपणी हा पांढरा स्राव जाणं ही वेगवेगळ्या वयोगटातील अनेक स्त्रियांची तक्रार असते. पण सुरुवातीच्या टप्प्यात ती लपवली जाते. आणि मग त्याचा त्रास वाढत जातो. पांढरा पदर म्हणजे नेमकं काय आणि न लाजता डॉक्टरी उपाय करणं का गरजेचं आहे, हे सांगणारा लेख.. ‘सफेद पाणी जाणे’ याबद्दल स्त्रियांच्या मनात अनेक प्रश्न, अनेक समज-गैरसमज असतात. पांढरा पदर गेला तर खूप अशक्तपणा येतो, |
डॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत , शनिवार, २६ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्त्रियांना होणाऱ्या अनेक आजारांमध्ये पिशवी खाली सरकणे, गर्भाशय खाली येणे यांसारख्या गोष्टी आढळू शकतात, ज्याचा त्रास दीर्घकाळ सहन करावा लागतो. सुमारे दहा टक्के स्त्रियांना हा आजार होतो, मात्र त्यातील ५० टक्केच लोक डॉक्टरांकडे जातात. काय आहे हा आजार आणि त्यावर उपाय काय? बाईचे गर्भाशय म्हणजे तिच्या मुठीएवढा अवयव आहे. उलटय़ा टांगलेल्या बटव्यासारख्या पिशवीचे स्नायू अत्यंत घट्ट व चिवट असतात. ही पिशवी ओटीपोटातल्या पोकळीत स्नायुबंध व स्नायूंची आवरणे यांच्या आधाराने, तिच्या जागेवर राहते. |
|
|