पडसाद
मुखपृष्ठ >> पडसाद
 
ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

पडसाद
पडसाद - सायकलीकडे वळणे गरजेचे Print E-mail

रविवार , २८ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
१४ ऑक्टोबरच्या ‘लोकरंग’मधील ‘सायकलीला हवी प्रतिष्ठा’ हा लेख वाचून शाळा-कॉलेजच्या दिवसांची आठवण झाली. २० वर्षांपूर्वीपर्यंत शालेय शिक्षण चालू असताना भाडय़ाने सायकली देणाऱ्या दुकानामधून सायकल आणून शिकणे आणि मॅट्रिकची परीक्षा झाल्यानंतर पालकांकडे हट्ट करून नवी सायकल विकत घेणे हे अगदी ठरलेले असायचे. सायकल दुरुस्तीची दुकाने तसेच रेल्वे स्टेशनबाहेरील सायकल ठेवण्याचे सायकल स्टॅण्ड यांना वेगळेच महत्त्व असे. कुठेही लवकर पोहोचावयाचे असल्यास ‘सायकल दामटवणे’ हा शब्दप्रयोग सर्रास रूढ होता.

 
पडसाद : रविवार , २१ ऑक्टोबर २०१२ Print E-mail

रविवार , २१ ऑक्टोबर २०१२
सत्य लक्षात आणून देणारा लेख
alt

‘लोकरंग’ (१४ ऑक्टोबर)मधील राजेंद्र येवलेकर यांचा ‘मधु घटचि रिकामे पडती घरी..’ हा लेख वाचला. मोबाइल वापराचे दुष्परिणाम उजेडात आणल्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडेच. तंत्रज्ञानाचा वाढता वापर व आधुनिक जीवनशैली यांचे निसर्गसाखळी व पर्यावरण यावर होणारे दुष्परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
 
पडसाद :रविवार, १४ ऑक्टोबर २०१२ । Print E-mail

रविवार, १४ ऑक्टोबर २०१२ ।
रसिक व दर्दी बापट सर!
१६ सप्टेंबरच्या ‘लोकरंग’ पुरवणीमधील प्रा. वसंत बापट यांचा लेख वाचला व एम.ए.च्या आमच्या वर्गाला शाहिरी वाङ्मय शिकवणारे विलक्षण रसिक व दर्दी साहित्यिक परंतु अध्यापनाचे भान राखून विषयात जखडून ठेवणारे आमचे प्रिय बापटसर आठवले.
आम्हाला साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याही वेळी व आजही कालिदासाचे आकर्षण असतेच. सरांचा तर तो लाडका- प्रिय- सुहृद जिवलग. त्यामुळे त्याच्याबद्दल किती सांगू आणि कसं सांगू, कितीही सांगितलं तरी पुरणारच नाही अशी त्यांची अवस्था झालेली इथे शब्दाशब्दांत जाणवते. कारण त्यांचा स्वभावच तसा होता. एकदा बोलायला लागले की, त्यांना त्यांचे मन आवरत नसे! भरभरून देण्याचा स्वभाव. त्यात स्वत:चे सौंदर्यस्पर्शी भावनात्मकता जपणारे तरल मन.
कालिदासाचे कूळ आणि मूळ शोधायची गरज नाही किंवा त्याची प्रतिमा चितारण्याची आवश्यकता नाही तो त्याच्या शब्दांमधूनच कल्पनाविलासातूनच अनुभवावा हे सरांचे म्हणणे अगदी खरे आहे. ‘बापट’सरांच्या शब्दांचा आस्वाद घेण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल ‘लोकसत्ता’ ला मनापासून धन्यवाद!
नीळकंठ नामजोशी, पालघर.

कूस म्हणजे काय?
प्रशांत असलेकर यांचा ‘भाषा कूस बदलते आहे’ हा लेख आवडला. खरोखरच जुने शब्द (हल्लीच्या पिढीसाठी जुने) बदलत आहेत. माझ्या मैत्रिणीच्या सुनेशी गप्पा करताना मी एकदा म्हटले, ‘छे! माझा तो पिंडच नाही.’ त्यावर ती एवढय़ा मोठय़ाने हसली. मला काही कळेचना. तिचं हसणं थांबल्यावर मी विचारलं, ‘काय झालं तुला एवढं हसायला?’ तर म्हणाली, ‘अहो मावशी, ‘तो माझा पिंड नाही’ असं तुम्ही म्हणालात म्हणून मला हसायला आलं. पिंड म्हणजे महादेवाची पिंड असते ना?’ मी कपाळाला हात लावला! तिला कसं समजावून सांगावं तेच समजेना.
आणखी एक प्रसंग- भरतकाम शिकविताना मुलींना सांगितलं, ‘हे डिझाइन उशीच्या अभऱ्यावर छान दिसेल.’ तर त्यांच्या चेहऱ्यावर भले मोठे प्रश्नचिन्ह! ‘उशीच अभ्रा’ म्हणजे काय? ‘पिलो कव्हर’ सांगितल्यावर त्यांना ते कळलं.
एका सुट्टीत बहिणींची मुलं घरी आली होती. माझा दादा नित्य हवन करीत असे. त्यांनी हवन बघितलं. ती हसायला लागली. म्हणाली, ‘मामा, वाळलेल्या शेणावर तूप ओततात.’ मी ते ऐकलं. मला हसायला आलं. मी त्यांना सांगितलं, ‘त्या वाळलेल्या शेणाला गोवरी म्हणतात. dried cow dung.. कळलं? त्यांनी होकारार्थी मान हलविली. दुसऱ्या दिवशी दादा हवनाची तयारी करीत आहे हे पाहून बहिणीची मुलं म्हणाली, ‘मामा, गौरी आणू का?’
खरंच, असलेकर म्हणतात तसंच वाटतंय. भाषा कूस बदलते आहे. पण पुन्हा तेच होणार! कूस म्हणजे काय?
- सुधा जोशी, पाचोरा

 
पडसाद :रविवार , ऑक्टोबर २०१२ । Print E-mail

रविवार , ७ ऑक्टोबर २०१२ ।

३० सप्टेंबरच्या ‘लोकरंग’मध्ये गिरीश कुबेर यांचा ‘चला, चंगळवादी होऊ या..’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. किराणा दुकानदारीत थेट परकीय गुंतवणुकीच्या महत्त्वाच्या विषयावरील या लेखावर वाचकांच्या प्रचंड प्रतिक्रिया आल्या. त्यातील या काही निवडक प्रतिक्रिया. उर्वरित प्रतिक्रिया पुढील अंकी..

 
पडसाद : कोसला, स्वामी आणि देशमुख कंपनी... Print E-mail
रविवार  , ३० सप्टेंबर २०१२
गेली ५० वर्षे मराठी वाचकांना आवडलेल्या ‘स्वामी’ आणि ‘कोसला’ या कादंबऱ्यांवरचा लेख वाचला. आम्ही जिथे काम करतो त्या देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स (प्रा.) लि. या प्रकाशन संस्थेने ही दोन्ही पुस्तके प्रकाशित केली होती; तेव्हा कंपनीचे नाव ‘देशमुख आणि कंपनी’ असे होते.

 
पडसाद : रविवार, २३ सप्टेंबर २०१२ Print E-mail

कुणीही यावे नव्हे.. कुणाचीही हिंमत होऊ नये!
रविवार, २३ सप्टेंबर २०१२
कवयित्री नीरजा यांनी आपल्या ‘शब्दारण्य’ या स्तंभात ‘कुणीही यावे..’ या लेखाच्या निमित्तानं साहित्य, साहित्यिक आणि साहित्यव्यवहार यासंबंधी जी भूमिका मांडली, ती कौतुकास्पद आहे. अ. भा. मराठी साहित्य संमेलन असो किंवा विश्व साहित्य संमेलन- त्याची घोषणा झाली रे झाली की, त्यावर एककलमी टीका करणाऱ्या लोकांचे मुद्दे ठरलेले आणि ठाम असतात.

 
पडसाद :एस. एम. अण्णांचे कणखर नेतृत्व! Print E-mail

१६ सप्टेंबर २०१२
‘कायद्याचे राज्य आहे कुठे?’ या लेखात अरविंद इनामदार यांनी असे लिहिले आहे की, ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कोटय़वधींनी भाग घेतला. महाराष्ट्र पेटून उठला. पण त्याचे नेतृत्व जबरदस्त असल्याने पोलिसांच्या बंदुका कोणी पळवल्या नाहीत, की महिलेचा पदरही कोणी ओढला नाही.’

 
पडसाद Print E-mail

रविवार , २ सप्टेंबर २०१२
भ्रष्ट व्यवस्था बदलणे गरजेचे!
‘लोकरंग’(१२ ऑगस्ट)मधील ‘सारे काही बोलाचेच’ हा  गिरीश कुबेर यांचा अण्णा हजारे यांच्या व्यक्तिमत्त्वावर व त्यांच्या आंदोलनाबाबत मांडलेला लेखाजोखा आवडला.
अण्णा हजारे यांनी भ्रष्ट व्यवस्था बदलण्याबाबत जे जनआंदोलन केले व त्यांद्वारे लोकपाल विधेयक सरकार दरबारी पोहोचले आहे.

 
पडसाद : अण्णांचे भरकटत नेणारे पुढारीपण Print E-mail

२६ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
१२ ऑगस्टच्या ‘लोकरंग’मध्ये ‘सारे काही बोलाचेच’ हा लेख वाचनात आला. अण्णा हजारे यांनी गेल्या वर्षांत हजारो नागरिकांकडून प्रतिसाद मिळविला. ‘अण्णा काही तरी चांगले आणा ना,’ म्हणून हजारोंना एकत्र आणण्याची ताकद असल्यामुळे त्यांचे नाव अण्णा हजारे असावे. एक मराठी साधाभोळा माणूस भ्रष्टाचाराविरुद्ध उभा राहतो याचे खरोखर कौतुक अनेकजणांना वाटले व आम्ही भ्रष्टाचाररहित सरकारची स्वप्ने पाहू लागलो. उपोषण करून प्रश्न मिटविण्यासाठी अण्णा हजारे व इतरजणांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आमरण उपोषण केली.

 
पडसाद : हिंदीचे पुरस्कर्ते जयकांतन्! Print E-mail

रविवार  १२  ऑगस्ट  २०१२
८ जुलैच्या पुरवणीमध्ये चंद्रकांत भोंजाळ यांचा ‘जनलेखक डी. जयकांतन्’ हा लेख वाचल्यानंतर चेन्नईतील माझ्या वास्तव्यातल्या काही आठवणी जाग्या झाल्या. रिझव्‍‌र्ह बँकेत नोकरी करत असताना १९९२-९३ साली राजभाषा अधिकारी (हिंदी अधिकारी) म्हणून चेन्नईला (तेव्हाचे मद्रास) माझी बदली झाली होती.

 
पडसाद : रविवार , २९ जुलै २०१२ Print E-mail

रविवार , २९ जुलै २०१२
फाळणीसंबंधात विसंगत संशोधन
 ‘जर कुणाला भारताची फाळणी करायची असेल तर माझा मृतदेह ओलांडूनच ती करावी लागेल!’ हे महात्मा गांधींचे ऐतिहासिक उद्गार सुप्रसिद्ध आहेत. ‘अखंड भारत गांधीजींनाच नकोसा!’ हे प्रा. शेषराव मोरे यांचे विधान या उद्गारांच्या सर्वस्वी विसंगत असे आहे. भारताची फाळणी ही गत शतकातील सर्वात मोठी शोकांतिका होय. फाळणी होऊन आता पासष्ट वर्षे उलटली असली तरी ही जखम ताजीच असून तिच्यावरची खपली काढताच भळाभळ रक्त येते. ही फाळणी टाळता आली असती का? फाळणीला आपल्या पुढाऱ्यांचा छुपा पाठिंबा होता का? हे सखोल संशोधनाचे विषय आहेत. मात्र, एक गोष्ट खरी, की ‘अखंड’ भारतात काँग्रेसला सत्ता मिळण्याची आणि पंडित नेहरूंना पंतप्रधानपद मिळण्याची शक्यता फारच अंधुक होती. तसेच मुस्लीम लिग व जीनांच्या आडमुठेपणामुळे सरकार चालविणेही महाकठीण ठरले असते. भारताच्या स्वातंत्र्याचा तसेच फाळणीचा ठराव इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये ३ जून १९४७ रोजी ब्रिटिश पंतप्रधान अ‍ॅटली यांनी मांडला. त्यानुसार भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आणि हिंदू-मुस्लीम लोकसंख्येची अदलाबदल हे प्रस्ताव त्यात होते. १५ जून १९४८ ही तिथी सत्तांतरासाठी निश्चित केली होती. परंतु त्यावेळी आपल्या नेत्यांचे सरासरी वय पासष्ट वर्षे होते आणि त्यांना आपल्या हयातीतच सत्ता-संपादनाची घाई झाली होती, हे सत्य होय. आपल्या तत्कालीन पुढाऱ्यांमधील दूरद्रष्टी व व्यवहारज्ञानाचा अभाव यामुळे फाळणीची भीषणता अधिकच वाढली.
- प्रकाश बांबोळकर, म्हापसा, गोवा.

डॉक्टरी पेशावर आजही अतूट विश्वास
१० जूनच्या पुरवणीत डॉ. संजय ओक यांचा ‘तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म?’ या शीर्षकान्वये लिहिलेला लेख योग्यच आहे. एवढेच नव्हे तर तो साहित्य, संस्कृती व समाजास योग्य त्या वैचारिक रुळावर नेणारा एक प्रामाणिक प्रयत्न आहे असेच म्हणावे लागेल. डॉ. संजय ओक हे महाराष्ट्रातील ख्यातनाम डॉक्टर आहेत. एवढेच नव्हे तर ते उत्तम लेखक व उत्तम संस्कृतीचे पालक आहेत.  आपले अनुभव जनतेसमोर मांडून जनतेला त्यांचा मुद्दा पटविण्याचा व शिक्षण देण्याचा ते प्रयत्न करीत असतात. डॉक्टरी व्यवसायासंदर्भात त्यांनी जो लेख लिहिला आहे त्याची महती मोठी आहे. त्यांनी ज्या वैचारिक पातळीवरून हा लेख लिहिला आहे ती उच्च दर्जाची आहे. खरे तर हा मानवी मूल्य जपणारा उच्च स्तर डॉक्टरी पेशात असायलाच हवा. कारण  हा पेशा म्हणजे नफा-तोटय़ाचे गणित मांडणारा व्यवसाय नव्हे, तर मानवी मूल्यांची कदर करणारा पेशा आहे. तो जनसेवेचा वसा आहे. आणि म्हणूनच इतर व्यवसायांच्या तुलनेत वैद्यक व्यवसायावर आणि तो करणाऱ्यांवर लोकांचा विश्वास असतो आणि राहणार आहे. ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाने तो ढळणार नाही. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाला सरकारने, सत्ताधाऱ्यांनी व प्रसारमाध्यमांनी उचलून धरले आहे. पण या समस्यांच्या बुडाशी आहे- देशाचा राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ऱ्हास. ‘सत्यमेव जयते’ पाहताना सर्वच क्षेत्रांत होणाऱ्या ऱ्हासाबाबत कुठल्याही प्रामाणिक व देशाभिमानी व्यक्तीला चिंता वाटल्याशिवाय राहणार नाही. भारतातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या सरकारने जागतिकीकरण, खासगीकरण व उदारीकरणाच्या नीतीचा अंगीकार करण्याचा ठाम निश्चय करून त्यावेळच्या संसदेला या अनिष्ट नीतीला बांधून घातले, तेव्हापासूनच आजची ही मानवतेस मारक अशी प्रवृत्ती समाजातील सर्व क्षेत्रांत व सर्व थरांत रुजली आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे आर्थिक लोभ व स्पर्धा हाच जागतिकीकरणाच्या नीतीचा पाया असल्याकारणाने सर्वच क्षेत्रांत आर्थिक लोभासाठी स्पर्धा होत आहे आणि त्याचा सामान्य जनता बळी ठरत आहे. या दृष्टीतून ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाबाबत टीका करणे आवश्यक ठरते.
डॉ. संजय ओक या अनिष्ट प्रवृत्ती ती थांबविण्यासाठी पर्याय शोधत आहेत. त्याच्या बुडाशी वर नोंद केलेल्या व्यथा आहेत. यास्तव तिसरे साम्राज्यवादाविरोधी र्सवकष युद्ध अनिवार्य आहे, असे प्रामाणिक देशाभिमानी जनतेस वाटणे साहजिकच, नाही का!
- सुंदर नवलकर

अंतर्मुख करणारं पत्र
‘लोकरंग’मधील (२२ जुलै) ‘शिवार’ सदरातील पत्रानं खूपच अंतर्मुख केलं. बदलत्या ग्रामीण व शहरी विश्वाचं अचूक व सुस्पष्ट चित्रण या लेखामध्ये वाचायला मिळालं. प्रशासकीय यंत्रणेची दुरवस्था आणि त्यातील अपप्रवृत्ती, वाचनसंस्कृती, स्त्रीभ्रूणहत्या, जगण्यातला कृत्रिमपणा, मालिकांचा समाजावरील प्रभाव, नातेसंबंधातील तुटलेपणा या प्रचलित विषयांना राजकुमार तांगडे यांनी अतिशय नावीन्यपूर्ण व प्रभावीरीत्या वाचकांपर्यंत पोहोचवले आणि या प्रत्येक विषयाबद्दल नव्याने विचार करायला प्रवृत्त केले. पत्राच्या शेवटी मात्र या सर्व समस्यांची सोडवणूक करण्याच्या आणि ग्रामीण व शहरी भागांतील अंतर कमी  करण्याच्या दृष्टिकोनातून ‘आता गाव-शहर एक यावा, नवं काही घडावा..’ असा आशावाद व्यक्त केला आहे. त्यामुळे कार्यप्रवृत्त होण्यास प्रेरणा मिळते.
- आम्रपाली कैलास येसगे
देगलूर, जि. नांदेड
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

 
पडसाद : Print E-mail

रविवार २२ जुलै २०१२
पाकिस्तानची मागणी ही मुस्लिमांची घोडचूक!
‘अखंड भारत गांधींनाच नकोसा!’ या विषयावरील प्रा. शेषराव मोरे यांनी लिहिलेल्या ग्रंथासंबंधी त्यांनीच लिहिलेल्या लेखावर ‘लोकरंग’मध्ये अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विविध वाचकांनी जे प्रश्न मांडले आहेत त्याचे सविस्तर आणि सप्रमाण उत्तर प्रा. शेषराव मोरे यांनी द्यावे,

 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो