प्रशांत दीक्षित - मंगळवार, ६ नोव्हेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बक्षिसी व लाचखोरी यांचा थेट संबंध संशोधनातून दिसून आला. नवस हासुद्धा बक्षिसीचा प्रकार नाही का, यावरही विचार झाला पाहिजे.लाच, भ्रष्टाचार हा विषय भारतापुरता मर्यादित नाही. जागतिक बँकेने केलेल्या पाहणीनुसार जगाच्या एकूण उत्पन्नापैकी तीन टक्के रक्कम भ्रष्टाचारात हडप होते. जगातील प्रमुख २८ अर्थसत्तांमध्ये क्रम लावला असता भ्रष्टाचारात भारताचा क्रम आठवा लागतो. रशिया पहिल्या क्रमांकावर आहे. |
प्रशांत दीक्षित - मंगळवार,३० ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
अन्य देशांच्या तुलनेत भारतात उद्यमशीलता का बहरत नाही? जागतिक बँकेचे दोन अहवाल व गॅलप यांनी केलेल्या ताज्या पाहणीमध्ये याची उत्तरे मिळतात. उद्योजक असल्याचा टेंभा मिरविणाऱ्या नेत्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे. |
प्रशांत दीक्षित ,मंगळवार, १६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
मानवी मेंदूतील ‘बुद्धी’चे केंद्र मेंदूच्या पुढल्या भागात, म्हणजेच कपाळ आणि टाळू यांच्या मधल्या भागाखाली मेंदूचा जो भाग येतो, तेथे असते.
वाद राजकीय असोत, आर्थिक असोत वा कौटुंबिक. ते सोडविण्यासाठी बुद्धीची गरज असली तरी वाद घालताना ती झोपलेलीच असते. तर्कशुद्ध युक्तिवाद करूनही लोकांचे मतपरिवर्तन होत नाही ते यामुळे. कारण जुन्या मतांमागे भावनांचा जोर असतो. तर्कशुद्ध युक्तिवाद माणसाचे मत बदलतो का? केवळ राजकारणातच नव्हे तर रोजच्या व्यवहारातही माणसावर प्रभाव कशाचा पडतो, भावनांचा की बुद्धीचा? |
प्रशांत दीक्षित ,मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
संपत्ती व समाधान यांच्यात समतोल साधणारा व्यवहारी मार्ग कोणता, असा प्रश्न सध्या वारंवार केला जातो. गीतारहस्यात त्याचे उत्तर सापडते आणि भारतीय तत्त्वविचारांकडे नव्याने पाहण्याची आवश्यकता लक्षात येते. युरोप व अमेरिकेने गेल्या पन्नास वर्षांत भरपूर समृद्धी उपभोगली. पण तेथील माणसाला समाधान मिळाले नाही. उलट तो अधिकाधिक उपभोगाच्या मागे लागला. झटपट पैसे मिळविण्यासाठी चुकीचे मार्ग निवडले गेले. त्यातून आर्थिक मंदी आली. मंदी कोणत्याही नैसर्गिक कारणांमुळे आलेली नाही, तर आत्यंतिक नफा कमविण्याचा काहीजणांचा हव्यास हे त्यामागील एक प्रमुख कारण आहे.
|
प्रशांत दीक्षित ,मंगळवार, २ ऑक्टोबर २०१२ :
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
देशाच्या वाढत्या जीडीपीबरोबर जनतेचे समाधान वाढले पाहिजे, पण तसे होत नाही, कारण आर्थिक सुधारणा स्वीकारण्यास योग्य अशी मानसिकता बनलेली नसते. आर्थिक सुधारणांमुळे थोडी अस्थिरता येत असली तरी स्थिरतेचा हव्यास माणसाचा उत्कर्ष रोखतो. जनतेच्या हातात अधिक पैसा दिला की जनता समाधानी होत जाते हे सर्वमान्य गृहीतक. या गृहीतकावरच सर्व देशातील धोरणे ठरविली जातात. देशाच्या ठोक राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडय़ाला महत्त्व येते ते या गृहीतकामुळे. भारताचा विकास दर आठ टक्क्यांच्या वर गेला म्हणजे भारतातील अधिक लोक श्रीमंत झाले, म्हणजेच भारतात अधिक समाधान नांदू लागले, असे तर्कशास्त्र मांडले जाते.
|
प्रशांत दीक्षित ,मंगळवार, २५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘शेटजी विरुद्ध जनता’ या राजकीय कहाणीच्या जागी भांडवलशाहीला प्रतिष्ठा देणारी नवी राजकीय कहाणी रुजविण्याचा प्रयत्न मनमोहन सिंग यांनी १९९१मध्ये केला. आज पुन्हा ते तशीच धडपड करीत असले तरी जुन्या कहाणीचा प्रभाव ओसरलेला नाही. मनमोहन सिंग यांनी किराणा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला वाव देण्याचा निर्णय घेतला आणि भारतात पुन्हा एकदा दोन विचारधारा एकमेकांशी भिडल्या.
|
प्रशांत दीक्षित ,मंगळवार, १८ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
जग मंदीच्या वावटळीत सापडले तरी दान करणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसते. याचे कारण दान देणे ही त्यागाची नव्हे तर आनंदाची क्रिया आहे. हा आनंदच माणसाला मदत करण्याची प्रेरणा देतो. हे वैज्ञानिक सत्य आहे, कल्पना नव्हे. एकहार्ट या अमेरिकेतील भागात एके काळी पैसा मुबलक खेळत होता, मात्र मंदीचे तडाखे एकहार्टला सर्वात आधी बसले. अमेरिकेत सर्वात जास्त बेरोजगार या भागात नोंदले गेले. बराक ओबामा यांना तीन वेळा या भागाला भेट द्यावी लागली.
|
प्रशांत दीक्षित, मंगळवार, ११ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सूरक्षेत्राचा व्यापार व त्याचे कुरुक्षेत्र करणारे राजकारण यामागे खेळ असतो मानवी भावनांचा. तो समजून घेतला तर दोहोंच्याही आहारी न जाता मानवी कल्याणाची त्यापलीकडील ओढ आपण समजून घेऊ शकतो.. आशा भोसले यांचे सूरक्षेत्र आणि त्याला झालेल्या विरोधाने आठवडाभर माध्यमांना चांगले खाद्य पुरविले. वाद घालायला काहीतरी विषय हवा ही फक्त माध्यमांची गरज नसते, ती सामान्य माणसाचीही असते.
|
प्रशांत दीक्षित,मंगळवार, ४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
इव्हान क्रास्टेव्ह..‘टेड’च्या व्यासपीठावर
समाजातील चांगल्या बदलांना काळी किनारही असते.पब्लिक इंटलेक्चुअल ती लक्षात आणून देतो व आपल्याला सावध करतो. ‘पब्लिक इंटलेक्चुअल’ ही संकल्पना आपल्याला फारशी परिचित नाही. विद्यापीठात मौलिक संशोधन करीत असताना समाज आणि सरकार व अन्य संस्था यांच्यातील परस्परसंबंध उलगडून दाखवीत जनतेला जागरूक करण्याचे काम पब्लिक इंटलेक्चुअल करतो. |
प्रशांत दीक्षित, मंगळवार, २८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
जनतेचे वय व सरकारचे वय हे परस्परपूरक असले की देशाचा गाडा सुरळीत चालतो. भारतात आज तरुणांची संख्या सर्वाधिक असली तरी देशाचा गाडा हाकणारे सत्तरीत पोहोचले आहेत.. साहजिकच देश मंदगतीने चालणार. भारत आज जगातील सर्वात तरुण देश म्हटला जातो. जगातील बलाढय़ देशांशी तुलना करता भारतात सर्वाधिक तरुण आहेत. भारताचे सरासरी वय हे अवघे २६ वर्षे आहे. वीस ते तीस या वयांतील सर्वाधिक लोकसंख्या जगात भारतामध्ये आहे. पण भारतामध्ये जोश, सामथ्र्य, नावीन्य, कल्पकता अशी तरुणाईची वैशिष्टय़े फारशी दिसत नाहीत.
|
प्रशांत दीक्षित - मंगळवार, २१ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
विज्ञान व सामाजिक शास्त्रे यांचा परस्परांशी संबंध नाही अशी आपली समजूत आहे. परंतु सामाजिक घटनांचे विश्लेषण व अंदाज बांधण्यासाठी विज्ञान व गणित उपयोगी पडते. इतकेच नव्हे तर गणितीय अंदाजामुळे दंगलीसारख्या घटना कदाचित रोखताही येतात. मुंबईतील दंगलीचा पंचनामा सध्या सुरू आहे. ती पूर्वनियोजित होती की अचानक सुरू झाली, जमाव कशामुळे हिंसक बनला, पोलीस बेसावध की त्यांची पूर्वतयारी पुरेशी नव्हती, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. भारतातील राज्यकारभाराची पद्धत पाहता या प्रश्नांना उत्तरे मिळतील अशी आशाही करता येत नाही.
|
प्रशांत दीक्षित - मंगळवार, १४ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ‘टीम अण्णा’ने आणि त्यांच्या बाबत भाबडा आशावाद बाळगणाऱ्या नागरिकांनी निवडणुकीचे अर्थकारण समजून घेतलेले बरे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लोकशाहीच्या शुद्धीकरणाची मोहीम कुठून सुरू करायची, हे त्यावरून लक्षात येईल. अण्णा हजारे यांच्या भोवतीच्या गटाने राजकीय पक्ष स्थापून रीतसर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला अद्याप अण्णा हजारेंची संमती मिळालेली नाही.
|
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
Page 1 of 2 |