अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३८. शिवोऽहं शिवोऽहं! Print E-mail

मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२
भज गोविंदम् या आदि शंकराचार्य यांच्या स्तोत्राच्या अनुषंगाने आपण जो मागोवा घेतला त्याचा समारोप करताना ‘भज गोविंदम्’ या दोन शब्दांचा अधिक विचार केला पाहिजे. यात गोविंदाचं भजन करायला सांगितलं आहे. या ‘गोविंद’चा अर्थ काय? गोविंदचा पहिला सरळ अर्थ आहे परमात्मा आणि दुसरा अर्थ दुनियेत गोवलेल्या माझ्या मनाला त्या गुंत्यातून सोडविणारा सद्गुरू.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३७. आनंदयोग Print E-mail

चैतन्य प्रेम, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
भगवंताच्या मार्गावर मला चालायचं आहे पण मी चालू शकत नाही, या जाणिवेनं असहाय्य होणं म्हणजेच अहंकार सुटणं आहे. ‘मी’ करीन, ‘मी’ भगवंताला प्राप्त करीन, हा अहंकारच. तो सुटू लागला की खरी वाटचाल सुरू होते. ही वाटचालही तोच करून घेतो. त्यासाठीचे उपाय तोच सांगतो. अशाश्वताचं खरं स्वरूप उमगू लागलं की अशाश्वताचा मोह ओसरू लागतो.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३६. जशी तुमची इच्छा Print E-mail

 

शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२
पत्रंपुष्पंफलंतोयं अशा भौतिकातल्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींच्या त्यागातूनच हळुहळू भौतिकातील आसक्तीचा व्यापक त्यागच प्रभू शिकवतात. नव्हे, भक्ताकडून तो करवूनही घेतात. पत्रंपुष्पंपासून सुरू होणाऱ्या या वाटचालीचे पूर्णत्व असते ‘सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज’ हे साधण्यात. जो साक्षात् परमात्मा माझ्यासमोर प्रकटला आहे, त्याच्या आज्ञेनुरूप वागूनच हा योग साधू शकतो, हे जाणून अखेर अर्जुन उद्गारला, ‘‘नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत। स्थितोऽस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव।।’’ (अ. १८ / श्लो. ७३) हे प्रभो, तुझ्या कृपेमुळे माझा मोह नष्ट झाला.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २३५. पत्रंपुष्पंफलंतोयं Print E-mail

 

शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
पान, फूल, फळ आणि पाणी देणं काही एवढं कठीण नाही! म्हणजेच भौतिकातलं माझ्याकडे जे काही आहे त्यातलं प्रभूला किंचित अर्पण करण्याची ही सुरुवात आहे. पण त्याचंही भगवंताला कौतुक आहे. ज्ञानेश्वरीत एक ओवी आहे, वडिलांनी भोजन तयार केलं, वडिलांनीच ताट वाढलेलं आणि लहान मूल त्यातला चिमुकला घास बापाला भरवतं, त्याचाही त्याला मोठा आनंद होतो! अगदी त्याचप्रमाणे समस्त भौतिकाचा स्वामी तर तोच असताना त्यातलंच मी किंचितसं त्याला अर्पण करतो, तेव्हा त्यालाही त्याचा आनंदच होतो.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक -२३४. पुन्हा Print E-mail

गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
सर्व मनोधर्माचा त्याग करून प्रभूला शरण जाणं, ही सोपी गोष्ट नाहीच. पण हाच एकमेव मार्ग आणि त्यासाठीचे उपाय प्रभूंनी आधीच अनेकवार सांगितले आहेत. म्हणून अर्जुनाला सांगताना ‘पुन्हा’  हा शब्द प्रभूंनी वापरला. आपल्याकडे येण्यासाठीचे सर्व मार्ग सांगतानाच त्यात परमात्मशरणता आणि परमात्मलयता यांचाच उच्चार प्रत्येक मार्गाच्या समारोपात प्रभूंनी केला आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 3 of 12