अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२३. तळमळ आणि कळकळ Print E-mail

 

शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२
हाव आणि त्यातून होणारी धावाधाव ओसरली की जे आहे त्याकडेही लक्ष जाईल. माझ्या देहधारणेसाठी आणखी काय आवश्यक आहे, याचा विचार मग योग्यपणे करता येईल. कर्तव्यापोटी प्रारब्धानुसार मी पिता म्हणून पुत्रासाठी, पुत्र म्हणून माता-पित्यासाठी, भाऊ म्हणून भावासाठी, पती म्हणून पत्नीसाठी बांधील आहे. त्यांच्यासाठी माझी कर्तव्य काय, याचाही यथायोग्य विचार सुरू होईल. आजवर मोहामुळे मी अनावश्यक ते मिळविण्यासाठीही व्यर्थ धावत होतो, व्यर्थ शक्ती खर्च करीत होतो, हे उमगेल.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२२. धाव Print E-mail

गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२
यथालाभ संतोष: अशी उक्तीच आहे. म्हणजे जे मिळालं आहे तेवढय़ावर समाधान माना. आता हा बोध उद्यमशीलतेविरोधातला नाही का, ‘अतृप्ती’ हा दोष नसून उलट माणसाला कार्यप्रवण करणारा, प्रयत्न आणि पुरुषार्थासाठी त्याला प्रेरणा देणारा गुणच का मानू नये ; असे प्रश्न सहज उद्भवतात. पण जे मिळालं आहे, त्यात समाधान मान, अतृप्ती सोड, हा बोध आहे कुणाला? तो आळशी माणसाला नाही. तो भौतिकाच्या ओढीने अहोरात्र धावत असलेल्याला आहे!

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२१. सहजप्रवृत्ती Print E-mail

 

बुधवार, १० ऑक्टोबर २०१२
जीव सदा अतृप्त असतो, असमाधानी असतो याचं कारण त्याच्या सहजप्रवृत्ति. जिवात सात सहजप्रवृत्ती असतात, असं पातंजली ऋषी सांगतात. या सात सहजप्रवृत्ती वा प्रेरणा म्हणजे प्रेप्सा, जिहासा, जिज्ञासा, चिकीर्षां, शोक, भय आणि अतृप्ती! अमुक एक मिळवावे, ही ओढ म्हणजे प्रेप्सा, आपल्या वाटय़ाला आलेल्या पण दुखकारक गोष्टींबद्दल तिटकारा वाटून ती गोष्ट नकोशी वाटणे ही जिहासा, नवीन समजून घेण्याची लालसा म्हणजे जिज्ञासा, कृती करण्याची ओढ म्हणजे चिकीर्षां, घडून गेलेल्या गोष्टीने मनात उठणारी तीव्र खेदयुक्त वृत्ती ही शोक, भविष्यात काय घडेल, याच्या नकारात्मक कल्पनेने मनाला व्यापणारी वृत्ती म्हणजे भय आणि वर्तमानात जे वाटय़ाला आलं आहे त्याबद्दल समाधान नसणे म्हणजे अतृप्ती!

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २२०. शुद्धी Print E-mail

मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
काया, वाचा, मनानं अपावित्र्याचा त्याग म्हणजे शौच. आता परमात्मप्राप्ती हे जिवाचं जीवनध्येय आहे. त्यासाठी देह हा त्याचा आधार आहे. त्या जीवनध्येयाच्या आड येणाऱ्या गोष्टींपासून देहाला दूर राखणं हे झालं कायिक शौच. परमात्म्याचा जप मी वाणीनं करतो.

 
अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २१९. यम-नियम Print E-mail

 

चैतन्यप्रेम, सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच यम आहेत. या पाचही तत्त्वांचं माहात्म्य आपल्या समाजात प्राचीन काळापासून वर्णिलं आहे. पण त्यांच्या आकलनाबाबत आणि आचरणाबाबत गोंधळही आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>

Page 6 of 12