|
वाचावे नेट-के : अर्धविरामांच्या अधेमधे.. |
|
|
अभिनवगुप्त, सोमवार, ५ नाव्हेंबर २०१२
समजा कुणा ब्लॉगलेखक वा लेखिकेनं, स्वत:च्या आयुष्यातल्या अनेक तपशिलांची साररूप यादी एकाच पल्लेदार वाक्यात मांडली, तर वाचक काय करील? वाक्य मोठं आहे, याबद्दल नाकं मुरडेल की वाक्याच्या लांबीकडे लक्ष न देता अर्थाची सखोलता पाहील? स्पष्ट, पण कमीतकमी शब्दांत लिहिताना काही तडजोडी कराव्या लागतात. वाचक त्या स्वीकारतात का? कधी कधी- विशेषत: माहितीपर लिखाण करताना तर या तडजोडी लेखकाला आणखीच जाचक होत असतील..
|
|
वाचावे नेट-के : आरशात आरसा.. |
|
|
अभिनवगुप्त, सोमवार, २९ ऑक्टोबर २०१२
‘मला सारखं काही तरी वाटत तरी असे किंवा मी वाटवून तरी घेत असे’ असं आधुनिक मराठीतल्या श्रेष्ठ लेखिका कमल देसाई यांचं वाक्य आहे. त्यापुढे- ‘एकदा मला वाटलं, पाणी व्हावं. मग मी बरेच दिवस पाणी होते. एकदा पाण्याला वाटलं, मी व्हावं. मग पाणी बरेच दिवस मी होतं. कुणाला कळलंच नाही, पाणी मी होतं ते’ अशी वाक्यं आहेत. ‘काळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई’ या दोन लघुकादंबऱ्यांच्या पुस्तकात, ‘काळा सूर्य’मध्ये ही वाक्यं सापडतील. कथानक पुढे नेण्यासाठी फार उपयोगी नाहीत ती. तरलपणा कुठं आला, कसा आला याचं हे वर्णनही तरलच- असा याचा एक अर्थ काढता येतो.
|
वाचावे नेट-के : बिनटोकांचे टोक.. |
|
|
अभिवगुप्त, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२ उल्लेख झालेल्या ब्लॉगचा पत्ता: http://mahavichar.blogspot.com सूचना, प्रतिक्रिया आणि ब्लॉगच्या सकारण शिफारशीसाठी:
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
महावीर सांगलीकर यांचे ब्लॉगलिखाण नवोदितासारखे नाही, सिद्धहस्त लेखकासारखा ओघ त्यांच्या लेखणीत आहे. ब्लॉगलिखाण आणि पुस्तकांचे लिखाण निरनिराळे असते, हा बचाव महावीर सांगलीकर यांच्या लिखाणाबद्दल लागू पडू नये, तो याच कारणासाठी.
|
|
वाचावे नेट-के : मतस्वातंत्र्यावरचे स्वार.. |
|
|
अभिनवगुप्त, सोमवार, १५ ऑक्टोबर २०१२
‘राजा हा रयतेचा उपभोगशून्य स्वामी’ हे वाक्य कोणत्याही काळात, कोणत्याही भूमीवरच्या राज्यकर्त्यांनी ध्यानात ठेवावे, असे आहे आणि राम गणेश गडकरी यांच्या ‘राजसंन्यास’ या नाटकातील ‘संभाजी’च्या तोंडी ते वाक्य आहे. हे नाटक अपूर्ण असतानाच गडकरी यांचे निधन झाले. राजाने राज्याचा उपभोग न घेता प्रजेची सेवा करायची असते, हा आदर्शवत् राजकीय विचार जुना आहे आणि त्याचा शोध काही गडकरी यांनी लावलेला नाही.
|
वाचावे नेट-के : अनुभवसिद्धता |
|
|
सोमवार, ८ ऑक्टोबर २०१२ प्रख्यात दिवंगत लेखक भाऊ पाध्ये यांनी समाजाचं निरीक्षण खुलेपणानं आणि समपातळीवरून मांडलं म्हणून ते ‘ब्लॉगरांचे बाप’ ठरतात, असा उल्लेख गेल्या आठवडय़ाच्या ‘वाचावे नेट-के’मध्ये होता. त्यातल्या ‘समपातळी’बद्दल काही विनाकारण गैरसमज होण्याचा संभव आहे. शिवाय ब्लॉगर इतक्या प्रकारचे असतात की, नेमक्या कोणत्या प्रकारच्या ब्लॉगरांना पाध्ये पितृतुल्य वाटले पाहिजेत, हाही प्रश्न रास्त आहे.
|
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>
|
Page 1 of 5 |