वाचावे नेटके
मुखपृष्ठ
 
ई-पेपर
 
 


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

वाचावे नेटके
वाचावे नेट-के : संवेदनांची (बदलती) ब्लॉगभूषा.. Print E-mail

 

सोमवार, २० ऑगस्ट २०१२

कल्पना करा की, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मराठी ब्लॉगजगताबद्दल दोन परिसंवाद ठेवण्यात आले आहेत.. आयोजकांनी विषय अगदी चोखंदळपणेच निवडलेले आहेत: पहिला आहे, ‘मराठी ब्लॉग साहित्याने आत्मपरतेचा उंबरठा कुठे ओलांडला’ आणि दुसरा आहे, ‘मराठी ब्लॉगर मराठीपणाच्या कक्षा विस्तारत आहेत?’
कल्पनांचे पतंग बदवणं आवडत असेल, तर ‘आतल्यासहित माणूस’ या ब्लॉगबद्दलचा अभिप्राय एका वाक्यात- या ब्लॉगच्या कर्त्यां नीरजा पटवर्धन यांचा समावेश दोन्ही परिसंवादांत कसा करावा असा पेच आयोजकांना पडेल, इतका दम या ब्लॉगमध्ये आहे! कल्पनांचा हा खेळ पसंतच नसेल, तर पुढे वाचा :

 
वाचावे नेट-के : कलेक्टराच्या कथा.. Print E-mail

 

अभिनवगुप्त : सोमवार, १३ ऑगस्ट २०१२

या ब्लॉगवर स्वत:चा एकही फोटो लेखकानं ठेवलेला नाही. हे एकच छायाचित्र लेखकानं स्वत: टिपलेलं- ‘माझा राऊ’ या १४ मार्च २००९च्या नोंदीतलं!
‘आळश्यांचा राजा’ हे एका ब्लॉगलेखकाचं टोपणनाव आहे आणि ‘शाणपट्टी : एका मराठमोळ्या ओडियाची’ हे त्याच्या ब्लॉगचं नाव. शाणपट्टी वगैरे ठीक आहे, पण ‘मराठमोळ्या ओडियाची’ म्हणजे काय? - नोकरीनिमित्त ओरिसात (हल्लीच्या उदिशा राज्यात) गेलेल्या आणि या नोकरीसाठी उडिया भाषाही शिकलेल्या एका मराठी अधिकाऱ्याची.

 
वाचावे नेट-के : एक ‘समृद्ध’ आत्मकथा Print E-mail

अभिनवगुप्त - सोमवार, ६ ऑगस्ट  २०१२

रा. कों. जुमळे यांनी त्यांचेच अन्य दोन ब्लॉग असताना, आत्मकथन लिहिण्याच्या उद्देशानं ‘आरकेजुमळेच्याकथा’ हा निराळा तिसरा ब्लॉग गेल्या डिसेंबरात सुरू केला. ‘स्वत:च्या जीवनातील काही कथा’ असं या ब्लॉगचं स्वरूप असणार होतं. मात्र आपण जिथे घडलो तो परिसर, ती माणसं आणि तो काळ यांबद्दल प्रांजळपणे बोलण्याचा मनोदय त्यांनी प्रास्ताविकातच व्यक्त केला आणि वेल्हाळपणे लिहिताना, फार तर कथेच्या सुरुवातीचा आणि शेवटचा काही भागच स्वत:बद्दलचा ठेवून, बाकीचेही भरपूर काही सांगत राहिले.

 
वाचावे नेट-के : गाजणं, फसणं, लायकी नसणं.. Print E-mail

 

सोमवार, ३० जुलै २०१२
‘एखाद्या लेखकाला अशा प्रकारे लक्ष्य करणं सोपं आहे. एका बाजूला ग्रेस, जी.ए. वा तेंडुलकर. एका बाजूला व.पु., संदीप खरे, मीना प्रभू, प्रवीण दवणे, हल्ली अनिल अवचट आणि चक्क पु.ल.सुद्धा. या लेखकांची वेगवेगळय़ा कारणांनी वारंवार रेवडी उडवली जाते.. पण या सगळ्या लेखकांनी कधी तरी गाजण्याइतकं चांगलं, दखल घेण्याजोगं लिहिलं आहे.

 
वाचावे नेट-के : शब्द थकतातसुद्धा.. Print E-mail

 

सोमवार, २३ जुलै २०१२

अनिता पाटील यांच्या बऱ्याच ब्लॉगनोंदींना ज्या प्रतिक्रिया येतात त्यात अनेकदा तिरस्कार भरलेला असतो, असा उल्लेख गेल्या आठवडय़ातल्या ‘वाचावे नेटके’मध्ये केला होता. त्याची पुन्हा आठवण देण्याचं कारण असं की, सध्या ‘लोकसत्ता’च्या वेबसाइटवर वाचावे नेटके या सदराखाली, ‘या ब्लॉगचा उल्लेख तुम्ही केलात तो टीआरपीसाठीच’ इथपासून ते महाराष्ट्रात सध्या पेटवल्या जाणाऱ्या जाती-द्वेषाला खतपाणी घालण्यासाठी ‘लोकसत्ता’ आणि ‘लोकप्रभा’वर गैरसमज बाळगून मग तो पसरवणाऱ्या प्रतिक्रियांपर्यंत काहीही प्रतिक्रिया आल्या आहेत.

 
<< Start < Prev 1 2 3 4 5 Next > End >>

Page 3 of 5