अभय टिळक - शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्यासाठी आपण आपल्या ठायी विद्यार्थिवृत्ती सतत जागती ठेवली पाहिजे हेच दत्तात्रेयांच्या २४ गुरूंच्या कथेमधील सार. आपण केवळ कथा कवटाळून बसलो. अभ्यासूवृत्तीसाठी तरलता, निरीक्षणशक्ती यांचा संस्कार घेतला नाही.. सिद्धान्त मनावर ठसावा यासाठीच कथाकीर्तनामधून दृष्टान्तांची पेरणी केली जाते. परंतु, आपण सगळेच कमालीचे कथाप्रिय असल्यामुळे दृष्टान्त तेवढा मनावर बिंबतो आणि सिद्धान्ताचे (बहुतेकदा सोयीस्कर!) विस्मरणच होते. दत्तात्रेयांनी २४ गुरू केले, या कथाभागाचे उदाहरण या संदर्भात प्रकर्षांने आठवते.
|
अभय टिळक - शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
रात्रंदिन युद्धाचा प्रसंग झेलून विवेक शाबूत ठेवणाऱ्या तुकोबारायांनी दाखवलेला कठोर आत्मपरीक्षणाचा मार्ग आपल्याला आठवत कसा नाही? भक्तीचा अतिकठीण मार्ग विवेकाच्या प्रकाशात प्रकाशाने उजळावा, हा संतांचा सल्ला आपण कसा काय विसरलो? संतांच्या विचारधनाचा वारसा सांगणे आणि तोच संतबोध आचरणात आणणे, या दोन अत्यंत वेगळय़ा बाबी आहेत. संतपरंपरेचा गुणगौरव आपण सततच करत असतो. परंतु, त्याच संतांचे जे विचारधन आहे त्याचे उपयोजन आपल्या रोजच्या जीवनात अभावानेच घडते. या विरोधाभासामागील कारणही सोपे आहे.
|
अभय टिळक - शुक्रवार, १४ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
विचार, सारासार विचार करण्याची संस्कृती समाजात रुजावी याचसाठी संतांचा खटाटोप आहे.. पण विवेकाचा दीप प्रकाशमान होऊन सतेज तेवत राहावा यासाठी आपण आपापल्या जागी डोळसपणे प्रयत्नशील असतो का? काही काही विपरीत समजुती आपला पिच्छा पिढय़ान्पिढय़ा पुरवत असतात. भक्ती म्हणा वा अध्यात्म म्हणा वा परमार्थ हा केवळ मनाचा अथवा श्रद्धेचा प्रांत आहे, ही अशीच एक (गैर)समजूत. परमार्थात बुद्धीचे कामच नाही, हा या समजुतीचा इत्यर्थ.
|
अभय टिळक, शुक्रवार, ३१ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
चित्तशुद्धी रोजच्या कामांमधूनच साधायची, तर जे काम आपण करतो आहोत, ते सरळपणे करावे लागेल.. व्यापाऱ्याने तराजू नेहमी सरळच धरावा लागेल.. शरीराच्या पातळीवर घडणाऱ्या कर्माचा मनावर, चित्तावर परिणाम घडला, तर त्याद्वारे मन वा चित्त परमेश्वराच्या वस्तीसाठी शुद्ध होईल.. ‘‘कुरुक्षेत्रावर भगवान कृष्णांनी पेरलेल्या गीतेच्या बीजांना महाराष्ट्राच्या खडकाळ पठारावर अमाप पीक आले. महाराष्ट्रात दुसरे काही पिकत नाही.
|
अभय टिळक, शुक्रवार, १७ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
हाताने काम करत असताना मुखाने नाम जपण्याने लौकिक प्रपंचाचे संवर्धन घडते आणि त्याच वेळी नामाच्या प्रभावाने कर्तेपणाची भावना लोप पावून साध्या कर्माचे रूपांतर कर्मयोगात घडून येते..
|
अभिजित घोरपडे, शुक्रवार ३ ऑगस्ट २०१२ address@epressindiacom उच्चारायला अजिबात अवघड नसणारा ‘विठ्ठल’ हा तीनअक्षरी मंत्र संतांनी दिला आणि नामस्मरण-भक्तीची वाट सर्वच समाजघटकांना खुली करून दिली. ही भक्ती खर्चिक नव्हती की उच्चनीच भेद करणारीही नव्हती..
|
अभय टिळक ,शुक्रवार, २० जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सर्वसमावेशकता आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नयनाची तळमळ हा संतविचार आणि संतआचार यांचा गाभा. सर्व समाजाच्या आध्यात्मिक-सांस्कृतिक उन्नयनासाठी संतांनी भक्तितत्त्वाचा डांगोरा पिटला. सर्वसमावेशकता या संतविचाराच्या गाभामूल्याशी भक्तीचे असलेले नाते असे स्वाभाविक आणि जैविक आहे..
|
अभय टिळक, शुक्रवार, ६ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
काही वेळा असे घडते, की एखाद्या नामवंताच्या पुस्तकाला दुसऱ्या एखाद्या तशाच भारदस्त व्यक्तिमत्त्वाने लिहिलेली प्रस्तावना मूळ ग्रंथापेक्षा कितीतरी पटींनी अधिक सरस उतरते. साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण उपाख्य तात्यासाहेब केळकर यांचा ‘मराठे आणि इंग्रज’ हा ग्रंथ या संदर्भात आठवतो. तात्यासाहेबांच्या त्या ग्रंथाला ज्येष्ठ इतिहाससंशोधक वासुदेवशास्त्री खरे यांनी लिहिलेली प्रस्तावना सततच गाजत आलेली आहे.
|
अभय टिळक ,शुक्रवार, २२ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
सत्विचार रुजवू पाहणारे मुळातील अल्पसंख्य विखुरलेले असतील तर त्यांचा आवाज दडपून टाकणे आसुरी प्रवृत्तींना सहजशक्य बनते.. अशा वेळी सत्विचारांचे आणि प्रवृत्तींचे रोपण-संगोपन समाजात घडावे यासाठी समूहरूपाने कार्यरत असणाऱ्या वैष्णववीरांचा चालता फिरता मेळा म्हणजे आषाढीची पायवारी
|
अभय टिळक, शुक्रवार, ८ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
स्वतचे पापक्षालन, स्वतसाठी मोक्षमुक्ती, स्वर्गप्राप्ती यांची मातबरी तीर्थयात्रेप्रमाणे वारीत नाही; याची कारणे संतविचारातच सापडतात.. ज्येष्ठातील पौर्णिमा सरली की उभ्या मराठी मनाला वेध लागतात ते पंढरीच्या पायवारीचे. पंढरीची वारी म्हणजे मराठी संस्कृतीची आत्मखूणच जणू! आषाढीच्या या पायवारीला ज्ञानदेवांनी मोठे गोड आणि तितकेच अन्वर्थक नाव दिलेले आहे - विठ्ठलयात्रा. वरकड तीर्थयात्रा आणि ही विठ्ठलयात्रा यात मूलभूत असा गुणात्मक फरक आहे. संतविचारातील गाभामूल्यांचे जिवंत दर्शन घडते वारीत. ‘तीर्थयात्रा’ आणि ‘पंढरीची पायवारी’ यांच्या हेतूमध्येच महद्ंतर आहे.
|
अभय टिळक, शुक्रवार, २५ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
‘विकास अधिक होणे आणि क्षमता अधिक येणे’, हाच भागवत धर्माचा हेतू होय’ असे स्पष्ट करणारे न्या. रानडे यांनी संतप्रवृत्तीची सांगड नीतीशी आहे, हे ओळखले होते.. भक्तीऐवजी संतांचा नीतीवर भर का, याचे उत्तर भागवतधर्माच्या गाभ्यातच आहे.. संतविचार आपल्याला शिकवण देतो ती भक्तीची की नीतीची? सर्वसामान्यपणे या प्रश्नाचे उत्तर, ‘संतांनी आम्हाला भक्ती शिकविली’, असेच येईल. |
अभय टिळक, शुक्रवार, ११ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
नीतिमय आणि लोकहिताचा विचार केंद्रस्थानी ठेवून केलेला प्रपंच हाच परमार्थ, अशी संतांची धारणा आहे. टिळकांचे ‘गीतारहस्य’, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ‘ग्रामगीता’ आणि सेनापती बापटांची ‘गांवगीता’ म्हणजे याच सगळ्या प्रयत्नवादाचे पुढील पर्व. संतांच्या कार्याचे हे मर्म लोकमान्यांना अचूक उमजले परंतु इतिहासाचार्य राजवाडय़ांना मात्र ते उमगले नाही.. |
|
|
<< Start < Prev 1 2 Next > End >>
|
Page 1 of 2 |