आई - बाबा तुमच्यासाठी नीलिमा किराणे ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
दया आणि सहसंवेदना (सिंपथी आणि एंपथी) यामधील फरक आईबाबांनी लक्षात घ्यायला हवा. मुलांपर्यंत काय पोहोचवायचंय आणि संवादातून काय पोहोचतंय हे स्पष्ट व्हायला हवं. पालकांनी मुलांना संवादातून नेमक्या भावनांपर्यंत पोहोचवलं तरच सहसंवेदना जागी होऊ शकते. त्यांना दोष देऊन परिणाम मिळणार नाही. |
आई - बाबा तुमच्यासाठी नीलिमा किराणे ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एखाद्या विषयावर घरात आपापली मतं मांडून चर्चा झाल्यावर सर्वानुमते योग्य निर्णय घेतला तर मग मुलांनी हट्ट करण्याचा प्रश्न येणार नाही, आजोबांनाही उधळपट्टी वाटणार नाही आणि आईबाबांकडूनही अपराधीभावातून वस्तू आणली जाणार नाही. शिवाय मनमानी करायची नसते हा संस्कार मुलांवर होऊ शकेल. सर्वाच्या सहभागानं, लोकशाही पद्धतीनं निर्णय घेण्याचा नवा संस्कार रुजेल. |
आई - बाबा तुमच्यासाठी नीलिमा किराणे ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आपली मुलगी न्यूनगंडाची कायमची शिकार होऊ शकते. ते टाळण्यासाठी तिच्या आई-बाबांचं प्रेम तिला स्पष्ट दिसायला हवं.तिच्या गतीनं वाढण्यासाठीचा अवकाश तिला मिळायला हवा.. चौथीतली ऋता आईसोबत पाढे पाठ करीत होती. पंधरापर्यंतचे पाढे बरोबर आल्यामुळे सारं मजेत सुरू होतं. पाढा चुकला की आई तिला हळूच एक टप्पल द्यायची. |
आई - बाबा तुमच्यासाठी नीलिमा किराणे , शनिवार , २१ जुलै २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
कुटुंबात मोठय़ांच्या मनातच श्रेष्ठत्वाची संकल्पना रूढ झाली आणि त्यातून बाहेर येणं शक्य न होता उलट स्वत:चा आत्मसन्मान जपण्यासाठी जर त्याचा ढालीसारखा उपयोग होणार असेल तर घरातल्या छोटय़ावर त्याचा परिणाम होणारच. त्याची कुटुंबाशी असलेली जवळीक अलिप्ततेत बदलू नये म्हणून मोठय़ांनी वेळीच सावध असायला हवं.. विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही. वेताळाला खांद्यावर घेऊन तो पुन्हा चालू लागला. वेताळ हसत म्हणाला, ‘राजा, तुलाही माझ्या गोष्टींचा मोह सुटत नाही तर. ठीक आहे. बघ.’
|
नीलिमा किराणे ,शनिवार, २३ जून २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
पालक आणि मुलांमध्ये ‘मीच वरचढ’ ही खुन्नस एकदा सुरू झाली की पुढच्या वेळेस दोघंही जास्त शक्ती लावणार. त्यामुळे दरवेळी वाढती खुन्नस आणि जुन्या त्रासात भर असा तो डोंगर वाढतच जातो. कुणाच्या तरी एकाच्या हरण्यातून आलेली शांतता तात्पुरती असते. पुरेशी शक्ती जमली की खुन्नस पुढे चालू. शांतता हवी असेल तर कुणीतरी ते समजून पहिल्यांदा तलवार म्यान करावी लागते. |
आई - बाबा तुमच्यासाठी नीलिमा किराणे , शनिवार, २६ मे २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
बाबांच्या संतापाचा उद्रेक अनेकांसमोर झाल्यामुळे छोटय़ा सोनाला स्वत:ची लाज वाटते. हळूहळू कोणात मिसळता येईनासं होतं, ती कोषात जाते. हे असंच चालू राहिलं तर लवकरच एक अत्यंत भित्री, निर्णयक्षमता नसणारी, कुणाचंही ऐकून घेणारी अशी सोना तयार होईल. म्हणजे ती शिस्तशीर, हुशार व्हावी अशा उद्देशानं बाबा संतापत असले, तरी प्रत्यक्षात त्या संतापामुळेच ती बावळट आणि आत्मविश्वास हरवलेली होते आहे. |
आई - बाबा तुमच्यासाठी नीलिमा किराणे , शनिवार , २८ एप्रिल २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
हल्ली बरीच मुलं एकुलती एक असतात अशावेळी मला कुणी समजून घेऊ शकत नाही, ही भावना घर करू शकते आणि काही वेळा ती भावना प्रबळ होऊन मुलं एकाकी होऊ शकतात. अशावेळी गरज असते ती त्याच्या मनात डोकवण्याची. ती आई-बाबांचीच जबाबदारी आहे. वि क्रमादित्याने हट्ट सोडला नाही. वेताळाला पुन्हा खांद्यावर घेऊन तो चालू लागला. वेताळ म्हणाला, राजा, तुझ्या जिद्दीचं आणि संतुलित विचार करण्याच्या क्षमतेचं कौतुक वाटतं. |
आई - बाबा तुमच्यासाठी नीलिमा किराणे - शनिवार, १० मार्च २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
एखाद्या स्पर्धेत हरलो तर आपला खेळ कमी झाला हे स्वीकारणं, हा बदलण्याचा पहिला टप्पा आहे. पुढचा टप्पा आत्मविश्वासाचा. कधीतरी कमी पडणं म्हणजे कायमचं संपणं नव्हे. ती एक फेजही असू शकते. हा विश्वास आईबाबांच्या आपलेपणातून मिळू शकतो. जिंकलेलं मूल सर्वाचं असतं, पण हरलेलं नेहमी एकटंच असतं. खरा मुद्दा असतो तो वस्तुस्थिती स्वीकारण्याचा आणि दृष्टिकोन बदलण्याचा.. विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही. तो पुन्हा झाडापाशी गेला. वेताळाला खांद्यावर घेऊन चालू लागला. वेताळ म्हणाला, ‘‘राजा, तू अजूनही हट्ट सोडणारच नसशील तर मी तुला आणखी एका घरातली गोष्ट सांगतो. बघ.’’ |
आई - बाबा तुमच्यासाठी नीलिमा किराणे - शनिवार, ११ फेब्रुवारी २०१२
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
घरातल्या मोठय़ा माणसांनी आपण ‘तुलनेचे’ बळी आहोत हे लक्षात घेतलं तर अनेक घरांतली परिस्थिती हळूहळू बदलू शक ते. समोरच्याला छोटं करून आपण मोठे होत नाही हे समजून घ्यायला पाहिजे. त्याबाबत मुलांशी, परस्परांशी बोललं पाहिजे. एकमेकांना मदत करून या सवयीतून बाहेर यायला पाहिजे. मुलांच्या चांगल्या गोष्टींचं मोकळेपणानं स्वच्छ कौतुक उपयोगी पडू शक तं. थेट सांगायचं तर ‘पेक्षा कमी, पेक्षा जास्त’ हे शब्द पूर्ण बंद केले पाहिजेत. विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा झाडापाशी गेला. वेताळाला खांद्यावर घेऊन नेहमीप्रमाणे चालू लागला. |
|
|
|
|