प्रतिनिधी दुकानाच्या क र्मचाऱ्याच्या डोळय़ांत मिरची पूड टाकून १० लाख रुपये लांबवणारे तिघे लोकांच्या व पोलिसांच्या सतर्कतेमुळे जेरबंद झाले. पैसे पळणाऱ्या एकास लोकांनी पाठलाग करून पकडले तर व्ही पी रोड पोलिसांनी उर्वरित दोघांना राजस्थानला पळून जाण्याच्या तयारीत असतांना नागपाडा येथून अटक केली. |
प्रतिनिधी स्टुडंट्स लिटररीअॅण्ड सायंटिफिक सोसायटीच्या माध्यमिक मुलींच्या (कमळाबाई) शाळेतून १९७३ ते १९७५ मध्ये इयत्ता १० वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा ठाकूरद्वार येथील शाळेच्या वास्तूत १० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता आयोजिला आहे. |
विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धा तरुणांमध्ये संशोधनाची आवड वाढीस लागण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेतर्फे दरवर्षी ‘विज्ञान संशोधन पुरस्कार स्पर्धे’चे आयोजन केले जाते. ही स्पर्धा शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पण पदवीधर नसलेल्या तरुणांसाठी खुली आहे. मात्र या स्पर्धेसाठी वयोमर्यादा २५ वर्षांची आहे. |
आधीच बंदोबस्ताचा भार, त्यात उपक्रमाचा अधिभार सुहास बिऱ्हाडे, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२
गणेशोत्सव आणि त्यापाठोपाठ आलेल्या नवरात्रौत्सवाच्या बंदोबस्ताने पोलिसांचा घाम काढला आहे. सततचा बंदोबस्त आणि विविध उपक्रमासाठी होणारा पोलिसांचा वापर यामुळे मुंबईचे पोलीस पुरते दमून गेले आहेत. पोलिसांवरच्या कामाचा ताण शिपायापासून वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत साऱ्यांनाच जाणवत आहे. |
प्रतिनिधी
मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सुरक्षा यंत्रणांनी तातडीने काहीतरी करायचे म्हणून सीएसटी आणि चर्चगेट स्थानकांवर ‘मेटल डिटेक्टर’ बसवून टाकले. बरोबर शस्त्रास्त्रे घेऊन येणाऱ्या अतिरेक्यांनी या मेटल डिटेक्टरमधून यावे, असे जणू फर्मानच या सुरक्षा यंत्रणांनी काढले असावे. त्यामुळे दोन मेटल डिटेक्टरमध्ये दोन माणसे जाऊ शकतील, एवढे अंतर ठेवून ज्यांना मेटल डिटेक्टरमधून जायचे त्यांनी त्यातून जावे अन्यथा दोन मेटल डिटेक्टरमधून जावे, असा हा खुला मामला होता. |
सत्ताधाऱ्यांमध्ये पिकली खसखस प्रतिनिधी बुजुर्ग निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्याच्या पाश्र्वभूमीवर महापालिका सभागृहात गुरुवारी डेंग्यूच्या डासांवर झालेल्या चर्चेची गाडी घसरून ‘अधिक धोकादायक कोण, डेंग्यू की काँग्रेस?’ या प्रश्नावर आदळल्याने सभागहाचे वातावरण एकदम तप्त झाले. पण त्याचवेळी काही सदस्यांना हास्याच्या उकळ्या फुटल्याने ते वातावरण लवकरच निवळलेही. |
प्रतिनिधी २०११-१२ या शैक्षणिक वर्षांत झालेल्या ‘टीवायबीकॉम’च्या परीक्षेत अंतर्गत मूल्यांकनाच्या नावाखाली गुणांची उधळण करणाऱ्या महाविद्यालयांचा छडा लावण्यासाठी आणखी काही महाविद्यालयांची तपासणी करण्यात येणार आहे. |
पालिका आयुक्तांनी दिली ‘क्लीनचीट’ प्रतिनिधी नगरसेवकांच्या टीकेचे लक्ष्य बनलेले प्रमुख्य लेखापाल राम धस यांना पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी गुरुवारी पालिका सभागृहात ‘क्लीनचीट’ दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी सदस्यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. |
प्रतिनिधी छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस, चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरासह मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील काही महत्वाच्या रेल्वे स्थानक परिसरात व्यवसाय करणाऱ्या बोगस मेमरी कार्ड विक्रेत्यांच्या विरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बुलंद छावा मराठा युवा परिषदेने केली आहे. परिषदेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संदीप पटाडे यांनी ही मागणी केली आहे. |
आधीच उल्हास, त्यात गुंतवणुकीचा फास..! प्रशांत मोरे कनिष्ठ वेतनश्रेणीमुळे आधीच वेठबिगारासमान अवस्था असलेले एस.टी.तील कर्मचारी आता सक्तीच्या गुंतवणूक फासात अडकले आहेत. ठाणे विभागातील काही अधिकारीच नातेवाईकांच्या नावाने विविध गुंतवणूक योजनांचे एजंट म्हणून कार्यरत असून हाताखालच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सक्तीने गिऱ्हाईक बनविले आहे. |
प्रतिनिधी वेंगुर्ले येथील श्रीकेपादेवी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. जीर्णोद्धाराच्या निधी संकलनासाठी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या विठाबाई नारायण गांवकर यांच्या जीवनावर आधारित आणि पंचमी निर्मित ‘विठा’ या नृत्यनाटय़प्रयोगाचे आयोजन माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिरात सकाळी ९.३० वाजता करण्यात आले आहे. |
प्रतिनिधी महाड तालुक्यातील वरंडोल येथील सोमजाई मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. हे काम लवकरच सुरू होणार आहे. |
संपर्क सूचीसाठी आवाहन वीरशैव माहेश्वर जंगम समाजाच्या वतीने माहेश्वर जंगम समाजाची संपर्क सूची पुन:प्रकाशित करण्याचे काम सुरू झाले आहे. |
गिरणी कामगार बेपत्ता! प्रतिनिधी, शुक्रवार, २६ ऑक्टोबर २०१२
गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी ‘म्हाडा’ने काढलेल्या ६९२५ घरांच्या सोडतीमधील विजेत्यांकडून कागदपत्रे गोळा करण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच सुमारे ६०० सूचनापत्रे परत आल्याने नवीन घोळ सुरू झाला आहे. यापैकी सुमारे दीडशे अर्जदारांनी मुंबै बँकेतून नंतर सूचनापत्र नेले असले तरी उरलेल्या सुमारे ४५० अर्जदारांचे काय करायचे व हा प्रश्न कसा मार्गी लावायचा ही नवीन डोकेदुखी ‘म्हाडा’ प्रशासनासमोर उभी ठाकली आहे. |
प्रतिनिधी
बोरिवलीचे भगवती, जेजे, घाटकोपरचे राजावाडी आणि पाल्र्याचे कूपर या सार्वजनिक रुग्णालयांच्या शवविच्छेदन केंद्रांतील डॉक्टरांच्या कमतरेतमुळे सामान्यांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागते आहे. या चार रुग्णालयांतील शवविच्छेदन केंद्रांत मिळून डॉक्टरांची १६ पदे आहेत. पैकी सहा पदे रिक्त आहेत. |
अमिताभ बच्चन यांनी जागविल्या यश चोप्रा यांच्या आठवणी प्रतिनिधी
अलीकडेच, आपल्या ७० व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आजारी असूनही यश चोप्रा आवर्जून उपस्थित राहिले होते. त्यांचा तब्बल ४४ वर्षांचा सहवास मला लाभला. काही दिवसांपूर्वीच ‘व्यायामशाळेतून घरी जाताना सकाळी गप्पा मारायला ये’, असे ते म्हणाले होते. ‘मी नक्की येतो’ असे त्यांना सांगितले होते. पण काही कारणाने जाणे जमले नाही. |
तयार पदार्थ किमान २५ टक्क्यांनी महागणार प्रतिनिधी
स्वयंपाकासाठी लागणारा गॅस, खाद्यवस्तू, पेट्रोल-डिझेल आदींच्या किंमतीमध्ये झालेल्या दरवाढीचा फटका यंदाच्या वर्षी दिवाळीच्या फराळालाही बसणार आहे. त्यामुळे दिवाळीचा फराळ तयार करून तो विकणारे व्यावसायिक आणि घरासाठी फराळ तयार करणाऱ्या गृहिणींना या महागाईमुळे फराळासाठी आपला हात आखडता घ्यावा लागणार आहे. |
सायकल प्रसाराचा वसा.. सुहास बिऱ्हाडे
आरोग्य जपण्यासाठी सायकल चालवा, असा सल्ला डॉक्टर सर्वानाच देत असतात. परंतु विरारच्या नितीन थोरवे या अवलिया डॉक्टरने सायकलींचा छंद लोकांमध्ये रुजविण्यासाठी केवळ सल्ले न देता स्वत: सायकल प्रसाराची मोहीम उघडली आहे. ती आता केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नसून सातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे. |
* फाईली लवकरच ऑनलाईन * रोबोटिक यंत्रणेमुळे फाईल शोधणे सोपे प्रतिनिधी मंत्रालयातील आगीनंतर सरकारी कार्यालयांमधील कागदपत्रांच्या सुरक्षित साठवणुकीचा मुद्दा पुढे आल्यानंतर ‘म्हाडा’ने आपल्या गोदामांमधील तब्बल दीड लाख जुन्या फायली सुरक्षित ठेवण्यासाठी महापे येथे हलवल्या आहेत. |
प्रतिनिधी ‘अन्य प्रवाशांना त्रास होईल अशा पद्धतीने भ्रमणध्वनीवर बोलू नका किंवा गाणी लावू नका,’ अशा घोषणा सध्या पश्चिम रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांमधून करण्यात येत आहेत. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 6 of 14 |