प्रतिनिधी मूळ भाडेपत्रिका जवळ न बाळगणाऱ्या आणि भाडे नाकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सींवरची परिवहन विभागाची कारवाई सोमवारीही सुरू होती. या कारवाईमध्ये सुमारे ११९ रिक्षा-टॅक्सींवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. |
रेश्मा राईकवार दूर कुठेतरी अयोध्येत बाबरी मशीद पाडली आणि त्याच्यामुळे दंगल सुरू झाली आहे, असे त्यांनी ऐकले होते. पण, अयोध्या कुठे आहे, कुठे होती बाबरी मशीद, कोणी पाडली मशीद असे विचारही मनात आणायची उसंत त्यांना नेहमीच्या रोजीरोटीच्या कामामुळे मिळत नव्हती. |
प्रतिनिधी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना डावलून मनमानीपणे प्रवेश करणाऱ्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या विरोधात वेळोवेळी तक्रारी करूनही त्याची योग्य ती दखल घेण्यात आलेली नाही. |
नाटय़ प्रतिनिधी कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे यावर्षी २७ ते ३० डिसेंबरदरम्यान नाटककार संजय पवार यांच्या एकांकिकांचा महोत्सव भरविण्यात येणार आहे. |
प्रतिनिधी स्त्रियांवर ‘पपुजाधव’म्हणजेच परंपरा, पुरुष, जात, धर्म आणि वर्ग यांचे वर्चस्व असल्याचे प्रतिपादन महिला राजसत्ता आंदोलनाच्या राज्य समितीचे सदस्य भीम रासकर यांनी नुकतेच प्रभादेवी येथे बोलताना केले. |
सिमरोझा कलादालनाची ४० वर्षे भुलाभाई देसाई रोड येथी सिमरोझा कलादालनाच्या स्थापनेला ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त २९ ऑक्टोबरपासून एका विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. |
नाटय़ प्रतिनिधी नाटय़-चित्रपट अभिनेते अविनाश नारकर आता रंगभूमीवर दिग्दर्शकाच्या भूमिकेत अवतरणार आहेत. त्यांच्या पत्नी ऐश्वर्या नारकर यांच्या ‘ऐश्वर्या आर्ट्स अॅण्ड थिएटर’ आणि संजय पोतनीस यांच्या ‘यश क्रिएशन्स’ या संस्थांची सहनिर्मिती असलेल्या ‘तक्षकयाग’ नाटकाचे दिग्दर्शन ते करणार आहेत. |
प्रतिनिधी कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजिण्यात येणारी वामनदाजी शास्त्रीय संगीत स्पर्धा २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. |
‘लोलक विज्ञाना’वर कार्यशाळा ‘दि इंडियन डाऊझर सोसायटी’तर्फे प्रबोधानाच्या उद्देशाने २७ ऑक्टोबरला विनामूल्य व्यावसायाभिमुख लोलक विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. |
गोविंद तुपे ,गुरुवार, २५ ऑक्टोबर २०१२
संपूर्ण राज्यातील आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वडाळ्यातील सिद्धार्थ विहार सत्तालोलूप नेते मंडळींमुळे अडगळीत पडले आहे. शिक्षणाशी सुतरामही संबंध नसलेल्या अनेक मंडळींनी या वसतिगृहात घुसखोरी केली असून त्यावर कुणाचेच नियंत्रण राहिलले नाही. अनेक बडय़ा नेत्यांसह बरेच वरिष्ठ अधिकारी याच केंद्राच्या तालमीतून तयार झाले आहेत. पण सत्तेच्या चाव्या आपल्याजवळ ठेवण्याच्या नेत्यांच्या राजकारणात हे केंद्र मात्र अडगळीत पडले आहे. |
हायकोर्टाचा आदेश विशेष प्रतिनिधी
बोरिवलीसह पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडीबाबत अनेक तक्रारी असून लोकांच्या तक्रारींचे निवेदन उच्चाधिकार समितीपुढे मांडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. अॅड्. रचना चव्हाण यांनी केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळेस मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. मुंबईतील वाहतूक समस्येबाबत यापूर्वीच दाखल जनहित याचिकेप्रकरणी न्यायालयाने राज्य सरकारला उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. |
विशेष प्रतिनिधी मंदी, आर्थिक तंगी आणि महागाईच्या सावटातही विजयादशमीचा मुहूर्त साधून आज मुंबईच्या कानाकोपऱ्यात उत्साह ओसंडत राहिला आणि सणाच्या आनंदावर या सावटाचे विरजण पडू नये याची काळजी घेत मुंबईकरांनी खरेदीसाठी तोबा गर्दी केल्याने बाजारपेठाही फुलून गेल्या. |
प्रसाद मोकाशी अनाथ मुलींना मायेची सावली द्या.. त्यांचे भवितव्य घडवा.. तुम्हाला समाजऋण फेडण्याची संधी उपलब्ध आहे.. तुमचा सहकार्याचा हात पुढे करा.. असे आवाहन पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांच्या ‘स्टाफ बेनिफिट फंड’ने ही अनोखी योजना तयार केली असून अनाथ मुलगी दत्तक घेणाऱ्या कर्मचाऱ्यास ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. |
प्रतिनिधी खरेदी सूचनेच्या माध्यमातून संपादित करण्यात आलेल्या आरक्षित भूखंडावर सहा वर्षे लोटल्यानंतरही मंडई उभारण्यास पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. तर विकासकाने बांधून दिलेली मंडईही ओस पडली असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी सुधार समितीचे कामकाज मंगळवारी तहकूब केले. |
प्रतिनिधी
‘लोकसत्ता ९९९ नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ उपक्रमात नवरात्राच्या अखेरच्या दिवशी दादर पश्चिम येथील अशोकवाडी बालमित्र सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि परिसरातील रहिवाशांनी उत्स्फूर्तपणे विविध स्पर्धामध्ये सहभाग घेऊन नवरात्रोत्सव दणक्यात साजरा केला. श्रावणात महिला पारंपरिक मंगळागौरीचे पूजन करून जागर करतात. |
मार्गदर्शन शिबीर भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये ‘सल्लागार’ पदासाठी होणाऱ्या भरतीबाबत दादर येथे मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संपर्क ९८३३७२३६५० |
खरेदीवर सवलतींचा वर्षांव व्यापार प्रतिनिधी ,बुधवार, २४ ऑक्टोबर २०१२
सोने गेल्या अनेक दिवसांपासून ३१ हजारांच्या घरात विसावले असले तरी मागणी मात्र दिवसेंदिवस अधिक चकाकत आहे. परिणामी दसऱ्याच्या शुभमुहूर्तासाठीही या मौल्यवान गुंतवणूक पर्यायासाठी निवड करण्याचे प्रमाणही वाढले आहे. ग्राहकांचा हा कल ओळखून सराफी पेढय़ांनी यंदाच्या सूट-सवलतींची मालिका थेट दिवाळीपर्यंत खेचली आहे.सोन्याने काही महिन्यांपूर्वीच ३५ हजार रुपयांच्या आसपासचा १० ग्रॅमसाठीचा सर्वोच्च भाव मिळविला होता. हा मौल्यवान धातू आजही ३१ हजार रुपयांच्या पुढेच आहे. |
प्रतिनिधी
पाऊस रुसल्यामुळे आणि शेतकऱ्यांनी स्थानिक बाजारांमध्ये फुलविक्रीला प्राधान्य दिल्याने यंदा दसऱ्यानिमित्त मुंबईतील बाजारांमध्ये फुलांची आवक घटली, पण मागणी वाढल्याने फुलांचे भाव चांगलेच कडाडले आहेत. वाढत्या महागाईच्या काळात फुलांच्या खरेदीसाठी ग्राहक बाजारात फिरकतील की नाही अशी शंकेची पाल व्यापाऱ्यांच्या मनात चुकचुकू लागली होती, पण संध्याकाळनंतर फुलबाजारात गर्दी सुरू झाली, आणि हा हा म्हणता, झेंडूच्या फलांचे ढीग रिते होऊ लागले..
|
सेवानिवृत्त पालिका कर्मचारी प्रतीक्षेलाही कंटाळले.. प्रसाद रावकर
सहाव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन निश्चितीचे काम रेंगाळल्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेले तब्बल २५० अधिकारी सुधारित निवृत्ती वेतन आणि त्याच्या थकबाकीपासून वंचित राहिले असून ही रक्कम मिळविण्यासाठी ते वारंवार पालिकेत खेटे घालत आहेत. मात्र जनगणना आणि निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी बाहेर गेल्याचे तेच तेच कारण ऐकून आता त्यांना नैराश्य येऊ लागले आहे. .सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेले कर्मचारी-अधिकाऱ्यांचे निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन आदींमध्ये सुधारणा करणे क्रमप्राप्त होते. मात्र कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे हे काम रखडले आहे. |
प्रतिनिधी
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यावरण रक्षणासाठी उद्यानात खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्याची तसेच पर्यटकांसाठी नव्या सोयी-सुविधा उभारण्याची योजना राज्य पर्यटन विकास महामंडळाने वन विभागाच्या सहकार्याने योजना तयार केली असून उद्यानाबाहेर वाहनतळ, लहानांचे आकर्षण असलेल्या छोटय़ा गाडीच्या मार्गातील स्थानकांचा विकास आदी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. या संपूर्ण योजनेचा प्रस्ताव या महिनाअखेरीस राज्य शासनास सादर करण्यात येणार आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 7 of 14 |