विशेष प्रतिनिधी वाढदिवसाच्याच दिवशी राजूला मोटरबाईकचा अपघात झाला. त्याला रुग्णालयात नेले मात्र त्याच्या मेंदुला जबर मार लागल्यामुळे तो ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.हातातोंडाशी आलेला मुलगा वाचत नाही, हे दु:ख पचवून राजूच्या आईवडिलांनी त्याच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय घेतला. |
प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाहतूक पोलिसांनी वाहनांच्या काळ्या काचा काढण्यासाठी (कांचांवरील काळी फिल्म काढण्यासाठी) जोरदार मोहीम सुरू केली आहे. मात्र मंत्र्यांच्या वाहनांच्या काळ्या काचांविरुद्ध कारवाई कशी करायची असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला असून यातून मार्ग काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी परिवहन सचिवांना पत्र पाठवले आहे. |
एक डासदेखील ‘संकट’ ठरू शकतो! प्रतिनिधी ,मंगळवार, २३ ऑक्टोबर २०१२
मलेरिया नियंत्रणाच्या एकतर्फी कार्यक्रमामुळे मुंबईतील डेंग्यूच्या फैलावाकडे पालिकेच्या आरोग्य खात्याचा कानाडोळा झाल्याने, डेंग्यूने विक्राळ रूप धारण केले आहे. दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्यावर डेंग्यूच्या आजारासाठी लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते, त्याच दिवशी पालिकेच्या आणि महानगरातील अनेक खाजगी रुग्णालयांतही डेंग्यूग्रस्तांची रीघ लागली होती. |
प्रतिनिधी
मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा-टॅक्सीच्या करण्यात आलेल्या भाडेवाढीनंतर मीटरमध्ये रीकॅलिब्रेशन करण्याबाबत कोणतीही सूचना अथवा माहिती चालकांना किंवा मालकांना देण्यात आली नसल्याचा आरोप मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी केला आहे. मात्र परिवहन विभागाने त्यांच्या विभागीय प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या आवारात ई-मीटर कॅलिब्रेशन करण्याचे काम सुरू केल्यास युनियन सहकार्य करेल अशीही भूमिका राव यांनी घेतली आहे. |
‘लोकसत्ता -९९९’ आणि जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांचा उपक्रम प्रतिनिधी
रंग, सण, दागिन्यांची ‘झटापटी’, गाणी, उखाणे, वेशभूषा स्पर्धा आदी रंगारंग कार्यक्रमाने वरळीच्या पोलीस कॅम्पमधील अष्टविनायक नवरात्रोत्सव मंडळात रविवारी सायंकाळ धमाल उडवून दिली. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९-नव शक्ती, नव रंग आणि नव रात्री’ या उपक्रमाच्या निमित्ताने हा कार्यक्रम येथे रंगला होता. |
विकास वंकिट यांची पत्नी किर्ती वंकिट यांना कर्करोग झाला असून तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. विकास वंकिट यांचे वार्षिक उत्पन्न अत्यल्प आहे. |
एस डी बर्मन श्रवणसत्र हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगातील आघाडीचे संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या स्मृतिदिन ३१ ऑक्टोबर रोजी आहे. त्यानिमित्त ‘सरगम’ संस्थेतर्फे ‘रागदारी आणि सचिन देव बर्मन’ या श्रवणसत्र विलेपार्ले पूर्व येथील महिला संघ सभागृह, परांजपे रस्ता, रविवार, २८ ऑक्टोबर संध्याकाळी ४.३० वाजता होणार आहे. |
प्रतिनिधी, शनिवार, २० ऑक्टोबर २०१२
जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत लोकसत्ता ९९९ या कार्यक्रमातील नवरात्रीची दुसरी माळ गुंफली गेली नायगाव येथे. मराठमोळय़ा अशा नायगाव परिसरामध्ये सकाळपासून या कार्यक्रमाची लगबग सुरू होती. नऊवारी साडी नेसून मंगळागौरीच्या तयारीसाठी इथल्या मंडळांतील भगिनी तयार होत्या. कार्यक्रमाची सुरुवात झाली ती रांगोळीच्या स्पर्धेने. संस्कार भारतीपासून ते ठिपक्यांच्या वापरापर्यंत प्रत्येक स्पर्धक रांगोळीमध्ये वेगळेपण सिद्ध करीत होता. सर्वात बेस्ट रांगोळी कुणाची याकरिता प्रत्येक स्पर्धकाचे प्रयत्न सुरू होते. |
प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातून उसंत मिळते न मिळते तोच पोलिसांवर आता नवरात्रौत्सवाच्या बंदोबस्ताची जबाबदारी आली आहे. नवरात्रौत्सवाचा बंदोबस्त नेहमीच्या इतर बंदोबस्तांपेक्षा वेगळा असतो. या काळात छेडछाड आणि प्रेमी युगुलांच्या ‘गुलाबी’ हालचालींना ऊत येतो. या प्रकारांना आळा घालण्यासाठी केवळ ‘पोलीसगिरी’ चालत नाही. |
भाडेवाढीची ओरड करणारे प्रवासी ‘ढिम्म’च!
प्रतिनिधी प्रसारमाध्यमे ही समाजाचा आरसा असल्याचे मानले जाते. समाजात जे काही घडते ते प्रसारमाध्यमांच्या मार्फतच आपल्याला मुख्यत्वे कळत असते. रिक्षा-टॅक्सींच्या अन्याय्य आणि असह्य भाडेवाडीने सर्वसामान्यांना आपल्या अगतिकतेची पुन्हा एकदा जाणीव झाली. ही अगतिकता आणि त्यातून येणारी (नुसतीच) चीड एकमेकांशी बोलताना सहज व्यक्त होते. |
प्रतिनिधी सभोवतालचे बदलते सामाजिक वास्तव एक कवी आणि संवेदनशील माणूस म्हणून मला अस्वस्थ करते. ‘कोमसाप’साहित्य संमेलनाच्या माझ्या अध्यक्षीय भाषणात कविता किंवा भाषणाच्या माध्यमातून त्याचा वेध घेण्याचा विचार असल्याचे ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. |
प्रतिनिधी तक्रार करायला पोलीस ठाण्यात जायचे नसले तरीही आता कुणीही बिनधास्त तक्रारी आणि सूचना करू शकतो. मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी आता जागोजागी तक्रार पेटय़ा उपलब्ध करून दिल्या आहेत. गृहमंत्री आर आर पाटील यांनी गुरुवारी या अनोख्या योजनेचा शुभारंभ केला. |
प्रतिनिधी चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचा समजला जाणारा १९ वा ‘कलर्स स्क्रीन वार्षिक पुरस्कार’ सोहळा जानेवारी २०१३ मध्ये होणार आहे. दरवर्षीप्रमाणे चित्रपटनिर्मितीच्या विविध विभागातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना स्क्रीन पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. |
प्रतिनिधी बांगलादेशातून भारतात मजुरीसाठी येणाऱ्या लोकांकडून बनावट नोटा वितरीत केल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युनिट १२ ने अटक केलेल्या बांग्लादेशी नागरिकांच्या तपासातून ही बाब उघड झाली आहे. याप्रकरणी युनिट १२ ने बंगळूरहून आणखी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून पावणेचार लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यत ८ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. |
प्रतिनिधी रेल्वे स्थानकांवर महिलांसाठी असणारी स्वच्छतालये नि:शुल्क करण्यात यावीत, ठाणे-वाशी मार्गावर दोन नवी स्थानके उभारावीत आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण दरम्यानच्या एलिव्हेटेड रेल्वेला प्राधान्यक्रम देण्यात यावा अशा मागण्या मुंबई-ठाण्याच्या विविध राजकीय पक्षांच्या खासदारांनी केल्या आहेत. कल्याणच्या पुढे मोठय़ा वेगात नगरविकास होत असून रेल्वेने तेथे प्रवासाचे विकास प्रकल्प राबवावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे. |
प्रतिनिधी गोडसे भटजी लिखित ‘माझा प्रवास’ हे पुस्तक इतिहासाचा प्रामाणिक आणि खात्रीलायक स्त्रोत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासकार आणि एशियाटिक सोसायटीचे विश्वस्त प्रा. जे. व्ही. नाईक यांनी मंगळवारी मुंबईत केले. |
अंमलबजावणीचा नुसताच धूर! प्रसाद रावकर, शुक्रवार, १९ ऑक्टोबर २०१२ सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास व सिगरेटची विक्री करण्यास केंद्र सरकारने बंदी घातली, पण मुंबईत मात्र सार्वजनिक ठिकाणांना सिगारेट-विडीच्या धुराची वेटोळी आणि तंबाखूजन्य पदार्थांचा विळखा पडलेलाच आहे. |
प्रतिनिधी साध्या प्रोग्रॅमरपासून सुरुवात करून अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेले संगणक तज्ज्ञ, अर्थशास्त्र, संगीत, साहित्य, जागतिक राजकारण, समाजशास्त्र अशा विविध विषयांचा अभ्यास असलेले ‘किमयागार’ डॉ. अच्युत गोडबोले यांचे ‘मुसाफि र’ हे आत्मचरित्र प्रकाशनाच्या वाटेवर आहे. |
प्रतिनिधी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या सभागृहात शुक्रवार, १९ ऑक्टोबर रोजी हिंदी काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या संमेलनात मल्लिका अमरशेख, चंद्रकांत पाटील, प्रफुल्ल शिलेदार, संवेदना, प्रेमरंजन अनिमेष आदी कवी सहभागी होणार आहेत. |
प्रतिनिधी आम्ही पारलेकर या वार्षिक विशेषांकाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही लघुकथा-काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 8 of 14 |