प्रतिनिधी मुंबई- विविध लेखकाच्या प्रवास वर्णनांनी मराठी साहित्य समृद्ध झाले आहे, असे प्रतिपादन समीक्षक प्रा. अनंत देशमुख यांनी अलीकडेच मुलुंड येथे केले. |
‘गझल उसने छेडी’ गझलसम्राज्ञी बेगम अख्तर यांच्या स्मृतीदिनानिमित्त शुक्रवार, १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता रवींद्र नाटय़ मंदिराच्या सभागृहात ‘गझल उसने छेडी’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले असून सुप्रसिद्ध गायिका डॉ. सोमा घोष यांचे गायन ऐकण्याची संधी शास्त्रीय संगीतप्रेमींना मिळणार आहे. |
बँक परीक्षा मार्गदर्शन येत्या डिसेंबरमध्ये वीस राष्ट्रीयकृत बँकांमाधील क्लेरिकल भरतीसाठी ‘आयबीपीएस’ द्वारे परीक्षा घेण्यात येणार आहे. यावर्षीपासून ही परीक्षा ऑनलाईन होणार असून अर्जही ऑनलाईन भरायचे आहेत. |
पालिकेच्या आरोग्य खात्याचा निर्धार.. संदीप आचार्य - गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२
महापालिकेच्या आरोग्य विभागाने नियोजनबद्ध उपाययोजना केल्यामुळे संपूर्ण मुंबईत मलेरियाग्रस्तांच्या तसेच मलेरियामुळे मरण पावणाऱ्यांच्या संख्येत गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत लक्षणीय घट दिसू लागली आहे. २०१० मध्ये मलेरियाने मुंबईत १२८ बळी घेतल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने मलेरियाविरुद्ध युद्ध पुकारले. तीन वर्षांच्या संघर्षांनंतर आता मलेरियाने माघार घेतल्याचे संकेत मिळू लागले आहेत.. |
खास प्रतिनिधी
क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा, टाळ्यांचा कडकडाट, हास्याचे फवारे, शब्दांची उधळण, महिलांचे लाजणे मुरडणे, पुरुषांची उडालेली भंबेरी, आयोजकांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि भक्तीमय वातावरणात मंगळवारी वाशी सेक्टर दहा येथील जनरल अरुणकुमार वैद्य मैदानात जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत लोकसत्ता ९९९ नवशक्ती, नवरंग, नवरात्री स्पर्धेला मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली.
|
प्रतिनिधी
‘पंचकोट ज्ञानकुंभ’ असे वर्णन करण्यात येणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर या आठवडय़ात ‘जय अंबे माँ’चा नाद घुमणार आहे. प्रत्येक सण उत्साहात साजऱ्या करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी आपल्या या शोमध्येही नवरात्रीचे रंग आणले असून हे रंग दांडियाची राणी या नावाने प्रसिद्ध असलेली गायिका फाल्गुनी पाठक उधळणार आहे.
|
प्रशांत मोरे साधारणपणे सहामही किंवा वार्षिक परीक्षा महिन्याभरावर आल्या की घरोघरी अखंड करमणूक आणि माहिती प्रसविणाऱ्या टी.व्ही.ला काही प्रमाणात का होईना लगाम घालण्याची भाषा सुरू होते. डॉक्टर आजारी माणसांना जसे काही पथ्ये सांगतात, तसे परीक्षा तोंडावर आलेल्या मुलांनी टी.व्ही. पाहू नये, त्याऐवजी तो वेळ त्यांनी अभ्यास करण्यात घालवावा, असे सल्ले वडिलधारी मंडळी देत असतात. |
प्रतिनिधी मूळचा आंब्याचा व्यापारी असल्याने माझ्या सभोवताली असणाऱ्या सर्वधर्मीय आणि सर्वप्रांतीय सहव्यावसायिकांमुळे मला राष्ट्रीय एकात्मतेचा आनंद अनुभवता आला. हा अनुभव मला माझ्या मराठी वाद्यवृंदासाठी वेगवेगळे विषय आणि व्यक्तिमत्वांची निवड करण्यास उपयुक्त ठरला, असे प्रतिपादन ‘चौरंग’संस्थेचे सर्वेसर्वा, गायक-निवेदक, निर्माता-दिग्दर्शक अशोक हांडे यांनी गुरुवारी दादर येथे केले. |
प्रतिनिधी महात्मा गांधी यांनी लिहिलेल्या आणि त्यांच्यावरील पुस्तकांना आजही मोठी मागणी आहे. मुंबई सवरेदय मंडळ आणि गांधी बुक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एका प्रदर्शनातून ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. |
प्रतिनिधी बदलत्या सामाजिक परिस्थितीत मराठी संस्कृतीमधील विविध सणांचे आता ‘इव्हेंट’ झाले आहेत. भोंडलाही त्याला अपवाद राहिलेला नाही. काही वर्षांपूर्वी घरगुती स्वरूपात असलेला भोंडला आता ‘महाभोंडला’ बनून त्याचा मोठा ‘इव्हेंट’ झाला आहे. |
प्रतिनिधी मुंबई खड्डय़ांत घालणारे दुय्यम अभियंते आणि बैठकीमध्ये बेशिस्त वर्तन करणारे कार्यकारी अभियंते यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. मात्र या अभियंत्यांनी खड्डे बुजविण्याच्या तंत्रज्ञानावर ठपका ठेवत या प्रकरणातून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. |
प्रतिनिधी जगातील प्रत्येकाला आनंद मिळावा यासाठी ‘जीवन विद्या मिशन’ने अंध विद्यार्थ्यांकरिता ‘दृष्टी ज्ञानाची’ हा उपक्रम हाती घेतला आहे. ‘विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे’ या पुस्तकाचे ब्रेल लिपीमध्ये रूपांतर करून जवळपास ३०० विद्यार्थी-विद्यार्थिनींना या पुस्तकाचे वाटप नुकतेच करण्यात आले. |
प्रतिनिधी कृष्णमूर्ती एज्युकेशन ट्रस्टतर्फे सुप्रसिद्ध दार्शनिक जे. कृष्णमूर्ती यांच्या शिकवणीवर आधारित एक कार्यशाळा भिलार, पांचगणी येथे २६ ते ३० ऑक्टोबर २०१२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. |
प्रतिनिधी - बुधवार, १७ ऑक्टोबर २०१२ गेली काही महिने मंदीने ग्रासलेली बाजारपेठ नवरात्रीच्या निमित्ताने पुन्हा एकदा उसळी मारण्याच्या तयारीत आहे. दुकाने मालाने भरली आहेत. ग्राहकही उत्साहाने दुकानांमध्ये येत आहेत. पण खिशातले पैसे आणि दुकानातील मालाच्या किंमती यांचे गणित काही जुळत नाही. आणि मग रिकाम्या पिशव्या घेऊनच ते माघारी फिरतात आणि दुकानदारांच्या चेहऱ्यावरील मंदीची काजळी अधिकच दाट होते. नवरात्रीच्या निमित्ताने मुंबईतल्या काही प्रमुख बाजारपेठांमध्ये फेरफटका मारल्यानंतर कमीअधिक फरकाने हे असेच दृश्य दिसते.
|
प्रतिनिधी प्रभुदेवाने सलमानला ‘वॉंटेड’ दिला आणि या चित्रपटाच्या यशाने सलमान ‘मोस्ट वॉंटेड’ बनला. सलमानच्या करियरचा आलेख गगनावेरी गेलेला पाहून अक्षय कुमारनेही प्रभुदेवाचा आधार घेतला. अक्षय कुमारसाठी प्रभुदेवाने ‘रावडी राठोड’ बनवला. याही चित्रपटाने तिकीटबारीवर शंभर कोटीचा आकडा पार केला आणि अक्षयच्या सगळ्या ‘चिंता.. ता. चिता चिता’ झाल्या. या दोन चित्रपटांनी प्रभुदेवालाही बॉलिवूडमध्ये वजनदार दिग्दर्शकांच्या पंक्तीत नेऊन ठेवले आहे.
|
प्रतिनिधी ‘तिच्या विजयासाठी’ या टॅगलाइनच्या माध्यमातून सादर होणारा लोकसत्ता व्हिवा लाऊंज हा कार्यक्रम खास करिअर करणाऱ्या महिलांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम ठरलेला आहे. आत्तापर्यंत व्हिवा लाऊंजच्या माध्यमातून अभिनेत्री सोनाली बेंद्रे, नेमबाज अंजली भागवत, खासदार सुप्रिया सुळे, ख्यातनाम गायिका बेला शेंडे, आरजे मलिष्का या सर्वाशी आपण मनमुराद संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांच्या करिअरचे टप्पे आणि त्या संदर्भातील अनेक टिप्स आपल्याला जाणून घेता आल्या.
|
प्रतिनिधी नवरात्रौत्सवातील ‘लोकसत्ता ९९९ - नवभक्ती, नवरंग, नवरात्री’ स्पर्धेला जोरदार सुरुवात झाल्यानंतर बुधवार, १७ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा ही स्पर्धा सेक्टर ९, वाशी येथील जय भवानी सार्वजनिक श्री नवरात्रौत्सव मंडळात रंगणार आहे. दुर्गा देवीने महिषासुराविरुद्ध नऊ रात्री १० दिवस युद्ध केले. या नऊ दिवसांत देवीने नऊ वेगवेगळी रूपे घेतली. नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे जणू भक्तीची नऊ रूपेच.
|
विशेष प्रतिनिधी कांजुरमार्ग येथील डंम्पिग ग्राऊंडला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केल्यामुळे खडबडून जागे झालेल्या शिवसेनेने कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र कचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या घोषणा गेल्या दोन दशकातील अर्धा डझन आयुक्तांनी यापूर्वी केल्या असून आजपर्यंत असा एकही प्रकल्प पालिकेला राबविता आलेला नाही. या पाश्र्वभूमीवर वीजनिर्मितीची सेनेची लोणकढी थाप आम्ही चालवून घेणार नाही कांजुरमार्ग डंम्पिग ग्राऊंडच्या विरोधातील आमचे आंदोलन होणारच, असा पवित्रा मनसेने घेतला आहे.
|
सुहास बिऱ्हाडे एरव्ही खाकी वर्दीत दंडुके हाती घेऊन फिरणारे पोलीस आता विद्यार्थी बनून अभ्यास करू लागले आहेत. पोलिसांची ही अनोखी शाळा सोमवारपासून सुरू झाली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी, कायदेतज्ज्ञ, डॉक्टर, वकील आदी मंडळी या विद्यार्थ्यांचे शिक्षक बनले आहेत. पोलीस दलात दाखल झाल्यानंतर सतत कामात व्यग्र असणाऱ्या पोलिसांना काळानुरूप अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी या शाळेची मांडणी मध्य प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण साळुंखे यांनी केली आहे.
|
विशेष प्रतिनिधी राष्ट्रीय चिन्ह मानला जाणारा ‘अशोकस्तंभ’ कुठे उभारावा, याचे नियम आखून देण्यात आलेले आहेत. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे चेंबूर येथे पालिकेने पाच वर्षांपूर्वी सुरू केलेले अशोकस्तंभ उभारणीचे बांधकाम आता रेंगाळले आहे. यावर केलेला सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च पाण्यात जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. नियमांची पायमल्ली करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांकडून आता हा खर्च वसूल करणार का, असा सवालही केला जात आहे.
|
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 9 of 14 |