|
बातम्या
विशेष प्रतिनिधी एअर इंडिया कार्यालयाचे नवी दिल्लीला स्थलांतर करण्यास भाजपने विरोध केला असून हा निर्णय अमलात आणल्यास आंदोलन करण्याचा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिला आहे.
|
वसई / प्रतिनिधी भाईंदरचे रेल्वेफाटक प्रवाशांना ये-जा करण्यासाठी बंद करण्यात आल्यानंतर नागरिकांसाठी बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गाची आता दुरवस्था झाली असून, ना रेल्वे ना नगरपालिकेचे तिच्याकडे लक्ष, पादचारी मात्र नरकयातना भोगताना दिसत आहेत. सदर भुयारी पादचारी मार्ग बांधण्यासाठी महापालिकेने कोटय़वधी रुपये रेल्वेला दिल्यानंतर हा मार्ग बांधण्यात आला. परंतु या भुयारी मार्गाचे काम अतिशय निकृष्ट असून, सुरुवातीपासूनच वरून गळती सुरू झाली आहे.
|
प्रतिनिधी मत्रेय उद्योगसमूहाचे संस्थापक कै. श्री. मधुसूदन सत्पाळकर यांच्या नवव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात संस्थेचे संचालक डॉ. अविनाश सावजी यांना भय्यू महाराज यांच्या हस्ते ‘मैत्रेय सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माझी आणि मत्रेय समूहाची तत्त्वे व कृती एकाच पातळीवरील आहेत. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत आहे, अशा भावना डॉ. सावजी यांनी व्यक्त केल्या.
|
प्रसाद रावकर - शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२
मुंबईचा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वास्तूरचनेचा उत्तम नमुना जपण्याच्या उद्देशाने एमएमआरडीएच्या ‘वास्तूवारसा समिती’ने वारसास्थळांची नवी यादी तयार केली आहे. या यादीत जुन्या इमारती, चाळी, धार्मिक स्थळे, उद्याने, मैदाने, मंडया, चित्रपटगृहे, महाविद्यालये, पोलीस ठाणी, रेल्वे स्थानके आदी वास्तूंचा समावेश आहे. या वास्तूंचा वारसास्थळांच्या यादीत खरोखरच समावेश झाला, तर त्यांच्या विकासाचा प्रश्न ही आधीच अनंत समस्यांनी गांजलेल्या मुंबईकरांच्या न बुजणाऱ्या जखमांवर मीठ चोळण्याची कृती ठरणार आहे. वेळीच न सोडविल्यास ही समस्या मुंबईत अक्राळविक्राळ रूप धारण करू शकते. या समस्येचा विविधांगानी घेतलेला हा आढावा. |
प्रतिनिधी वारसास्थळांची यादी तयार करताना वास्तूकडे एकाच चष्म्यातून पाहू नये. साधारणपणे ऐतिहासिक, सांस्कृतिक दृष्टीने महत्त्व असलेली इमारत वा परिसराचा वारसास्थळाच्या यादीत समावेश होतो. एखादी इमारत वारसास्थळ संवर्धन समितीला आवडली म्हणून तिचा समावेश करणे योग्य नव्हे. सरकारला एखादी इमारत या यादीत समाविष्ट करायचीच असेल, तर त्याच्या मालकाला बाजारभावाने पैसे द्यावेत आणि मग त्या मालमत्तेचा भविष्यात कधीही विकास करात येणार नाही, असा शिक्का मारावा. |
गोविंद तुपे ‘माझ्या आयुष्याचा आधार होती ती. माझा मुलगाच होती ती.. पण ती गेलीच.. आता आमचंही जगणं संपलय!’ अशा शब्दांत आपल्या वेदनांना धनंजय पाटील यांनी वाट करून दिली. उपनगरी रेल्वेतून प्रवास करत असताना त्यांच्या मुलीला, पूजा पाटील या महाविद्यालयीन तरुणीला जीव गमवावा लागला. एखाद्या रेल्वे दुर्घटनेत ज्या घरातील कुणी दगावलंय, त्या घरात अशा अपघाताची प्रत्येक बातमी जुन्या वेदनेवरची खपली काढते, आणि त्या जखमा पुन्हा भळभळू लागतात.. |
प्रतिनिधी आरोहण संस्थेतर्फे यंदा १८ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत रायगड, प्रतापगड, शिवथरघळ, सिंहगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग इत्यादी किल्ल्यांची भ्रमंती आयोजित केली आहे. |
प्रतिनिधी अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अब्दुल सलाम युसुफ शेख याला एका बार मालकाकडून सहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी अटक केली. या परिसरात संतोष बार अॅण्ड रेस्टॉरंटवर पोलिसांनी जुलै महिन्यात कारवाई केली होती. वेळेचे उल्लंघन करून हॉटेल सुरू असल्याने कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले होते. |
नाटय़लेखन कार्यशाळा बोधी नाटय़ परिषदेची २४ वी बोधी नाटय़लेखन कार्यशाळा येत्या २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी विक्रोळी येथे आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत नव्या नाटकांचे वाचन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी प्रेमानंद गज्वी-९८२१७७१८८४/अशोक हंडोरे ९१६७९२३३६२ यांच्याशी संपर्क साधावा. |
रेल्वेची कागदी घोडय़ांची दौड! विशेष प्रतिनिधी, शुक्रवार, १२ ऑक्टोबर २०१२ रेल्वेच्या हद्दीत वेगवेगळ्या कारणांमुळे वर्षांगणिक १५ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू ओढवतो, आणि त्यापैकी सहा हजार मृत्यू केवळ मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या क्षेत्रात होतात, तरीही हे मृत्यू रोखण्यासाठी रेल्वेच्या उपाययोजना मात्र जेमतेमच असल्याने मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वेचा मार्ग मात्र, मृत्यूमार्ग ठरला आहे. एखाद्या वाहनातून जनावरांना वाहून नेण्यासाठीदेखील नियमांचे बंधन असते, आणि वाहनाच्या क्षमतेपलीकडे जनावरे कोंबलेली आढळल्यास वाहनांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जातो. |
प्रतिनिधी
रिक्षा-टॅक्सींची भाडेवाढ ही प्रवाशांना लुटण्यासाठी आणि रिक्षाटॅक्सीचालकांची आणि युनियनच्या नेत्यांची धन करण्यासाठीच सरकारने केली असल्याचे दरवाढीच्या पहिल्याच दिवशी स्पष्ट झाले. नवीन दर लागू करताना पुढील ४५ दिवसांत मीटरचे कॅलिब्रेशन केले जावे, असा ‘आदेश’ परिवहन विभागाने दिला होता. मात्र आजच्या पहिल्याच दिवशी या कालावधीत कॅलिब्रेशन करणे शक्य होणार नाही, असा सूचक सूर परिवहन अधिकारी व्यक्त करू लागले आहेत. याचाच अर्थ दरवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला पडलेले छिद्र कॅलिब्रेशन न केलेल्या मीटरमुळे आणखीच मोठे होणार आहे. |
दादर रेल्वेस्थानक गुरुवारपासून टॅक्सीदरवाढ अंमलात आली असली दादर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला असलेल्या प्री-पेड टॅक्सी केंद्रावर मात्र जुन्याच दराने पैसे आकरले जात होते व त्यामुळे साहजिकच परगावहून आलेल्या मंडळींची पावले तिकडेच वळत होती. |
प्रसाद रावकर मुंबईतील घरांच्या किंमती गगनाला भिडू लागल्यामुळे निवृत्तीनंतरही अनेक अधिकारी-कर्मचारी महापालिका वसाहतींमध्येच राहणे पसंत करतात. कर्मचारी ही घरे सोडत नसल्याने आता महापालिकेने दरमहिन्याला २०० रुपये प्रतिचौरस फूट दराने भाडेआकारणी सुरू केली आहे. |
प्रिन्स चांद यांच्या चित्रांचे प्रदर्शन प्रिन्स चांद यांच्या चित्रांचे ‘डिव्हाइन डार्क’ हे प्रदर्शन बुधवारपासून काळा घोडा येथील जहांगीर कला दालनात भरविण्यात आले आहे. रस, भाव, रचना आणि तत्त्वज्ञान यांचा मिलाफ असलेली आध्यात्मिक, पण आधुनिक शैलीतील चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. |
प्रतिनिधी मुंबईत दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्यासाठी मोठय़ा कंपन्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. विविध परवानगी घेण्यासाठी निरनिराळ्या यंत्रणांकडे खेटे घालावे लागू नयेत यासाठी ‘एक खिडकी योजना’ राबविण्याचाही महापालिकेचा मानस आहे. |
पोलीस सोडतात कसे?’ प्रतिनिधी लाल दिवा लावलेला असूनही उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या गाडय़ा दररोज तपासणारे पोलीस खासगी गाडीवर लाल दिवा लावून मुंबईत मोकाट फिरणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाला कसे सोडतात, असे खडे बोल सुनावत मुंबई उच्च न्यायालयाने पाकिस्तानी नागरिकाच्या गाडीची आणि त्याच्याविरुद्ध मुंबई तसेच सांगलीत दाखल असलेल्या गुन्ह्य़ांची माहिती सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले. |
प्रतिनिधी मालवणीमधील एमएचबी मनपा शाळेच्या थकलेल्या देयकापैकी १ लाख ९३ हजार रुपयांचे देयक भरून महापालिकेने तात्पुरता वीजपुरवठा सुरू केला आहे. मात्र वीज कंपनीने केवळ ‘सिंगल फेज’ सुरू केल्यामुळे आजही शाळेत सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकला नाही. |
प्रतिनिधी फोर्ट येथील काळा घोडा, डेव्हिड ससून ग्रंथालय, छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय आणि जहांगीर कला दालन आदी सर्व वास्तू मुंबईचे सांस्कृतिक वैभव असून या परिसरातील जहांगीर कलादालनाच्या हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त पुढील आठवडय़ात कलादालनात आणि अन्य दोन ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. |
कार्यशाळेतील सूर प्रतिनिधी मुंबईच्या नागरी सुविधांचे आणि विकासाचे प्रश्न मार्गी लावायचे तर थेट लोकांमधून निवडून येणारा आणि जादा अधिकार असलेला महापौर हवा असा नेहमीचा सूर मुंबई विकास समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला. |
प्रतिनिधी आधुनिक महाराष्ट्राच्या जडण घडणीत महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या साने गुरूजींच्या साधना साप्ताहिकातर्फे प्रकाशित होणाऱ्या यंदाच्या साधना बालकुमार दिवाळी अंकाने प्रकाशनपूर्व तीन लाख अंकांची नोंदणी करून दिवाळी अंक विश्वात विक्रम नोंदविला आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 10 of 14 |
|
‘लोकसत्ता’चे विविध अॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-
 
वासाचा पयला पाऊस आयला
साप्ताहिक पुरवणी
लोकरंग (दर रविवारी)
चतुरंग (दर शनिवारी)
वास्तुरंग (दर शनिवारी)
व्हिवा (दर शुक्रवारी
करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)
अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)
|