प्रतिनिधी पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग देखभालीसाठी महापालिकेच्या ताब्यात द्यायचे असतील, तर तेथे वसूल होणारा पथकरही पालिकेच्या तिजोरीत जमा करावा, अशी एकमुखी मागणी स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली. |
गुरुवार, ११ ऑक्टोबर २०१२
मुंबईतील अवघ्या लाखभर रिक्षाटॅक्सीचालकांचे हित जपण्यासाठी सरकारने सुमारे सव्वादोन कोटी नागरिकांच्या खिशाला मोठे भोक पाडले आहे. महागाई १०-१२ टक्क्यांनी वाढत असताना रिक्षा-टॅक्सींची दरवाढ मात्र तब्बल ३०-३२ टक्क्यांची दिली गेली. या दरवाढीविरोधात प्रवासी एकत्र आले तर रिक्षाटॅक्सीचालकांची मुजोरी तर कमी होईलच; भविष्यात दरवाढ करण्यास चालकच युनियनला विरोध करतील. |
प्रतिनिधी
मालाडच्या झोपडपट्टीत राहून सकाळच्या वेळेस इडली आणि मेदूवडे विकणारा शंकर असो किंवा मग अंधेरी अथवा लालबागला राहून घरच्या घरी जेवणाचे डबे तयार करून पोहोचवून घरखर्चाला हातभार लावणाऱ्या चव्हाण किंवा धुरी वहिनी असोत या सर्वांना सध्या प्रश्न भेडसावतो आहे, जगायचं कसं ? |
नामसाधना अभ्यास शिबीर श्री ब्रह्मानंद महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने येत्या १५ ऑक्टोबर रोजी वाशी येथे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज नामस्मरण महामंडळाच्या वतीने नामसाधना अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. |
* बिल न भरल्याने पालिका शाळेची वीज कापली * दिवे नाहीत, पंखे नाहीत * प्यायला पाणी नाही अन् शौचालयही नाही
प्रसाद रावकर खड्डय़ातल्या रस्त्यांसाठी शेकडो कोटी रुपयांची उधळण कंत्राटदारांवर करणारे आणि त्यासाठी पडद्यामागे हातमिळवणी करणारे मुंबई महापालिकेचे सर्वपक्षीय नगरसेवक तब्बल ४००० विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कसे खेळत आहेत, याचे संतापजनक उदाहरण मालाडच्या एका महापालिका शाळेच्या स्थितीमुळे उघड झाले आहे. |
सुनील नांदगावकर
‘कोंबडी पळाली’च्या ठेक्यावर महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला ताल धरायला लावणारी फटाकडी क्रांती रेडकर आता थेट हॉलिवूडला चालली आहे. हॉलिवूडचे दिग्दर्शक विल्यम रीड यांनी मदर तेरेसा यांच्यावर आधारित ‘द लेटर्स’ हा चित्रपट बनविला असून मदर तेरेसा यांच्या कार्यात मोलाचा सहभाग असलेल्या सिस्टर गेर्टरूड ही महत्त्वाची व्यक्तिरेखा क्रांती रेडकरने साकारली आहे. |
प्रतिनिधी
अतिरिक्त शुल्कवसुली, ‘टर्म वर्क’च्या नावाखील नियमबाह्य़ परीक्षा व्यवस्था राबविणे, मुलभूत सुविधा देणे आदी गंभीर तक्रारींना आंदोलनाच्या माध्यमातून वाचा फोडत शीवच्या ‘पद्मभूषण वसंतदादा पाटील प्रतिष्ठान’च्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी महाविद्यालयाच्या आवारात जमले होते. |
विशेष प्रतिनिधी मनसेच्या हातात गेलेला दादरचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शिवसेनेने कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. या पाश्र्वभूमीवर मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर तुटून पडण्याचा निर्णय मनसेच्या नेतृत्वाने घेतला आहे. |
प्रतिनिधी मत्स्य व कोळंबी शेतीच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर मुंबईच्या विज्ञान संस्थेमध्ये १२ व १३ ऑक्टोबर रोजी एका विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. |
‘मराठी’ विषयावर कृतीसत्र इयत्ता नववीच्या ‘मराठी’ विषयाच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आयोजित दोन दिवसाच्या कृतिसत्रात शिक्षण निरीक्षक उत्तर विभागातील २०० शाळांमधील शिक्षक सहभागी झाले होते. |
वृषाली अर्जुनवाडकर, मुंबई, १० ऑक्टोबर २०१२ जागतिक मानसिक आरोग्य संघटनेच्या वतीने १९९२ पासून १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून घोषित करण्यात आला. आज त्याला वीस वर्षे पूर्ण होत आहेत. मानसिक आरोग्यासंबंधी जागृती निर्माण करणे हे या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या वर्षाची संकल्पना “नैराश्य – आधुनिक जगावरील संकट” अशी आहे. |
प्रतिनिधी - बुधवार, १० ऑक्टोबर २०१२
रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीमध्ये जवळचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी झळ बसणार आहे. त्या तुलनेमध्ये लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढीची तेवढी झळ बसणार नाही, हे स्पष्ट आहे. रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ पुढच्या काही किमीमध्ये कमी जास्त होत असून पाच किमीच्या पुढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याची विशेष झळ लागणार नाही. परिवहन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किमान अंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही भाडेवाढ जास्तीची वाटेल. मात्र त्याचवेळी ५ किमी प्रवास करताना प्रवाशांना पूर्वीपेक्षा एक किंवा दोनच रुपये जादा भाडे द्यावे लागणार आहे. |
प्रतिनिधी
शहाण्याने न्यायालयाची आणि रुग्णालयाची पायरी चढू नये म्हणतात. पण, गुन्हेविषयक प्रकरणांमध्ये पोलीस ठाण्याची पायरी ओलांडल्याशिवाय न्यायालयाच्या पायरीपर्यंत पोहोचता येत नाही. एकवेळ न्यायालयातील ‘व्हाइट कॉलर’ वातावरणाचे दडपण एखाद्याला येणार नाही. पण, पोलीस ठाण्यातील कथित ‘दबंगगिरी’ची भीती शहाण्यालाही असते. त्यातून कायदेविषयक व्यवसायात पडायचे तर हा पोलिसी खाक्या माहिती असायलाच हवा. के.सी. विधि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी गिरगावचे विठ्ठलभाई पटेल मार्ग पोलीस ठाणे गाठले ते याच उद्देशाने. |
म्हाडाची धरसोड वृती रहिवाशांच्याच मुळावर निशांत सरवणकर/ स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ
म्हाडाच्या ५६ वसाहतींचा पुनर्विकास हा सध्या ज्वलंत विषय बनला आहे. हा पुनर्विकास करताना विकासकांकडून अधिमूल्य (प्रीमियम) स्वीकारावे, असा आग्रह शिवसेनेने धरला आहे. या मार्गातून म्हाडाला सुमारे १० हजार कोटी रुपये मिळतील, असा शिवसेनेचा दावा आहे. मात्र, म्हाडाचे प्राथमिक काम पैसे कमाविणे हे नसून सर्वसामान्यांना परवडतील अशा भावात घरे बांधून देण्याचे असल्याने विकासकांकडून घरेच स्वीकारावीत, असा एक जोरदार मतप्रवाह आहे. असे केल्यास सुमारे एक लाख घरे उपलब्ध होऊ शकतात, असा दावा केला जातो. या वादाच्या पाश्र्वभूमीवर नेमकी वस्तुस्थिती काय आहे याचा ‘वृत्तान्त’ने घेतलेला आढावा. |
प्रशांत मोरे
व्यावसायिक हिंदी चित्रपटांच्या विश्वात अर्ध शतकाहूनही अधिक काळ कार्यरत असूनही आपल्या रचनेतील तरल काव्य कसोशीने जपणारे ज्येष्ठ कवी-गीतकार गुलजार यांनी खास मुलांसाठी लिहिलेली मोजकी गाणीही सदाबहार ठरली आहेत. मासुम चित्रपटातील ‘लकडी की काठी..’ किंवा ‘जंगलबुक’ या अॅनिमेशन मालिकेसाठी त्यांनी लिहिलेले ‘जंगल जंगल पता चला है, चड्डी पहेन के फुल खिला है’ ही गाणी तर प्रत्येक लहान मुलाच्या तोंडी आहेत. आता बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा या ऑस्करविजेत्या गीतकाराने खास मुलांसाठी नवे गाणे लिहिले आहे. नीक वाहिनीवरून येत्या १६ ऑक्टोबरपासून प्रसारीत होणाऱ्या ‘मोटु पतलु’ या अॅनिमेशन मालिकेचे शीर्षकगीत गुलजार यांनी लिहिले आहे. |
राम धस यांच्या राजीनाम्याची मागणी प्रतिनिधी प्रभागनिहाय कामे करणारे कंत्राटदार आणि नगरसेवकांमध्ये संगनमत असल्यामुळे कामे होत नसून मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आपल्या अहवालात करणाऱ्या पालिकेच्या प्रमुख लेखापालाच्या राजीनाम्याची मागणी करीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापौरांना कामकाज तहकूब करण्यास भाग पाडले. तसेच या प्रश्नाची तड लागत नाही, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज होऊ देणार नाही, असा इशाराही नगरसेवकांनी प्रशासनाला दिला. |
‘म्हाडा’च्या जुन्या वसाहतींच्या पुनर्विकासावरून शिवसेनेने आंदोलन पुकारत वाद ऐरणीवर आणला आणि अधिमूल्य (प्रीमियम) स्वीकारून जादा चटईक्षेत्र देऊन पुनर्विकास प्रक्रिया मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली. मात्र, अधिमूल्य स्वीकारून पैसे कमावण्यापेक्षा पुनर्विकासात तयार घरे घेतल्यास सोडतीच्या माध्यमातून ती सामान्य मुंबईकरांना रास्त दरात मिळू शकतील, अशी ‘म्हाडा’ची ठाम भूमिका आहे. |
नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर प्रतिनिधी नवीन इमारती बांधताना पर्जन्यजल पुनर्भरण योजना (रेन वॉटर हार्वेस्टिंग) सक्तीची असतानाही ती न राबविता अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत. आणि तरीही त्यांना निवासी दाखला देण्यात आला आहे. या मुद्दय़ावरून पालिकेच्या सभेत सोमवारी मोठा गदारोळ झाला. |
उच्च न्यायालयाची राज्य सरकारला चपराक प्रतिनिधी मद्यपी चालकांना वचक बसविण्यासंदर्भात १० वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशाची पूर्तता करण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फैलावर घेतले. अभिनेता सलमान खान याने दहा वर्षांपूर्वी वांद्रे येथे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून केलेल्या अपघातानंतर लगेचच करण्यात आलेल्या या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने राज्य सरकारला चपराक लगावली. |
प्रतिनिधी मराठी चित्रपट त्रिखंडात झेंडे फडकावत असताना आता परदेशी कलाकारांनाही ही चित्रपटसृष्टी खुणावू लागली आहे. ‘फॉरेनची पाटलीण’ या चित्रपटाद्वारे बिलायना रॉडनिख या युगोस्लाव्हियन नटीने मराठीत काम केल्यानंतर आता एक जर्मन मुलगीही एका मराठी चित्रपटाद्वारे अभिनयाचा ‘श्रीगणेशा’ करणार आहे. या अभिनेत्रीचे नाव ख्रिस्तीन पीस्कर असून येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या ‘पिपाणी’ या चित्रपटातून मराठीत पदार्पण करणार आहे. ‘लोकसत्ता’शी तिने इमेलद्वारे मारलेल्या गप्पांतून आपला मोठय़ा पडद्यापर्यंतचा प्रवास उलगडला. |
|
|
<< Start < Prev 11 12 13 14 Next > End >>
|
Page 11 of 14 |