बातम्या
मुखपृष्ठ >> मुंबई वृत्तान्त
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बातम्या
वृद्धेची नातवाविरुद्ध तक्रार Print E-mail

‘निर्वाह खर्चा’साठीचा पहिला अर्ज मुंबईत दाखल
रेश्मा शिवडेकर
alt

कायद्याचे पाठबळ आणि हिंमत देणाऱ्या शब्दांचा आधार मिळाला की वयाच्या ८०व्या वर्षीही अन्यायाविरोधात लढण्याची ताकद कशी मिळते हे पाल्र्याच्या आनंदीबाई बेंडले यांनी दाखवून दिले आहे.आनंदीबाईंचे राहते घर नातवाने बळकावले आहे. नातवाच्या या विश्वासघातामुळे आनंदीबाईंना कशाचाच आधार राहिला नाही. पण, आनंदीबाई खचल्या नाही. ‘हेल्पेज इंडिया’ या ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थेच्या मदतीने त्यांनी ज्येष्ठांच्या भल्यासाठी असलेल्या कायद्याचा आधार घेऊन नातवाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
 
पालिकेचे पालकत्व Print E-mail

प्रतिनिधी
alt

आयुष्याच्या संध्याकाळी आजारपणामुळे त्रस्त झालेल्या, एकाकी जीवन कंठणाऱ्या आणि अगतिक ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी मुंबई महापालिकेने एक धोरण प्रस्तावित केले आहे. या धोरणाला लवकरच अंतिम रूप दिले जाणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या १० कोटींहून अधिक झाली आहे. त्यापैकी १२ लाख ज्येष्ठ नागरिक मुंबईत असून त्यापैकी २१ टक्के दारिद्रय़रेषेखाली जीवन जगत आहेत.
 
समृद्ध उत्तररंगासाठी.. Print E-mail

मंगळवार, ९ ऑक्टोबर २०१२
alt

भारत आज ‘तरुणांचा देश’ आहे. स्वाभाविकच उद्या तो ‘वृद्धांचा देश’ होणार आहे. ‘एकत्र कुटुंब’ पद्धतीपासून ‘एकल कुटुंब’ व्यवस्थेमार्गे आपण ‘विभक्त कुटुंब’ रचनेपर्यंत प्रवास केला आहे. या व्यवस्थेत आता वृद्धांना फारसे स्थान नाही आणि विचारही नाही. पाश्चात्य देशांमध्ये ‘सोशल सिक्युरिटी’चा भक्कम आधार निराधार, अगतिक आणि आजारी वृद्धांना मिळतो. आपल्या देशात मात्र त्याचे वारेही फारसे फिरकलेले नाही. त्यामुळे आजवर मुला-नातवांनी फिरवलेली पाठ आणि दुसरीकडे सरकारदरबारी अनास्था अशा कोंडीत ज्येष्ठ नागरिक सापडले आहेत.
 
आधार खाकी वर्दीचा! Print E-mail

सुहास बिऱ्हाडे
alt

‘पोलीस नियंत्रण कक्ष? कुणी पोलीस आहे का माझ्याशी बोलायला? एकटय़ाला करमत नाहीये..’ काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एका ज्येष्ठ नागरिकाने दूरध्वनीवरून केलेल्या या करुण मागणीने पोलीसदल हेलावले. मुंबईतले वृद्ध किती एकाकी जीवन जगतात याचे हे उदाहरण बोलके ठरावे. हा किस्सा खुद्द गृह मंत्र्यांकडे गेला आणि वृद्धांच्या मदतीसाठी आता पोलीस दलाने पुढाकार घेतला आहे. मुंबईत वरिष्ठ नागरिकांच्या हत्या, त्यांच्या असहायतेचा फायदा घेत त्यांच्यावर चोरीसाठी हल्ले आदी घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे.
 
एकमेका साह्य़ करूनच.. Print E-mail

ज्येष्ठांच्या एकाकीपणावर मानसशास्त्रज्ञांचा तोडगा
प्रतिनिधी
alt

सामाजिक, आर्थिक आणि शारीरिक या सर्वच स्तरांवर सहसा ज्येष्ठ नागरिक परावलंबी बनतात. त्यामुळे मानसिकदृष्टय़ा ते नैराश्याकडे झुकण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे गट खूप महत्त्वाची कामगिरी बजावू शकतात. अनेकदा या सर्व प्रकारच्या नैराश्यावर मात करण्याची ताकद त्यांना या गटांमधून मिळू शकते, असे मानसशास्त्रज्ञांना वाटते. ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक दुर्बलतेची कारणे आणि त्यावरील उपाय याबाबत मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख गौतम गवळी आणि केईएम रुग्णालयातील मानसशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. जयंत आपटे यांनी ‘वृत्तान्त’शी संवाद साधला.
 
ज्येष्ठांच्या भल्यासाठीचा कायदा बासनात Print E-mail

प्रतिनिधी
वृद्ध पालकांची काळजी त्यांच्या मुलांनी घ्यावी, यासाठी गेली पाच वर्षे अस्तित्वात असलेल्या ‘मेंटेनन्स अ‍ॅण्ड वेल्फेअर ऑफ पॅरेन्ट्स अ‍ॅण्ड सिनिअर सिटिझन्स अ‍ॅक्ट’ या केंद्र सरकारच्या कायद्याची अंमलबजावणी राज्यात आजही प्रभावीपणे होत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाऱ्यावर सोडल्याची भावना आहे.

 
‘डॉक्टर व रुग्णांमध्ये ‘रुग्णानुबंध’ निर्माण व्हायला हवेत!’ Print E-mail

मुंबई / प्रतिनिधी
‘डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंध हे जोवर ‘रुग्णानुबंधां’त परिवर्तित होत नाहीत तोवर डॉक्टरांवरील रुग्णांच्या वाढत्या अविश्वासाचा मुद्दा सतत चर्चिला जाणार आहे. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील व्यवहार हा ग्राहक आणि विक्रेता असा असूच शकत नाही.

 
अपहृत प्रिन्स ५ महिन्यांनतर भाईंदरला सापडला Print E-mail

प्रतिनिधी
एप्रिल महिन्यात ग्रॅण्ट रोड येथून अपहरण झालेला प्रिन्स हा चार महिन्यांचा मुलगा अखेर भाईंदर येथे सापडला आहे. डी बी मार्ग पोलिसांनी ५ महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर प्रिन्सचा शोध घेऊन त्याला पळविणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीला ताब्यात घेतले आहे.

 
हाऊसिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी अनिल जाधव यांची फेरनिवड Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी अनिल जाधव यांची फेरनिवड झाली आहे. ते सलग तिसऱ्यांदा या पदावर निवडून आले आहेत. २०१२-१३ या वर्षांसाठी फेडरेशनच्या संचालक मंडळावर पुढील सदस्य निवडून आले आहेत.

 
सत्तरावा वाढदिवसही इतर दिवसांसारखाच.. Print E-mail

प्रतिनिधी
alt

हिंदी चित्रपटसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन यांचा सत्तरावा वाढदिवस कसा असेल, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांसह संपूर्ण चित्रपटसृष्टीला लागली आहे. अमिताभ यांचा वाढदिवस कसा साजरा होणार, या बाबतच्या बातम्यांचे पेव फुटले आहे. अमिताभ बच्चन यांनी मात्र आपला सत्तरावा वाढदिवस हा माझ्यासाठी अन्य दिवसांसारखाच आहे, असे सांगत या उत्साहाला आवर घालायचा प्रयत्न केला आहे. एकीकडे भारतीय सिनेमाचे शतक आणि दुसरीकडे याच सिनेमाचा महानायक म्हणून ओळख असलेल्या अमिताभ बच्चन यांचा सत्तरावा वाढदिवस हा सिनेप्रेमींसाठी दुग्धशर्करा योग आहे.
 
ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान! Print E-mail

वसई/ प्रतिनिधी
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून २ ऑक्टोबर रोजी वसईतील ९० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान विरंगुळा केंद्र येथे करण्यात आल्याची माहिती नालासोपारा ज्येष्ठ नागरिक संघाचे दत्तात्रय देशमुख यांनी दिली.

 
अबु जिंदालवर पुरवणी आरोपपत्र दाखल होणार Print E-mail

प्रतिनिधी
मुंबई हल्ल्यातील सुत्रधार सैय्यद झैबुद्दीन उर्फ अबू जिंदाल याच्यावर लवकरच पुरवणी आरोपपत्र दाखल होणार आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. २६ /११ च्या मुंबई हल्ल्यात अबू जिंदाल याची मोठी भूमिका होती.

 
संक्षिप्त Print E-mail

श्रीमद्भगवद्गीता संथावर्ग
श्रीमद्भगवद्गीता नि:शुल्क संथावर्गाचे आयोजन श्रीकृष्ण जोशी यांनी केले आहे. १३ ऑक्टोबरपासून प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी ४ ते ५.३० या वेळेत हे वर्ग समर्थ व्यायाम मंदिर, दुसरा मजला, प्र. ल. काळे गुरूजी मार्ग, दादर पश्चिम येथे घेण्यात येणार आहेत.

 
आंबटशौकीन वाढले! Print E-mail

सीएसटी आणि कल्याण स्थानके सर्वात धोकादायक
सुहास बिऱ्हाडे, शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२

अव्याहत धावणाऱ्या मुंबईत रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांना चोरटा स्पर्श आणि धक्काबुक्की करणाऱ्या आंबटशौकींनाच्या संख्येत वाढ झाली आहे. गर्दीत घाईने प्रवास कणाऱ्या महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यांना जाणीवपूर्वक धक्के मारणे, चोरटा स्पर्श करणे असे प्रकार वाढत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
 
नवरात्रीत पाऊस करणार बेरंग? Print E-mail

प्रतिनिधी

मोसमी पाऊस आता परतीच्या प्रवासाला लागला असल्याचे वेधशाळेकडून सांगितले गेले असले तरी परतीच्या पावसाचा मुक्काम यंदा नवरात्र व दसऱ्यापर्यंत राहणार असल्याचा अंदाज पारंपरिक आडाखे आणि पंचांगानुसार व्यक्त केला जात आहे. तसे खरेच झाले तर दांडियाच्या उत्साहावरही पाणी पडण्याची शक्यता आहे.
 
‘पाषाण शाळा’ पाषाणासारखीच कोरडी Print E-mail

गोविंद तुपे

६ ते १४ वर्षांखालील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा कायदा सरकारने केला असला तरी प्रशासनाच्या अनास्थेमुळे इतर अनेक कायद्यांप्रमाणेच तोही कागदावरच राहिला आहे. स्थलांतर करणारे मजूर, अनाथ, बेघर मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या पाषाण, साखर, वस्ती शाळांना निवासी शाळांचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या निर्णयावर तीन वर्षे झाली तरी काहीच कार्यवाही झालेली नाही.
 
या सम हाच! Print E-mail

फिल्लमबाज

मनोरंजन याचा शब्दार्थ लिहायचा म्हटला तर त्यात कुठल्या कुठल्या विलक्षण गोष्टी येऊ शकतात, ते सारे काही सिंगापूरच्या एकाच ठिकाणी एकवटल्या आहेत, याची प्रचीती आज सिंगापूरच्या युनिव्हर्सल स्टुडिओला भेट दिलेल्या मराठी कलावंतांना आली. मनोरंजनाच्या नाटय़, चित्रपट, क्रीडा अशा विविध प्रकारांमध्ये अद्ययावत तंत्राचा नेमका वापर कसा करता येईल, याचे हा स्टुडिओ म्हणजे चालतेबोलते उदाहरणच म्हणावे लागेल.
 
अमर्याद वीज फक्त दोनशे रुपयांत.. Print E-mail

तपासणी पथकांच्या हप्तेबाजीच्या भराऱ्या!
गोविंद तुपे
ज्यांचा विजेचा वापर मर्यादित आहे, त्यांनाही महिन्याला कमीत कमी ५०० रुपये देयक अदा करावे लागतेच, परंतु ज्यांनी चोरून वीज घेतली आहे, त्यांनी अमर्याद वीज वापरली तरी त्यांना महिन्याकाठी फक्त २०० रुपये मोजावे लागतात.

 
मॅनहोल व खड्डय़ांमध्ये पडून जखमी होणाऱ्यांना नुकसानभरपाई नाही Print E-mail

प्रतिनिधी
‘खड्डय़ांतील’ रस्ते आणि मॅनहोलमध्ये पडून जखमी होणाऱ्या मुंबईकरांना नुकसानभरपाई देण्यास पालिका प्रशासन असमर्थ ठरले आहे.

 
माधवन म्हणतो, ‘शाकाहारच बरा’ Print E-mail

‘पेटा’साठी केली ‘ग्लास वॉल्स’ नावाची चित्रफीत
 प्रतिनिधी
हिंदी चित्रपटसृष्टी आणि प्राणी यांचे नाते खूपच सलोख्याचे आहे. गेलाबाजार एखादी अभिनेत्री किंवा अभिनेता, आपण प्राण्यांवर किती प्रेम करतो, हे आवर्जून सांगतात.

 
<< Start < Prev 11 12 13 14 Next > End >>

Page 12 of 14

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो