प्रतिनिधी विकास आणि प्रगती आवश्यक असली तरी त्यासाठी काय किंमत मोजावी लागते त्याचा विचार करून विकासाला विवेकाची जोड देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी गुरुवारी येथे केले. |
प्रतिनिधी ग्रॅण्ट रोड परिसरात सुरू असलेला वेश्या व्यवसाय गुरुवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. |
‘मानव संसाधन विकास’ वर चर्चास़त्र ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रिकल्चर’च्या वतीने २० ऑक्टोबर रोजी ‘मानव संसाधन विकास’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. |
प्रतिनिधी, शुक्रवार, ५ ऑक्टोबर २०१२
पादचाऱ्यांच्या सोयीचे कारण देत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने महानगर प्रदेशातील रेल्वेस्थानकांजवळ ‘स्कायवॉक’ बांधण्याचा शेकडो कोटींचा वादग्रस्त प्रकल्प राबवला खरा; पण शीव, भांडुप, कांजूरमार्ग असे दोन-पाच नव्हे जवळपास १३ स्कायवॉक अत्यल्प वापरामुळे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यापोटी तब्बल २७७ कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. राज्यात पायाभूत सुविधांच्या नावाखाली कंत्राटदारांच्या विकासाचा कार्यक्रम कसा चालतो हेच त्यामुळे अधोरेखित झाले आहे. |
प्रतिनिधी
रेल्वे मार्ग ओलांडून मृत्यूला आमंत्रण देऊ नका, असे भावनिक आवाहन वारंवार करूनही रेल्वे मार्ग ओलांडणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. काही ठिकाणी पादचारी पूल नाही तर काही ठिकाणी पूल चुकीच्या ठिकाणी असल्याने अनेकजण रेल्वे मार्ग ओलांडून जीव धोक्यात घालत असतात. दरवर्षी सरासरी साडेतीन ते चार हजार व्यक्ती रेल्वे मार्ग ओलांडताना मृत्यूमुखी पडतात, असे आकडेवारी सांगते. |
प्रतिनिधी
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर लागणाऱ्या ‘मालगुडी डेज’ या मालिकेच्या सुरुवातीला लागणाऱ्या संगीताइतकीच गाजलेली गोष्ट म्हणजे या मालिकेच्या नामावलीच्या वेळी दाखवण्यात येणारी रेखाचित्रे! या रेखाचित्रांनी अनेकांच्या मनात ‘मालगुडी डेज’च्या आठवणी अजूनही ताज्या ठेवल्या आहेत. आता काही चित्रपटही आपल्या प्रसिद्धीसाठी अशाच रेखाचित्रांचा आधार घेण्याचा प्रयत्न करत आहेत. १२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पिपाणी’ या चित्रपटाची प्रसिद्धी अशी रेखाचित्रांमार्फतच केली जाणार आहे. |
प्रतिनिधी
गेल्या १२ वर्षांत टॅक्सीची भाडेवाढ पाच वेळा झाली असून प्रत्येकवेळी एक रुपयाने भाडेवाढ झाली आहे तर रिक्षाची भाडेवाढ सहावेळा झाली आहे. ही भाडेवाढ पहिल्या टप्प्यासाठी विशेष नसली तरी पुढच्या टप्प्यांमध्ये त्याचा विशेष फटका प्रवाशांना बसला आहे. यात २०१० मध्ये झालेली भाडेवाढ सर्वाधिक म्हणजे दोन रुपयांची झाली आहे. |
प्रतिनिधी
‘साहब थप्पडसे नही, प्यार से डर लगता है..’ हा दबंगमधला संवाद भले सोनाक्षी सिन्हाने सलमानला ऐकवला असेल पण स्वत: सलमानलाही त्याच्या चाहत्यांच्या प्रेमाची भीती वाटायला लागली आहे. म्हणजे सलमानला आपल्या चाहते गमवायची इच्छा नाही आणि त्यासाठी काहीही करायची त्याची तयारी असते. म्हणूनच पुढच्या वर्षीची ईद सलमानच्या चित्रपटाशिवाय सुनी सुनी जाणार, अशी चर्चा इंडस्ट्रीत सुरू होताच सलमानने घाईघाईत ‘शेरखान’ हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार अशी घोषणा के ली. ईद आणि सलमानचा हिट चित्रपट हे समीकरण गेले तीन वर्ष चुकलेले नाही. |
प्रतिनिधी रस्त्यावर बंदोबस्तासाठी नि:शस्त्र असणाऱ्या महिला पोलिसांना आता काठय़ा मिळणार आहेत. महिला पोलिसांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी हा निर्णय घेतला आहे. |
प्रतिनिधी भारतातील पहिल्या महिला तबलावादक आणि संगीताच्या अभ्यासक डॉ. आबान मिस्त्री यांचे प्रदीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. |
जुन्यांची मुदत संपली; नव्यांनी कामे नाकारली! प्रतिनिधी प्रभागांतील छोटीमोठी विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांची मुदत पुन्हा एकदा संपुष्टात आल्याने आणि नव्या कंत्राटदारांनी त्यांना दिलेल्या कामांना हात न लावल्यामुळे संपूर्ण मुंबईतील कामे ठप्प झाली आहेत. |
मधु कांबळे लोकसभा निवडणुकीस अद्याप दीड वर्षांचा अवधी असला तरी, मुंबईत बुधवारी झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात महायुतीच्या नेत्यांनी मात्र जोरात निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. |
नाटय़ प्रतिनिधी रंगभूमीवरील अनभिषिक्त मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या पाचव्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेतर्फे मच्छिंद्र कांबळी यांचे छायाचित्र यशवंत नाटय़संकुलात लावण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. |
प्रतिनिधी मराठी दिवाळी अंकांमध्ये आपले आगळे स्थान निर्माण केलेल्या ‘धनंजय’ आणि ‘चंद्रकांत’ या दिवाळी अंकांचे संपादक राजेंद्र कुलकर्णी यांच्या पश्चात त्यांची परंपरा राखत यंदाही हे दोन्ही दिवाळी अंक प्रकाशित होणार आहेत. |
फिल्लमबाज दररोज शूटिंगमुळे सक्तीचं जागरण करणाऱ्या साऱ्या मऱ्हाटमोळ्या सेलिब्रिटींचं काल ऐच्छिक जागरण झालं. गेल्या वर्षीसारखं साऱ्या सेलिब्रिटींनी एकाच विमानातून सफर केली नाही, तर यंदा सारे सेलिब्रिटी आणि त्यामुळे त्यांचे हास्यविनोद, कोटय़ा याचे एकाहून एक सरस परफॉर्मन्सेस अनेक विमानांमध्ये विभागले गेले. |
प्रतिनिधी ‘स्वरबंध’ या संस्थेतर्फे दरवर्षी संगीतात साथ करणाऱ्या कलावंतांना पुरस्कार दिले जातात. संगीत क्षेत्रातील सहवादक कलावंत नेहमीच उपेक्षित राहतात. |
प्रतिनिधी धर्मकीर्ती सुमंत लिखित ‘गेली २१ वर्षे’ हे नाटक स्वत:चा वेगळा ठसा उमटविणारे असून नाटकातून तरुण पिढीच्या जाणिवा व्यक्त होत आहेत, असे प्रतिपादन अभिनेते-दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी बुधवारी दादर येथे केले. |
‘मुक्तांगण’च्या कार्याचा गौरव सोहळा मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघ या संस्थेतर्फे अनेक वैशिष्टय़पूर्ण उपक्रमांबरोबरच उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचा गौरवही केला जातो. |
बँकिंग, विमा पदविका अभ्यासक्रम मुलुंड येथील केळकर-वझे महाविद्यालयात डिप्लोमा इन इन्शुअरन्स अँड बँकिंग हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. |
निशांत सरवणकर - गुरुवार, ४ ऑक्टोबर २०१२
आपली व कंपनीची प्रतिमा उजळ व्हावी यासाठी कार्पोरेट क्षेत्रातील ‘पीआरओ’गिरी मशहूर आहे. ‘पीआर’गिरीपेक्षा विविध सरकारी कार्यालयातील लायझनिंगची जबाबदारीही याच मंडळीवर असते. गुन्हेगारी टोळ्यांच्या म्होरक्यांनीही आता आपापल्या ‘भाई’चे लायझनिंग करण्यासाठी ‘स्वच्छ चारित्र्या’च्या तरुण व तडफदार तरुणांची ‘पीआरओ’ म्हणून नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. या तरुणांना महिन्याकाठी २० हजार ते ३० हजार रुपये पगार दिला जात आहे. अर्थात या तरुणांना आपण ज्या कंपनीत काम करतो ती ‘भाईची कंपनी’ आहे याची कल्पनाच नसते, असेही आढळून आले आहे. |
|
|
<< Start < Prev 11 12 13 14 Next > End >>
|
Page 13 of 14 |