बातम्या
मुखपृष्ठ >> मुंबई वृत्तान्त
 

मुंबई वृत्तान्त

ई-पेपर
 
 

लोकसत्ता ब्लॉग


संघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे!
पर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया

गाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे

माणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला!

alt

सर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..

alt
कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको?
 alt
पीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा
 alt
दुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे!
नक्कल करायलाही अक्कल लागते!
मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल
झाला नसता!
alt
‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा
वारसा
पाच वर्षे प्रभावी सरकार
देऊ शकेल अशी पर्यायी
व्यवस्था मला दिसत
नाही!
एक तळमळ बोलकी
झाली
आनंदवनाच्या ‘प्रवाहा’त एकरूप आमटेंची तिसरी पिढी..
लोकांसाठी नव्हे ,
लोकांच्या सोबत...
एक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’
बोलणं किंवा वागणं!
‘विचार’ निश्चित झाला
की शब्द आपोआप
सामोरे येतात
‘जमिनीचा पैसा
बिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला
हवा!’

दि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव 

बातम्या
बर्फी शंभर कोटींची Print E-mail

प्रतिनिधी

‘हलवाई’ अनुराग बसूने तयार केलेली ‘बर्फी’ची किंमत आता शंभर कोटी झाली आहे. ऑस्करमध्ये भारतातर्फे पाठवल्या जाणाऱ्या या चित्रपटाने भारतात शंभर कोटींपेक्षा जास्त गल्ला जमा केला आहे. विशेष म्हणजे यंदा शंभर कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवणाऱ्या चित्रपटांची संख्या आता ६ वर गेली आहे. बर्फी नावाच्या मूकबधीर मुलाची गोष्ट सांगणाऱ्या ‘बर्फी’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी, १४ सप्टेंबर रोजी, ९.२० कोटींचा गल्ला जमा केला होता. तर त्यापुढील दोन दिवसांत आणखी ३४.६ कोटी रुपये कमावले. त्यानंतर त्याची निवड ऑस्करसाठी झाली आणि ‘बर्फी’ पुन्हा तेजीत आला. प्रदर्शनानंतरच्या पहिल्याच आठवडय़ात ५८ कोटींची कमाई करणाऱ्या ‘बर्फी’ने बुधवारी शंभर कोटींचा आकडा पार केला.
 
दहशतवादविरोधात मिशन मृत्युंजय Print E-mail

प्रतिनिधी

मुंबईवर दहशतवादाची टांगती तलवार कायम आहे. दहशतवाद्यांमध्ये १८ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांचा प्रामुख्याने समावेश आहे. या तरुणांना बालवयातच ‘जिहाद’चे डोस पाजले जातात. ‘जन्नत’ची वेगळी परिभाषा सांगितली जाते. त्याला हे तरुण भुलतात. त्याऐवजी या शाळकरी तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी नवे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी ‘मिशन मृत्युंजय’ सुरू केले आहे.  नागपूर आणि पुण्याचे पोलीस आयुक्त असताना डॉ. सिंग यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच मुंबईतही हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे डॉ. सिंग यांनी ‘मुंबई वृत्तान्त’ला सांगितले.
 
नव्या धोरणाच्या प्रतीक्षेत मंडया शरपंजरी! Print E-mail

प्रसाद रावकर

नव्या धोरणाची प्रतीक्षा करता करता मुंबईमधील मंडया आता शरपंजरी पडू लागल्या आहेत. धोकादायक बनलेल्या या मंडईंकडे ग्राहक जिवाच्या भीतीने पाठ फिरवू लागले आहेत. या परिस्थितीमुळे व्यापारी मंडळी हवालदिल झाली आहेत. मात्र महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना-भाजप यांची कुंभकर्णी झोप अजूनही उडालेली नाही. मुंबईमध्ये एकीकडे झकपक मॉल उभे राहत आहेत, तर दुसरीकडे महापालिकेच्या मंडईंची अवस्था दिवसेंदिवस दयनीय बनत चालली आहे. मोडकळीस आलेल्या या मंडईंमध्ये ग्राहकांचा ओघ कमी होऊ लागला आहे.
 
मणिरत्नमच्या चित्रपटातून ऐश्वर्याचे पुनरागमन Print E-mail

प्रतिनिधी

चित्रपट करिअर, विवाह आणि आता मातृत्व अशा तिन्ही आघाडय़ांवर बाजी मारल्यानंतर ऐश्वर्या राय-बच्चन पुन्हा चित्रपटात कधी परतणार, याची चाचपणी सध्या बॉलिवूड करीत आहे. प्रसुतीनंतर ऐश्वर्याच्या वाढलेल्या वजनाची खूप चर्चा झाली. पण त्याकडे फारसे लक्ष न देता अतिशय आत्मविश्वासाने ऐश्वर्याने नेहमीप्रमाणे कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली. तिथून परतल्यानंतर हळूहळू जाहिराती आणि अन्य आंतरराष्ट्रीय प्रकल्पांवरही काम सुरू करीत ऐश्वर्या सक्रिय झाल्याने ती लवकरच पुन्हा चित्रपट करणार यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. पुनरागमनासाठी ऐश्वर्याने आपला आवडता दिग्दर्शक मणिरत्नम याच्या चित्रपटाची निवड केल्याचे समजते.
 
निघाली वाऱ्यावरची वरात! Print E-mail

फिल्लमबाज

मराठी इंटरनॅशनल फिल्म अ‍ॅण्ड थिएटर अ‍ॅवॉर्डस् (मिफ्ता)चं हे तिसरं वर्ष. मराठी कला सर्वदूर पोहोचावी, यासाठी ‘मिफ्ता’चा प्रपंच मांडण्यात आला. यंदाचा ‘मिफ्ता’ पुरस्कार सोहळा सिंगापूर येथे होणार असून शनिवारी पुरस्कार प्रदान समारंभ पार पडणार आहे. मराठी नाटय़ आणि चित्रपटसृष्टीच्या बिनीच्या कलाकारांसोबत अनुभवलेला हा ‘मिफ्ता’चा रिपोर्ताज.. खास ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी..
रंगमंचावर एकदा एन्ट्री घेतली किंवा कॅमेऱ्यासमोर उभं राहिलं का मग.. तो कलाकार त्याचाही उरत नाही..  भूमिकेवर स्वार होत आपण कोण आहोत, कुठे आहोत, हे विसरण्याची ताकद त्याची कला त्याला देते..
 
बिग बॉसच्या घरात चंकी, गुलाबी गँगची कमांडर आणि पूनम पांडे? Print E-mail

अतुल माने

बिग बॉसचा सहावा अध्याय येत्या ७ ऑक्टोबरपासून कलर्स वाहिनीवर सुरू होत असून, यावेळी घरात राहणाऱ्या सदस्यांमध्ये अभिनेता चंकी पांडे तसेच वादग्रस्त सेक्स गुरू स्वामी नित्यानंद, तसेच मॉडेल पूनम पांडेसह उत्तर प्रदेशात महिलांसाठी आवाज उठविणाऱ्या गुलाबी गँगच्या सर्वेसर्वा संपतपाल देवी यांचा समावेश असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. विशेष म्हणजे बिग बॉसच्या आधीच्या सर्व भागांमध्ये अनेक व्हल्गर तसेच हिडीस प्रकार घरातील सदस्यांमध्ये झाले होते व याचे प्रक्षेपणही करण्यात आले होते.
 
मोनोरेलचा मुहूर्त हुकणार Print E-mail

प्रतिनिधी
चेंबूर-वडाळा-संत गाडगेमहाराज चौक या मार्गावर बांधण्यात येत असलेल्या मोनोरेल प्रकल्पाचा चेंबूर ते वडाळा पहिला टप्पा जानेवारी २०१३ पर्यंत सुरू करण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जाहीर केलेला मुहूर्त हुकणार असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा जाहीर केलेला मुहूर्त गाठता न येण्याची ‘एमएमआरडीए’ची परंपरा कायम राहणार आहे.

 
दिवाळी अंक यंदा करणार शंभरी पार! Print E-mail

प्रस्थापित अंकांची किंमत १२० ते १५० रुपये
प्रतिनिधी
सर्व क्षेत्रांत वाढलेल्या महागाईमुळे यंदा बहुतांश दिवाळी अंकांच्या किमती शंभर रुपयांपेक्षा जास्त असणार आहेत. तर प्रस्थापित अंकांच्या किमती यंदा १२० ते १५० रुपयांपर्यंत जाणार आहेत. जाहिरातदारांनीही हात आखडता घेतल्याने मोठे अंक वगळता इतरांना जाहिराती मिळविणे जिकिरीचे होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

 
वसई साहित्य आणि कला महोत्सव संपन्न Print E-mail

वसई/प्रतिनिधी
वसईतील ‘सहयोग’ संस्थेच्या वतीने रविवारी वसई साहित्य आणि कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात ते म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन ही पुढच्या पिढीसाठीची लढाई आहे. दीर्घकाळाने गुण येईल असे हे औषध आहे.

 
चर्चगेट-विरार एसी लोकलची मागणी मान्य Print E-mail

वसई/प्रतिनिधी
चर्चगेट-विरारदरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आरामदायी करण्याच्या दृष्टीने या मार्गावर एसी लोकल सुरू करण्याची प्रवाशांची मागणी एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी खासदार संजीव नाईक यांना दिले आहे.

 
खुशबू सक्सेनाच्या मृत्यूचे गूढ कायम Print E-mail

प्रतिनिधी
रविवारी मध्यरात्री वाकोला येथील पुलावरून पडून मृत्यू पावलेल्या खुशबू सक्सेना (२६) या तरुणीच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू मानसिक धक्कयाने झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
अंधरीच्या लोखंडवाला कॉम्पलेक्समधील स्वीस कॉम्प्लेक्समध्ये राहणारी खुशबू ही रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास वाकोला पुलावरुन पडून मरण पावली होती.

 
चतुरंगच्या ‘एक कलाकार- एक संध्याकाळ’ उपक्रमात अशोक हांडे Print E-mail

प्रतिनिधी
 चतुरंग प्रतिष्ठानने सुरू केलेल्या ‘पुन्हा एक कलाकार- एक संध्याकाळ’ या उपक्रमाअंतर्गत येत्या ११ ऑक्टोबर रोजी ‘चौरंग’संस्थेचे अशोक हांडे सहभागी होणार आहेत. आंब्याचे व्यापारी असलेले हांडे हे सूत्रधार, संवाद लेखक, दिग्दर्शक आणि गायक आहेत. त्यांच्या संस्थेतर्फे सध्या सुरू असलेला ‘मराठी बाणा’ आणि अन्य कार्यक्रम रसिकमान्य ठरले आहेत. 

 
वसई-विरार मनपाची परिवहन सेवा सुरू Print E-mail

वसई/प्रतिनिधी
देशातील सर्वाधिक लोकसंख्या वाढणारे वसई हे शहर असून, येथे सर्व नागरी सुविधा अपुऱ्या पडतात. पाणी, वीज, परिवहन सेवा तसेच सर्व प्राथमिक सुविधा पुरविण्याचा वसई-विरार महानगरपालिकेच्या  प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज परिवहन सेवेचे उद्घाटन करण्यात आले. वसईच्या पूर्व भागांत, नायगावच्या पूर्व भागांत तसेच उपेले खोचिवडे रानीवली, सातीवली, पेल्हार/ तसूनवघर अशा ग्रामीण व दुर्गम भागांत सुलभ पद्धतीने प्रवास करता यावा म्हणून ही बससेवा सुरू करण्यात आली, असे उद्गार बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी काढले.

 
महात्मा गांधी यांच्याविषयीचे गैरसमज दूर करणाऱ्या पुस्तकाचे आज प्रकाशन Print E-mail

प्रतिनिधी
लोकोत्तर व्यक्तिमत्व असलेल्या महात्मा गांधी यांच्या विचार आणि तत्त्वांचा पुरस्कार भारतासह जगभरात केला जातो. सध्याच्या परिस्थितीत ‘गांधीवाद’ अनेक समस्यांचे निराकरण करू शकेल, असा विश्वास काहीजणांना वाटतो तर काहीजण ‘गांधीवाद’ कालबाह्य़ झाल्याचे मानतात. महात्मा गांधी या व्यक्तिमत्वाविषयी लोकांमध्ये अनेक गैरसमजही आहेत. हेच गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न  स्तंभलेखक सुधींद्र कुलकर्णी यांनी केला आहे.

 
बिकट वाट Print E-mail

विनय उपासनी - This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
गणेशोत्सव संपला.. पितृपक्ष सुरू झाला.. पंधरवडय़ाने नवरात्राची धूम, त्यानंतर मग दसरा आणि अखेरीस दिवाळी. सणासुदीचा हंगाम आता खरा सुरू झाला आहे. आधी रुसलेल्या पावसाने नंतर मात्र दिल खोल के बरसात केली आहे. विविध कंपन्यांचे बोनसचे आकडे काही दिवसांनी जाहीर होतील. त्याआधीच अनेक कंपन्यांनी आपापली नवनवी उत्पादने बाजारात आणायला सुरुवातही केली आहे. कार हा त्यातला महत्त्वाचा घटक.

 
नात्यांची वीण उलगडणारा ‘साद’ Print E-mail

मलेशियात चित्रित झालेला मराठी चित्रपट
प्रतिनिधी
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रेक्षक करमणूक म्हणून चित्रपट पाहायला जातात. म्हणूनच गंभीर विषय करमणूक आणि विनोद करता करता मांडायचे, असे आम्ही ठरविले आणि आई-वडील-मुलगा-मुलगी-सासरे यांच्या नात्यांतील गुंतागुंत हा गंभीर विषय ‘साद’ या चित्रपटातून हाताळला, असे पटकथा-संवाद लेखक आणि अभिनेता दीपक देऊळकर यांनी सांगितले. या चित्रपटाचे मलेशिया-सिंगापूर येथे चित्रीकरण करण्यात आले आहे.

 
<< Start < Prev 11 12 13 14 Next > End >>

Page 14 of 14

व्हिडिओ

लाउडस्पीकर  
'महागाई' या विषयावरील चर्चा
blk
आयडिया एक्स्चेंज  
जेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता
blk
व्हिवा लाऊंज  
डॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)
blk
सागर परिक्रमा - २  
‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात!
लोकसत्ता युट्युब चॅनल
<iframe width="300" height="275" src="http://www.youtube.com/embed/bA4XUHbGh-c" frameborder="0" allowfullscreen></iframe>

लोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम

'सॅण्डी' संकट!

यश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’

लोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो

आणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा

‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-

वासाचा पयला पाऊस आयला

 


 

साप्ताहिक पुरवणी

लोकरंग (दर रविवारी)


चतुरंग
(दर शनिवारी)

 नवऱ्याकडून घरकामाचा पगार?

alt

 गरज शोधांची जननी

 एक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..

alt

 करिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या

alt

 स्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी

 बोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड

 गावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव

alt

 आनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..

alt

 ब्लॉग माझा : आयडिया लई भारी!

alt

 स्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..!

alt

 अनघड अवघड : बोलायलाच हवं!


वास्तुरंग
(दर शनिवारी)

alt

 एक आस.. उभारीची!

alt

 फटाक्यांपासून इमारतीची सुरक्षा

alt

 घरसजावटीसाठी…
आणखी वाचा...

व्हिवा (दर शुक्रवारी

alt

 फुल टू कल्ला

alt

 कट्टा

alt

 एन्जॉय
आणखी वाचा...

करिअर वृत्तान्त (दर सोमवारी)

 ‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट
alt   सुट्टी आणि अभ्यास
alt  शिकवून कोणी शिकतं का?
आणखी वाचा...

अर्थवृत्तान्त (दर सोमवारी)

 विमा विश्लेषण : जीवन तरंग
 ‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर
 गुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई
आणखी वाचा...

आजचे फोटो