जगभरातून प्रसिद्ध होणार तीन ई-दिवाळी अंक प्रतिनिधी गेली तब्बल चार दशके सातत्याने अभिनव उपक्रम राबवून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाचन संस्कृती रूजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘ग्रंथालीतर्फे यंदाच्या दिवाळीत जगातील निरनिराळ्या ठिकाणांहून तीन ई-दिवाळी अंक प्रसिद्ध होणार आहेत. |
प्रतिनिधी ‘ऑस्कर’साठी अॅनिमेशनपटांच्या विभागात ‘हे कृष्णा’ आणि ‘दिल्ली सफारी’ या दोन अॅनिमेशनपटांच्या प्रवेशिका पाठविण्यात आल्या आहेत. ८५ व्या अॅकॅडमी अॅवॉर्ड्स अर्थात ऑस्करच्या नामांकित पुरस्कारांसाठी असलेल्या स्पर्धेत जगभरातील २१ अॅनिमेशनपट दाखल झाले आहेत. |
प्रतिनिधी जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईच्या तुलनेत पगार वाढ मिळत नसल्याने महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आघाडीने ७ नोहेंबरला धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्य़ात शासनाने स्थापन केलेल्या सुरक्षा रक्षक मंडळामार्फत काम करणाऱ्या रक्षकांची मोठय़ा प्रमाणात पिळवणूक होत आहे. |
प्रतिनिधी मनुष्यबळ विभागात वरिष्ठ पदावर काम केलेले आणि गेली बारा वर्षे व्यक्तिमत्व विकासविषयक कार्यशाळा घेणारे अरविंद खानोलकर यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवावर आधारित ‘यश एका पावलावर’ हे पुस्तक लिहिले आहे. |
बाल पुस्तक महोत्सव आर. के. बुक सेंटरतर्फे दहिसर येथे ३० नोव्हेंबपर्यंत बाल पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. एस. व्ही. रोड येथील फायर ब्रिगेडच्या समोर भरलेल्या या महोत्सवात लहान मुलांसाठी मराठी, इंग्रजी, हिंदूी आणि गुजराती पुस्तकांचा समावेश आहे. |
एपीएमसी बाजारातील व्यापाऱ्यांचा आरोप थेट मुंबईत जाणारी भाजीही स्वस्त नाहीच शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२
ग्राहकांना स्वस्तात भाजीपाला व अन्नधान्य मिळावे, या हेतूने सरकारने ‘थेट पणन’ व ‘शेतकरी पणन’ या दोन योजना सुरू केल्या. नवी मुंबईतील ‘कृषी उत्पन्न बाजार समिती’मधील (एपीएमसी) दलाल टाळून थेट किरकोळ व्यापाऱ्यांपर्यंत कृषीमाल पोहोचावा हा त्यामागचा उद्देश आहे. |
महिला बचत गटांना की कंत्राटदारांना प्रतिनिधी / प्रसाद रावकर मुंबईमधील सशुल्क वाहनतळांवर कंत्राटदारांचे कर्मचारी मुजोरी करीत वाहने उभी करणाऱ्यांकडून अवाच्या सवा पैसे घेत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यात पालिका प्रशासन आणि वाहतूक विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. |
प्रतिनिधी
यंदाच्या दिवाळीत शाहरुख खानचा ‘जब तक है जान’ आणि अजय देवगणचा ‘सन ऑफ सरदार’ आमनेसामने येणार याची जाहीर घोषणा होऊन कितीतरी दिवस लोटले. चित्रपट उद्योगात बॉक्स ऑफिसवरची स्पर्धा ही नवीन नाही. त्यामुळे शाहरुख आणि अजय देवगण दोघेही या आव्हानासाठी तयार होते. |
प्रसाद रावकर / स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ
मुंबईत २००५ च्या जुलै महिन्यात झालेल्या ढगफुटीमुळे मिठी नदीला पूर येऊन उपनगरे पाण्याखाली गेल्यानंतर पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यासाठी ‘मिठी नदी विकास प्रकल्पांतर्गत’ मिठी नदीची रुंदी आणि खोली वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले. |
मुंबई/प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मानखुर्दपर्यंतच्या रेल्वे स्थानकांचा विस्तार करण्यासाठी लागणारा निधी आणि रेल्वे डब्यांची कमतरता यामुळे सध्या केवळ १० डब्यांचीच गाडी चालवणे शक्य असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी बुधवारी स्पष्ट केले. पश्चिम रेल्वेकडे सध्या डीसी विद्युत यंत्रणेवर चालणाऱ्या उपनगरी गाडय़ा यार्डात पडून असून त्या मध्य रेल्वेला देण्याची विनंती करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. |
सहा फायली ताब्यात घेण्याचे न्यायालयाचे आदेश प्रतिनिधी आदिवासी विकास मंत्रालयामार्फत राबविल्या गेलेल्या विकास योजनांमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी सरकारला दणका दिला. तसेच या घोटाळ्याची गंभीर दखल घेत त्या संबधीच्या सहा फायली जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत. |
प्रतिनिधी
‘संपूर्ण एक पान खास विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी राखीव ठेवणारे ‘लोकसत्ता’ हे एकमेव वृत्तपत्र आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आणि भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशा ‘यशस्वी भव’ पुस्तिका खास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली असल्याने त्यांना निश्चितपणे त्याचा फायदा होईल,’ असा विश्वास राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी व्यक्त केला. |
‘अॅक्वा लाईफ’
लौकिक क्रिएशन आणि सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ फिशरीज एज्युकेशन यांच्या वतीने दुर्मिळ जातीच्या माशांचे प्रदर्शन शुक्रवारपासून रुईया महाविद्यालयात भरविण्यात येत आहे. सात नोव्हेंबपर्यंत सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात शार्क, ऑस्कर, कॅटफिश, डिस्कस यांसारखे विविध रंगांचे पाच हजार मासे पाहायला मिळतील. |
पोलिसांची रेल्वे प्रशासनास विनंती प्रतिनिधी रेल्वे स्थानकातून लहान मुलांना पळविण्याचे प्रकार वाढीस लागल्यानंतर आता छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये कोणालाही झोपण्यास देऊ नये, अशी विनंती रेल्वे पोलिसांकडून प्रशासनास करण्यात आली आहे. |
पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम प्रतिनिधी भारतीय शास्त्रीय संगीतात प्रत्येक रागाचे ‘झाड फुलवणारे’ पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त पुण्यातील न्यू एज फाऊंडेशन या संस्थेतर्फे मुंबईत ३ नोव्हेंबर रोजी ‘स्मरणसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. |
प्रतिनिधी गुन्हे शाखेने नागपाडा येथील सिटी सेंट्रल मॉलवर छापा घालून सॅमसंग या प्रसिद्ध कंपनीचे बनावट मोबाइल आणि मोबाइलची उपकरणे जप्त केली आहे. त्याची किंमत सुमारे एक कोटींच्या घरात असल्याचे पोलिसांनी सांगितले. |
वाहतूक पोलिसाला जाळल्याप्रकरणी रिक्षाचालकाला जन्मठेप वसई/ प्रतिनिधी कायद्याने रिक्षाचालकावर कारवाई केलेल्या वाहतूक पोलिसाला पेटवून ठार मारल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपी महेंद्र केवट याला आज सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एम. जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. |
प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील चुनाभट्टी फाटकामुळे रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांच्या नियमितपणात व्यत्यय येत असून हे फाटक बंद करून पर्यायी मार्ग सुरू करण्याची विनंती मध्य रेल्वेकडून राज्य सरकारला करण्यात आली आहे. |
वसई / प्रतिनिधी सार्वजनिक क्षेत्रातील १९ बँकांमधील भरतीसाठी सामायिक परीक्षेची नावनोंदणी ५ नोव्हेंबपर्यंत आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या २२४९ जागांसाठी भरती परीक्षाही होत आहे. यासाठी १० वी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतील. |
शताब्दी सोहळा ग्रॅंट रोड येथील डी.जी.टी विद्यालयाला येत्या ५ डिसेंबर रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन येत्या ८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 3 of 14 |