नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात होणार सुरू प्रतिनिधी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची बंद पडलेली ताडदेव शाखा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होण्याची शक्यता आहे. |
प्रतिनिधी कुलाबा येथील एलआयव्ही पबवर टाकलेल्या धाडीनंतर टीकेचे लक्ष्य बनलेल्या पोलिसांना वाचविण्यासाठी दक्षिण प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पब तसेच बारमालकांना सीसीटीव्ही लावण्याचा सल्ला दिला आहे. |
उच्च न्यायालयात याचिका दाखल प्रतिनिधी साडेतीनशे कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल असलेल्या मुंबई पोलिसांच्या पतपेढीतील विमा कर्ज योजनेतील फसवणुकीबाबत अहवाल दिल्यानेच आपल्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत अडकविण्यात आल्याचा आरोप करीत सहायक आयुक्त धनराज वंजारी यांनी अखेरीस उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. |
प्रतिनिधी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर वेग नियंत्रक लावण्याबाबतच्या कायद्यात केंद्र सरकारने अद्याप सुधारणा झाली नसल्यामुळे ३१ ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा वेग नियंत्रकाचा मुद्दा वादाचा ठरण्याची शक्यता आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर वेग नियंत्रक सक्तीने बसविण्याच्या परिवहन विभागाच्या कारवाईस न्यायालयाने ३१ ऑक्टोबपर्यंत स्थगिती दिली आहे. |
प्रतिनिधी संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी लिहिलेल्या ‘मुसाफिर’ या आत्मचरित्राच्या निमित्ताने मॅजेस्टिक बुक हाऊसतर्फे ३ नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. |
प्रतिनिधी पद्मा बिनानी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा २०११ या वर्षीचा ‘वात्सल्य’ पुरस्कार कोंकणी भाषेतील बाल साहित्यातील लक्षणीय योगदानाबद्दल मीना काकोडकर यांना नुकताच मुंबईत एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. |
‘पार्ले कट्टा’मध्ये चंद्रशेखर धर्माधिकारी ‘पार्ले कट्टा’ या उपक्रमात येत्या ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्याशी मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. |
बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२
हकीम समितीच्या शिफारशींनुसार सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सींच्या भाडय़ांमध्ये ३३ टक्क्यांहून अधिक वाढ केली. या अन्याय्य भाडेवाढीविरोधात सर्वत्र निषेधाचे आणि संतापाचे सूर उमटले. आजचा ‘नो रिक्षा नो टॅक्सी डे’ हा या निषेध आणि संतापाचे प्रातिनिधिक रूप आहे. या निमित्ताने काही नागरिकांनी व्यक्त केलेल्या या प्रतिक्रिया |
अन् जमा झाला ८० लाखांचा इमारत निधी प्रशांत मोरे
कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या दृष्टीने शाळेच्या नव्या इमारतीसाठी निधी जमविणे हे मोठे जिकीरीचे आणि कष्टाचे काम असते. राजेंद्र शिक्षण संस्थेच्या डोंबिवलीतील विद्या निकेतन या कायम विनाअनुदानीत तत्त्वाने चालविल्या जाणाऱ्या शाळेने मात्र ते अगदी सहजपणे साध्य केले आहे. |
प्रतिनिधी
वाढत्या शहरीकरणाचे फार मोठे पडसाद शहरी तरुणांवर आणि त्यांच्या संस्कृतीवर उमटले आहेत. या मुशीत घडणाऱ्या तरुणांची मानसिक ता काय आहे, त्यांची जीवनशैली कशी आहे, याचा वेध फरहान अख्तर लिखित-दिग्दर्शित ‘दिल चाहता है’ या चित्रपटाने घेतला होता. २००८ साली आलेल्या या चित्रपटाला तरुणाईने डोक्यावर घेतले. |
पोलीस कर्मचारी आणि शहिदांच्या कुटुंबीयांसाठी खास खेळ प्रतिनिधी रामगोपाल वर्मा मुंबईवर ‘२६/११’ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर चित्रपट काढण्याचा केवळ विचार करीत असताना एका मराठी दिग्दर्शकाने महाराष्ट्र पोलीस, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि दहशतवादी हल्ले यांची उत्तम सांगड घालणारा एक चित्रपट बनवलादेखील आहे. |
प्रतिनिधी मॅजेस्टिक बुक हाऊस आणि मॅजेस्टिक बुक डेपो यांच्या तर्फे रसिक वाचक आणि साहित्य प्रेमींसाठी खास दिवाळी अंक भेट योजना जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही संस्था स्वतंत्र असून त्यांची योजनाही वेगवेगळी आहे. |
त्रमासिकासाठी आवाहन महाराष्ट्र शिक्षण संचालक मंचातर्फे शैक्षणिक विषयाची माहिती देणारे, विविध शासकीय योजना, शिक्षण क्षेत्रातील समस्या आणि त्यांचे निराकरण या संदर्भातील माहितीपूर्ण त्रमासिक प्रकाशित करणार आहे. |
* राज्याच्या थंड कारभारामुळे पिंजार व गारगाई प्रकल्प निर्णयाच्या प्रतीक्षेत संदीप आचार्य ,मंगळवार, ३० ऑक्टोबर २०१२ एकीकडे दोन हजार सालपर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण देण्याची भूमिका घ्यायची तर दुसरीकडे मुंबईत कोणीही येऊ शकतो असे म्हणायचे. मात्र त्याचवेळी मुंबईच्या नागरी समस्यांसाठी महापालिकेला कोणतीही ठोस मदत करायची नाही, |
मुंबईत अद्याप ५० टक्के टीव्ही सेट टॉप बॉक्सविनाच रोहन टिल्लू
केंद्र सरकारने मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या चार प्रमुख शहरांमध्ये डिजिटायझेशन अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असला, तरी मुंबईसारख्या अठरापगड वस्तीच्या शहरातही ‘डिजिटायझेशन म्हंजे काय रे भौ?’ असा प्रश्न कानावर पडत आहे. सरकारने घराघरांत सेट टॉप बॉक्स बसवण्यासाठी ३१ ऑक्टोबर ही अंतिम तारीख जाहीर केली आहे. |
गोविंद तुपे
प्रत्येक मोर्चामध्ये कामगारांकडून देण्यात येणारी ‘जोर जुलुम के टक्कर में संघर्ष हमारा नारा है’ ही घोषणा वास्तवातही दिसून येत आहे. असंघटित कामगारांची सुरक्षा आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून राबविले जाणारे शासनाचे धोरण दिखाऊ असल्याचेच वास्तव कामगारांना भेडसावत आहे. |
प्रतिनिधी
आपल्या समाजाची उन्नती साधायची असेल तर पहिल्यांदा या ब्रिटिशांना भारतातून हुसकावून लावायला हवे, असा विचार केल्यानंतर के वळ त्या एका ध्यासापायी आपले घर, मित्र, आयुष्य मागे सोडून त्याने स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. रवींद्रनाथ टागोरांच्या ‘गोरा’ या कादंबरीचा नायक ‘गौरमोहन’ उर्फ ‘गोरा’ची ही कथा तत्कालिन अनेक देशभक्तांपेक्षा वेगळी नाही. |
प्रतिनिधी
जुलै महिन्यात पश्चिम रेल्वेवर झालेल्या मोटरमनच्या आकस्मिक आंदोलनाबाबत विचारण्यात आलेली माहिती संपूर्णपणे देण्याचे आदेश अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी दिले आहेत. माहितीच्या अधिकारात मागण्यात आलेली ही माहिती १५ दिवसात देण्यास सांगण्यात आले आहे.पश्चिम रेल्वेच्या मोटरमननी आपल्या मागण्यांसाठी २० जुलै रोजी अचानक संप पुकारला होता. |
वसई /प्रतिनिधी अर्नाळा किल्ल्यात राहणाऱ्या हजारो मच्छीमार बांधवांना उन्हा-पावसात किल्ल्यातून शहरात व शहरातून किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या हजारो पर्यटकांना आता लवकरच स्कायवॉकमार्गे अर्नाळा किल्ल्यात ये-जा करता येणार आहे. |
प्रतिनिधी पुढील वर्षी चिपळूण येथे होणाऱ्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रातील खुल्या अधिवेशनात विविध ठराव मांडण्यात येतात. ज्यांना हे ठराव मांडायचे असतील त्यांनी ते येत्या १५ डिसेंबपर्यंत महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडे पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. |
|
|
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next > End >>
|
Page 5 of 14 |