डॉ. केंद्रे पुन्हा वादात - शनिवार, १० नोव्हेंबर २०१२ ठाणे / प्रतिनिधी ठाणे शहरातील रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण दाखल असून या संबंधी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे रेकॉर्डच उपलब्ध नसल्याने स्थायी समिती सदस्यांनी शुक्रवारच्या सभेत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांच्या कारभाराविषयी ताशेरे ओढले.
गणेश नाईकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा खास प्रतिनिधी राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर तयार होईल असे एकच नवी मुंबई हे शहर आहे. त्यासाठी येथील ग्रामस्थांची घरे कायम करून त्यांना चार व अडीच लाख झोपडपट्टीवासियांसाठीही चार एफएसआय आणि सिडकोच्या निकृष्ट दर्जाच्या इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी अडीच एफएसआय देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्याकडे गेली अनेक महिने प्रस्ताव प्रलंबित आहेत.
ठाणे / प्रतिनिधी कल्याण येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडे एक कोटींची खंडणी मागणाऱ्या दोन जणांना कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून त्यात बांधकाम व्यावसायिकाच्या भावाचाच समावेश आहे. त्याने मेहुण्याच्या मदतीने स्वत:च्या अपहरणाचा कट रचून भावाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
* सिडकोचा दोन एफएसआयचा प्रस्ताव * महापालिकेत संभ्रम * संचालकांचा मात्र अडीच एफएसआयसाठी आग्रह जयेश सामंत- शुक्रवार, ९ नोव्हेंबर २०१२ नवी मुंबईतील निकृष्ट आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बाधणीसाठी दोन चटईक्षेत्र निर्देशांक मंजूरीचा एक नवा प्रस्ताव सिडकोच्या संचालक मंडळापुढे मांडण्यात आला असून सिडकोच्या या प्रस्तावामुळे नवी मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठविलेल्या अडीच चटईक्षेत्र निर्देशांकाच्या मंजुरीस अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
कल्याण/प्रतिनिधी शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत होणाऱ्या सुमारे २८ गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या सहा महिन्यापासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादात रखडल्या आहेत. मे महिन्याच्या अखेपर्यंत गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने तयार केला होता.