ठेकेदाराचे कामगार संपावर.. कल्याण डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग
कल्याण/प्रतिनिधी कल्याण डोंबिवलीत कचरा उचलणाऱ्या अन्थोनी वेस्ट कंपनीच्या कामगारांनी बुधवारी अचानक पगारवाढीचे कारण देऊन संप पुकारल्याने कल्याण डोंबिवलीत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कल्याणमधील ‘क' प्रभागात बाजारपेठा, मासळीबाजार असल्याने या भागाला या कचऱ्याच्या ढीगांचा सर्वाधिक फटका बसला आहे.
मालमत्ताकरप्रणालीचे भूत पुन्हा एकदा बाटलीबंद होणार?
ठाणे / प्रतिनिधी - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२
ठाणे महापालिकेचे आयुक्त आर.ए.राजीव यांच्या आग्रहामुळे भांडवली मूल्यावर आधारित मालमत्ता करप्रणालीचे भूत पुन्हा एकदा बाटलीबाहेर निघेल अशी भीती ठाणेकरांमधून व्यक्त होऊ लागली असतानाच या नव्या करप्रणालीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना कोणताही त्रास देण्याचा उद्देश नाही, अशी स्पष्ट भूमिका महापालिका प्रशासनाने आता घेतली आहे. ही नवी करप्रणाली शहरात लागू करायची नाही, असा निर्णय यापूर्वीच ठाणे महापालिकेच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी घेतला आहे.
ठाणे / प्रतिनिधी
राज्य शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी सात अनुदान योजना राबविल्या जात असून यंदाच्या अर्थसंकल्पात यासाठी १३२ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. परंतु अनेक ज्येष्ठ नागरिकांना या योजनांची माहिती नसते. यामुळे विविध सवलती आणि अनुदानापासून ते वंचित राहातात.यामुळे समन्वय प्रतिष्ठानच्या वतीने ८ ते ३० नाव्हेंबर याकालावधीत वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘सामाजिक बांधिलकी अभियान’ राबविण्यात येणार आहे.
संस्कारातूनच यशस्वी जीवनाची वाटचाल - गजानन पेंढरकर
डोंबिवली/प्रतिनिधी घरातून बालपणापासून होणारे संस्कार हेच प्रत्येकाला यशस्वी जीवनाचा मार्ग दाखवित असतात. कष्ट, मेहनत, जिद्द आणि सचोटी या चतुसुत्रीचा आधार घेऊन प्रवास केला तर जीवनात हमखास यश मिळते, असे प्रतिपादन विको लॅबोरेटरिजचे अध्यक्ष गजानन पेंढरकर यांनी रविवारी येथे केले.
कल्याण/प्रतिनिधी कल्याण डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात इलेक्ट्रानिक बसवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांविरोधात मंगळवार ८ नोव्हेंबरपासून विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय आरटीओने घेतला आहे.