शहापूर /वार्ताहर शहापूरलगतच असलेल्या चेरपोली गावच्या हद्दीतील मालतीविहार अपार्टमेंटच्या पॅसेजमध्ये तुषार ठोंबरे या २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आज सकाळी आढळून आला.
‘नो फिअर कार्यशाळा’ ठाणे - सप्तश्रृंगी महिला मंडळातर्फे गुरुवार ८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १ यावेळेत सप्तश्रृंगी अॅक्टिव्हिटी सेंटर, राजाराम भूवन, मंगला हायस्कूल जवळ, ठाणे (पूर्व) येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नो फिअर कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे.
प्रतिनिधी, रविवार, ४ नोव्हेंबर २०१२ ठाण्याच्या शारदा प्रकाशनातर्फे ज्येष्ठ कवयित्री लक्ष्मीतनया (दमयंती गोविंद मराठे) यांच्या ‘कृतज्ञता’ या काव्यसंग्रहाचे येत्या रविवार, ४ नोव्हेंबर २०१२ रोजी प्रकाशन करण्यात येणार आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांच्या तक्रारी ठाणे / प्रतिनिधी , ठाणे शहरातील बहुतांश स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून तेथे सुरक्षारक्षक तसेच नोंदणी अधिकारी नसतो. त्यामुळे मृत्यूचे दाखले मिळण्यासाठी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, अशी धक्कादायक माहिती शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या पहिल्या बैठकीत सदस्यांनी सभागृहात दिली.
दिवाळीपूर्वीच नगरसेवक सुट्टीवर.. खास प्रतिनिधी अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विषय समित्यांच्या निवडणुकीत अल्पमतात आलेल्या शिवसेनेने बदललेल्या आरक्षणाचा फायदा घेत अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा विद्यमान नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनाच उमेदवारी दिल्याने येथील सत्तासंघर्ष टिपेला पोहोचला आहे.